Tuesday, 13 December 2022

गरिबीवर मात करीत विश्वंभर पोटे यांची पोलीस निरीक्षक पदी निवड



माळझरा गावकऱ्यांकडून दोन्ही पोलिस निरीक्षकाचा  सन्मान 
शेख मुख्तार
 मनाठा (प्रतिनिधी )  बामणी फाटा येथुन पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजे माळझरा ता.हदगांव हे गाव पंच्याहत्तर टक्के आदिवासी वस्तीचे दोन हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. येथे सातवीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. गावातुन प्राथमिक शिक्षण घेत आपल्या सोयीनुसार पुढील शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी आज दोन तहसीलदार , दोन पोलिस निरीक्षक, आयुक्त प्राध्यापक, अस्या विविध उच्च पदावर कार्यरत आहेत.शिकलेल्या गावांसाठी काही तरी केले पाहिजे या विचाराने त्यांच्या कडून  गावकऱ्यांकडून आयोजित केलेल्या कार्यक्रमात नेहमी अधिकारी उपस्थित राहुन मार्गदर्शन करतात.यामुळेच गावात विविध समीत्याच्या माध्यमातून दारुबंदी सह सार्वजनिक कार्यक्रम एकोप्याने होत असलेले बघायला मिळतात.
 विश्वंभर वसंता पोटे यांनी प्राथमिक शिक्षण गावात पुर्ण केले. पुढील दहावी पर्यंत शिक्षण माळझरा येथुन चार किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचगव्हान येथे केले.परीस्थीती लक्षात घेऊन पुढील शिक्षण जालना या ठिकाणी जाऊन पार्ट टाइम जॉब करीत शिक्षण घेतले. जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करून मेहनत घेऊन पोलिस शिपाई  शिखर गाठले.नुकत्याच पार पडलेल्या परीक्षेत पोलिस निरीक्षक पदावर नियुक्ती झाली असल्याने  गावकऱ्यांनी सात डिसेंबर रोजी सकाळी पोलिस निरीक्षक विश्वंभर पोटे व गावांमध्ये पहिला पोलिस निरीक्षक झालेल्या सदानंद मेंडके  यांची गावातुन मिरवणूक काढून  शालेय विस्तार अधिकारी एस.एन.बाच्छे व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा संपन्न झाला.यामध्ये उपस्थित मान्यवरांनी माळझरा सारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन पुढील शिक्षण घेत विविध पदावर यशाचे शिखर गाठत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे  कौतुक करीत उपस्थित गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. 
 यावेळी माजी पंचायत समिती सदस्य गुलाबराव हाके, सरपंच पंडीत खोकले, उपसंरपंच संजय क-हाळे, पोलिस पाटील वसंतराव कार्ले, दामोदर,डवरे, नाईक, मेंडके, संतोष बुरकुले, तुळशीराम मेंडके, शंकरराव मिराशे, तान्हाजी कार्ले, विनोद बिरकुले, साहेबराव मेंडके, देवानंद मिराशे, प्रभाकर मिराशे, दत्ता मेंडके, बापुराव मगरे, सुखदेव मिराशे,प्रकाश क-हाळे, विष्णू खोकले, सुखदेव खोकले, गजानन पाटे,कोंडबा पहाडे, शिवाजी पोटे, गणेश मिराशे,जयभाजे,भुतनर यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मौजे केदारगुडा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

मौजे केदारगुडा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत  विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू 
शेख मुख्तार
हदगाव (प्रतिनिधी ) -जिल्ह्यातील हदगाव तालुक्यांतील मौजे केदारगुडा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत एका विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे, मात्र या प्रकरणावरून शासनाच्या आणि शाळा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे एका निष्पाप, निरागस मुलीला आपल्या प्राणास मुकावे लागले असल्याचे दिसुन येत आहे.
 याचं शाळेच्या अनेक गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी काही महिन्यापूर्वीच अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनेच्या माध्यमातून  या आश्रम शाळेतील घडणाऱ्या विविध प्रकारच्या समस्या विषयी अवगत करून, निवेदन सादर करण्यात आले होते.त्या अनुषंगाने तत्कालिन प्रकल्प अधिकारी यांनी मु.अ.सह सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती पण शिक्षण विभागाच्या काही चतुर आधिकारी आणि कर्मचारी यांनी सोयीस्कर मार्ग शोधत कार्यवाही करण्याचे मुद्दाम हून टाळले.या बाबत शाळा प्रशासनात कोणत्याही प्रकारची सुधारणा न होता उलट या प्रकारच्या गंभीर घटना घडणे अतिशय निंदनीय बाब म्हणता येईल.
 याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत प्रकल्प कार्यालय किनवट अंतर्गत चालविली जाणारी शासकीय आदिवासी आश्रम शाळा केदारगुडा येथील इयत्ता ४ थी मध्ये शिकणाऱ्या मुलीच्या संशयास्पद मृत्यूने  जिल्ह्यातील सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. सदरील घटना दि.१२/१२/२०२२ अंदाजे सायंकाळी पाच ते सहा दरम्यान घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन थेट प्रकल्प कार्यालय आधिकारी किनवट, उप विभागीय पोलिस आधिकारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करत या प्रकरणाच्या दोषिवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
हि बातमी सर्व जिल्हाभर वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे अनेकांनी आश्रम शाळेला घेराव घालून पीडित मुलीस न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनास विनंती केली.यावेळी जमलेल्या लोकांचा एवढा आक्रोश होता की, तात्काळ कारवाई करण्याची प्रक्रिया पूर्ण करून या प्रकरणी जे दोषी असणाऱ्या व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अन्यथा मृतदेहास हात लावू देणार नाही, अशी विनंती केली होती पण शासनाच्या विविध आधिकारी आणि कर्मचारी यांच्या मध्यस्थीने काही वेळ तणाव निर्माण झाला होता पण संबंधित यंत्रणेने ठोस कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने जमलेल्या हजारोंचा रोष कमी झाला.                    शव विच्छेदन इन कॅमेऱ्यात करून दोषीवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी
 यावेळी हदगाव तालुक्यांसह ईतर ठिकाणावरून आदिवासी बांधवांनी एकच गर्दी केली होती. काल परवा भोकर आणि शंकरनगर येथील आदिवासी आश्रम शाळेतील मुलांना बेदम मारहाणीची घटना नुकतीच घडली असल्याने ही घटना घडणे म्हणजे प्रशासन या प्रकारच्या प्रकरणाचे गांभीर्य कितपत घेत आहे यावरून स्पष्ट दिसून येते. म्हणुन समस्त आदिवासी बांधवांनी  या प्रकरणाची विशेष बाब म्हणून शव विच्छेदन इन कॅमेऱ्यात करावी अशी मागणी करण्यात आली तसेच या प्रकरणात दोषी असणाऱ्या व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत पीडित मुलीस न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने जन आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 
 त्याचं बरोबर याच शाळेत या प्रकारच्या अनेक छोट्या मोठ्या प्रमाणावर घटना  मागिल काळात घडतच राहिल्या होत्या पण त्याला प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना न केल्यामुळेच ही दुर्देवी घटना घडल्याचे बोलल्या जात आहे.यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी श्रीमती भोसले नेहा, उपविभागीय पोलिस अधिकारी भोकर, हदगांव तालुक्याचे तहसीलदार श्री जिवराज डापकर, मनाठा येथील पोलीस निरीक्षक श्री विनोद चव्हाण , तामसा येथील पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे , आरोग्य अधिकारी मुरमुरे,यांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली. परंतु अद्याप मृत्यू नेमके चे कारण स्पष्ट झाले नाही ... अधिक तपास पोलीस प्रशानाच्या वतीने सूरू आहे.. यावेळी अनेक आदिवासी संघटनाचे प्रतिनीधी, पत्रकार बांधव उपस्थित होते.

Wednesday, 5 October 2022

महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी परमेश्वर सूर्यवंशी यांची निवड

महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी परमेश्वर सूर्यवंशी यांची निवड

जिल्हाध्यक्ष हिमांशु इंगोले यांच्या उपस्थित सपन्न झाली बैठक
हदगाव (प्रतिनिधी ) - हिमायतनगर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे दि . २ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष हिमांश अ.इंगोले यांच्या अध्यक्षेखाली  बैठक घेण्यात आली त्यात तर प्रमुख पाहण म्हणून नांदेड जिल्हा सचिव राजकमार भसारे या बैठकीस हजर होते.
बैठकीच्या सरवातीला भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान चे शिल्पकार लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली . त्यानंतर या बैठकित हिमायतनगर शहरा सह ग्रामीण भागात वेळोवेळी पत्रकारांच्या समस्या व गोर गरीब नागरीकांना लेखणीतून न्याय मिळून देण्यासाठी नेहमी अग्रेसर राहणारे नागोराव शिंदे पळसपरकर यांची ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी व करंजी येथील पत्रकार परमेश्वर सूर्यवंशी यांची हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी , उपाध्यक्ष गंगाधर गायकवाड सचिव पदी सनिल चव्हाण सल्लागार म्हणून आनंद जळपते कोषाध्यक्ष विनोद चंदनगे तर संघटक पदी विजय वाठोरे कृष्णा राठोड सहसचीव पदी निवड करण्यात आली .
उर्वरित कार्यकारनी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे परमेश्वर सूर्यवंशी यांनी सांगितले यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष हिमांश अ.इंगोले, जिल्हा सचिव राजक गरे, तस्रण भारत चे प्रतिनिधी मनोज पाटील, लोकपत्रचे दिलीप शिंदे, सामाजिक कार्यकर्ते मन्ना शिंदे, माधव कदम, राज गायकवाड, बाबराव जरगेवाड, पांडुरंग मिराशे, प्रशांत राहुलवाड सह आदि पत्रकार व कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते.

आम आदमी पार्टीची शाखा विस्तार बैठकीतचे हदगाव येथे आयोजन

आम आदमी पार्टीची शाखा विस्तार बैठकीतचे हदगाव येथे आयोजन
हदगाव (प्रतिनिधी) दि 09 ऑक्टोबर 2022 रविवारी सकाळी 10 वाजता आर्य समाज मंदिर हदगाव जि. नांदेड येथे आम आदमी पार्टी च्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे .
   भारत देशात सामाजिक राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे .शिक्षण , आरोग्य , रोजगार , लाईट , पाणी ,रस्ता , महिला सुरक्षा , बाल हक्क सुरक्षा , राशन , शेतीसाठी रस्ता-पाणी-लाईट व अन्य अत्यावश्यक सुविधा जनतेस फार कष्टाने व अपमानित होऊन मिळवाव्या लागत आहेत त्याही आवश्यक इतक्या दर्जेदार मिळत मिळत नाहीत . अनेक ठिकाणी अनियमितता व गैरप्रकार दिसून येत आहेत यास महाराष्ट्र राज्यातील जनता पूर्णपणे वैतागली आहे .अगोदर काँग्रेस - राष्ट्रवादी , नंतर सेना -भाजप , नंतर शिंदे -फडणवीस या सरकारानी पूर्णपणे जनतेचा विश्वासघात केल्याचे दिसून येत आहे .सदरील राज्यकर्त्यांनी केवळ आपला स्वतःचा स्वार्थ साधून घेऊन प्रचंड माया जमविली आणि आपल्या हितचिंतकाचे भले केल्याचे दिसून येत आहे . पैशातून निवडणूक जिंकणे आणि निवडणुकीतून अमाप पैसा संपत्ती मिळविणे हाच यांचा व्यवसाय दिसून येत आहे . शेतकरी , बेरोजगार , पूर्णतः उध्वस्त होत असल्याचे स्पस्ट झाले आहे .यास आता एकच पर्याय असल्याचे सर्वसामान्य नागरिक , युवक , युवती याचे म्हणणे आहे तो म्हणजे केजरीवाल व त्यांची आम आदमी पार्टी . दिल्ली , पंजाब या राज्याप्रमाणे शिक्षण-आरोग्य -लाईट -पाणी मोफत आणि बाकी व्यस्थेचे सुनियोजन सामाजिक न्याय हवा असेल तर आम पार्टी शिवाय दुसरा पर्याय नाही असे जनतेने मान्य केले आहे .म्हणून महाराष्ट्र राज्यात आम्हा सर्वांना मिळून आम आदमी पार्टीचे सरकार आणायचे आणि आपला विकास आपणच करून घेयायचा असा संकल्प जनतेनी केला आहे यास प्रत्येक्षात उतरविण्यासाठी त्या मार्गाने काम करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले आहे .तरी  सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे आपआपल्या ज्या जबाबदाऱ्या हव्या आहेत त्या  अधिकृतपणे स्वीकारून कार्य करावे असे आवाहन आम आदमी पार्टी च्या वतीने करण्यात आले आहे .यावेळी अनेक नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे..


Wednesday, 21 September 2022

हदगांव उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर दि २३ सप्टेंबर रोजी प्रहार च्या वतीने बांगड्या भेट व बोंबाबोंब आंदोलन

हदगांव उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर दि २३ सप्टेंबर रोजी प्रहार च्या वतीने बांगड्या भेट व बोंबाबोंब आंदोलन 
प्रा. गजानन गिरी
हदगाव ( प्रतिनिधी ) - उपोषणकर्त्यांना पाच दिवस उलटले असताना देखील शासनाकडून कोणतेच पावले उचलली जात नसल्याने अखेर प्रहार जिल्हा कमिटी कडून हदगाव येथील उपोषणाला भेट देऊन शासनाच्या नाकार्तेपणाला  कुठेतरी वचक बसावा म्हणून व उपोषणाला पाठिंबा म्हणून दिनांक 23 सप्टेंबर रोजी उपविभागीय कार्यालयासमोर जिल्हा कमिटीच्या वतीने तसेच प्रहार तालुका कमिटीच्या वतीने बांगड्या भेट व बोंबाबोंब आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 
याबाबत सविस्तर माहिती अशी की हदगाव तालुक्यातील  कल्याण टोल लि . या कंपनीने तालुक्यामध्ये अव्ययरीत्या गौण खनिज उत्खनन केले आहे अवैध्य उत्खननाची तात्काळ चौकशी करून संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे हदगाव तालुकाप्रमुख श्री अनिल दिगंबर कदम पाटील यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर दि१७  सप्टेंबर पासून आमरण उपोषण चालू केले आहे दखल घेऊन ठोस कारवाईची भूमिका घेत नसल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दि २३ सप्टेंबर रोजी हदगाव उपविभागीय कार्यालयातील कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना बांगड्या भेट देऊन बोंबाबोंब आंदोलन करणार येत असल्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दि२०/९२०२२ रोजी देण्यात आले आहे 
निवेदन देते वेळेस प्रहार जनशक्ती पक्षाचे नांदेड  जिल्हाप्रमुख विठ्ठलराव देशमुख , प्रहार जनशक्ती पक्षाचे कंधार तालुका प्रमुख माऊली गीते ,प्रहार जनशक्ती पक्षाचे हदगाव तालुका सचिव संदीप संदीप वानखेडे पाटील दगडवाडीकर , प्रहार चे युवा तालुकाप्रमुख भानुदास शिंदे , प्रहार चे हदगाव शहर प्रमुख
संतोष वाघमारे ,हदगाव तालुका प्रसिद्धीप्रमुख 
भगवान कदम यावेळी निवेदन देते वेळेस इतरही प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.

Wednesday, 10 August 2022

नविआबादी येथील विद्यार्थ्यानी हर घर तिरंगा प्रभातफेरीने दिला देशभक्तीच संदेश

नविआबादी येथील विद्यार्थ्यानी हर घर तिरंगा प्रभातफेरीने दिला देशभक्तीच संदेश


द्वारका कांबळे

हदगाव (प्रतिनिधी) - देशाला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने अशा अमृत महोत्सवाची माहिती नागरीकांना व्हावी म्हणून आणि देश अभिमान जागृत व्हावा म्हणून नविआबादी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्यावतीने मुख्याध्यापक अखिलेश पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगा रॅली काढून भारत मातेचा जय घोष करण्यात आला.


या बाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक ८ ऑगस्ट २०२२ रोजी जि. प. प्रा. शाळा नवी आबादी हदगाव येथे स्वातंर्त्याचा अमृतमहोत्सवानिमित्त बाल सभेचे आयोजन करण्यात आले होते .या बाल सभेचे अध्यक्ष म्हणून काजल मरलीधर जाधव या विद्यार्थिनीने तसेच उपाध्यक्ष म्हणून आदित्य बेलखेडे या विध्यार्थाने कामकाज पाहिले. तसेच नवनाथ जोनापल्ले या विद्यर्थ्याने स्वातंर्त्याचा अमृत महोत्सव याचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व इतर विद्यार्थ्यांनी सद्धा या बाल सभेत आपले मनोगत व्यक्त केले.यानंतर शाळेचे मख्याध्यापक श्री पठाण सर यांनी भारतीय ध्वज तिरंगा बाबत विद्यार्थ्यांना सखोल माहिती सांगितली. त्याच प्रमाणे ९ ऑगस्ट रोजी जि .प .प्रा शा .नवी आबादी हदगाव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त जनजागृती म्हणून हरघर तिरंगा रॅली काढण्यात आली. ही रॅली नवी आबादी , भिमाई नगर व वाजपेयी नगर हदगाव येथून काढण्यात आली .त्यानंतर शाळेत आल्यावर विद्यार्थ्यांना श्री नाल्हे सर यांनी या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आपणास आणखी कोणकोणते उपक्रम घ्यायचे आहे व या अमृत महोत्सवाचे महत्त्व काय आहे हे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. यावेळी उपस्थित श्री मख्याध्यापक पठाण सर यांनीसद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी शाळेतील श्री कऊळकर सर, श्री शिंदे सर , श्री भिसे सर, श्रीमती जाधव मॅडम व श्री सोनकांबळे सर उपस्थित होते.

Sunday, 7 August 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतास मोठ्या संख्येनी उपस्थित रहा- खासदार हेमंत पाटील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतास मोठ्या संख्येनी उपस्थित रहा- खासदार हेमंत पाटील

नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील शिवसैनिकांना केले आवाहन
प्रा. गजानन गिरी
हदगाव (प्रतिनिधी) - राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (ता.आठ) नांदेड आणि हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत. सोबतच दोन्ही जिल्ह्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन देखील करणार आहेत सोबतच कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहावे, असे आवाहन हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड येथील विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते सचखंड श्री हूजूर साहेब गुरुद्वाऱ्यात जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर तरोडा नाका भागातील गोदावरी अर्बन सहकारी संस्थेच्या सहकारसूर्य या मुख्यालयास भेट देणार आहेत. नांदेड उत्तर चे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या प्रयत्नांने सुरू असलेल्या निळारोड (गुरुजी चौक) येथे एका विकास कामाचे भूमिपूजन, पासदगाव आसना नदीवरील पुलाचे भूमिपूजन अश्या विविध विकास कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे तसेच  नांदुसा येथील पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी करण्यासोबतच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना दिलासा देणार आहेत. त्यानंतर भक्ती लॉन्स येथे होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यास मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत. 
नांदेड जिल्ह्यातील कार्यक्रम आटोपुन मुख्यमंत्र्यांचा ताफा आसनामार्गे अर्धापूर, वारंगा, बाळापूर, कळमनुरी, हिंगोली येथे पदार्पण करणार आहेत. हिंगोली येथे आमदार संतोष बांगर यांनी आयोजित केलेल्या कावड यात्रेत मुख्यमंत्री सहभागी होणार असून, त्यानंतर कार्यकर्ता मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. पुढे लिंबाळामार्गे औंढा (ना.) येथील औंढा नागनाथ देवस्थानचे दर्शन घेऊन मालेगाव मार्गे पुन्हा नांदेड कडे परतणार आहेत. नांदेडहून विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहेत.

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच नांदेड मध्ये
हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. विकासाच्या बाबतीत नेहमी पुढाकार घेणारे एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामुळे सामान्य नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा सर्वांसाठी ऊर्जा देणारा असा अविस्मरणीय ठरणारा आहे. तेव्हा जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार हेमंत पाटील, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी केले आहे.

नांदेड – हिंगोली जिल्ह्याचा रखडलेला विकास पुन्हा झपाट्याने सुरु होईल.
मुळात एकनाथ शिंदे हे एक सामान्य लढाऊ कार्यकर्ता म्हणून नावारुपाला आलेलं उद्योन्मुख नेत्रत्व आहेत. आजपर्यंत त्यांनी विकास कामास प्राधान्य दिले आहे. आज ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने पहिल्यांदा त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रक्रिया केंद्रास 100 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. आहेत. त्यामुळे नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील रखडलेले विकास कामे पुन्हा वेगाने सुरु झाल्याने हिंगोली  ,नांदेड  व यवतमाळ जिल्ह्यातील सर्वसामन्यांच्या आशा उंचावल्या आहेत.
                                        खासदार हेमंत पाटील

Saturday, 16 July 2022

आमदार केराम यांच्या प्रयत्नाला यश; श्री दत्त शिखर मंदिर मार्ग व श्री अनुसयामाता मंदिर रस्त्यासाठी तब्बल ६ कोटी मंजूर

आमदार केराम यांच्या प्रयत्नाला यश; श्री दत्त शिखर मंदिर मार्ग व श्री अनुसयामाता मंदिर रस्त्यासाठी तब्बल ६ कोटी मंजूर
माहुर ; (प्रतिनिधी) - साडेतीन शक्तिपीठांपैकी मूळपीठ म्हणून लाखो भक्तांचे श्रध्दस्थान असलेल्या श्री रेणुकादमाता  व श्री दत्त प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र माहुर येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात परंतू त्यांना हव्या तशा सोई सुविधा आजवर कोणत्याही लोकप्रतिनिधींनी उपलब्ध करून दिली नव्हती परंतू केंद्रीय दळणवळण मंत्री तथा देवीचे निस्सीम भक्त नामदार नितीन गडकरींनी श्रीक्षेत्र माहुरला राष्ट्रीय महामार्गाशी जोडून भाविक भक्तांना येण्याजाण्यासा़ठी मोठी रस्त्यांची साखळी निर्माण केली. 
परंतू अनेक वर्षांपासून प्रलंबित महामार्ग ते दत्त शिखर मंदिर मार्ग व श्री अनुसयामाता मंदिर मार्ग हा जिल्हा परिषद अंतर्गत येत असल्याने व जिल्हा परिषद सदस्यांच्या उदासीनतेमुळे  याची दखल घेण्यात आली नव्हती,आमदार केरामांनी सदरील रस्त्याचा समावेश व श्रेणी वाढ करून घेऊन सदरील रस्त्यासाठी तब्बल ६ कोटी रूपये शासनाकडून मंजूर करून घेतले आहे. त्यामुळे या गुरूपोर्णिमेला आमदार केराम यांचेकडून श्रीदत्तगुरू चरणी गुरूदक्षिणेच्या रूपाने हे दोन प्रलंबित रस्त्यांसाठी मंजूरी घेऊन भाविक भक्तांना मोठा दिलासा दिला आहे. 
सध्या केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे त्यामुळे किनवट माहुर तालुक्यात भाजपा आमदार भीमराव केराम यांच्या हातून भविष्यात अनेक विकासकामे श्रीक्षेत्र माहूरगडावर करण्यात येणार आहे यात शंका नाही. 
यासाठी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते योगी शाम भारती महाराज, माजी उपनगराध्यक्ष अनिल तिरमनवार, जिल्हा उपाध्यक्ष सुमित राठोड, जिल्हा चिटणीस अनिल वाघमारे,किनवट-माहुर विधानसभा संयोजक अॅड रमन जायभाये, पत्रकार प्रकोष्ट जिल्हध्यक्षा पदमा गुरे, तालुका अध्यक्ष दिनेश येऊतकर, शहराध्यक्ष गोपू महामुने, नंदकुमार जोशी, भाजपा प्रवक्ता विजय आमले,आदिवासी आघाडीचे तालुका अध्यक्ष संजय पेंदोर, महिला शहराध्यक्षा सौ. अर्चना राजू महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्षा सौ. निर्मला अशोक जोशी तसेच श्रीदत्त शिखर संस्थानचे व्यवस्थापक ऐड. उज्वल भोपी आदींनी विशेष आभार मानून आमदार केरामा़ंचे अभिनंदन केले आहे.

Thursday, 30 June 2022

वीज पडून मृत्यू पावलेल्या शेतकर्यांचे कुटुंबियांना 4 लक्ष रुपये चा धनादेश सुपूर्द

वीज पडून मृत्यू पावलेल्या शेतकर्यांचे कुटुंबियांना 4 लक्ष रुपये चा धनादेश सुपूर्द
माहूर (.विनोद भारती)  - शेतातील भुईमुगाचे कुटार झाकण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू पावल्याची घटना दि 19 मे रोजी सकाळी 7: 30 वाजता  माहूर तालुक्यातील पालाईगुडा येथे घडली.किरण गेमसिंग जाधव वय 40 वर्षं असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.सदरील शेतकऱ्याच्या कुटुंबियांना 4 लक्ष रुपये चा धनादेश माहूर तहसील प्रशासनाच्या वतीने आज सुपूर्द करण्यात आला.
तालुक्यातील पानोळा हे येथील शेतकरी किरण गेमसिंग जाधव वय 40 वर्ष व त्यांची पत्नी विद्या हे दोघे दि.19 मे रोजी सकाळी 7 : 30 वाजेच्या दरम्यान पालाईगुडा (भोरड) येथील शेतकरी गणेश नरसिंग राठोड यांच्या शेतात भुईमुगाचे कुटार झाकण्यासाठी गेले असता अचानक विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला. या दरम्यान शेतात भुईमूग कुटारचा ढीग झाकण्याचे काम करीत असताना किरण गेमसिंग जाधव यांच्या अंगावर वीज पडल्याने तो बेशुद्ध झाला त्यास तातडीने माहूर च्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.त्यांची प्रकृती चिंताजनक वाटत असल्याने पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.
याबाबत सिंदखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. व महसूल प्रशासनाने पंचनामा करून रितसर प्रस्ताव शासनाकडे  पाठवला. भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र राज्य चे सरचिटणीस धरमसिंग राठोड यांनी संबंधित लाभार्थ्यांस शासकीय मदत मिळावी यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. तबल दीड महिन्याच्या कालावधी नंतर  संबंधित इसमाच्या कुटूंबियांना शासकीय मदत मिळाली.
यावेळी माहूर चे तहसीलदार किशोर यादव, मंडळ अधिकारी जी. पी.पडकोंडे,तलाठी व्ही.पी.राजूरवार आदींच्या उपस्थितीत मयत किरण जाधव यांची पत्नी विद्या किरण जाधव यांना 4 लक्ष रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.यावेळी पानोळा येथील सेवा सहकारी सोसायटी चे माजी चेअरमन संजय कुमरे, प्रल्हाद राठोड, निरंजन राठोड, सामाजिक कार्यकर्ते रवी पराते आदी उपस्थित होते.


-

आनंद दत्तधाम आश्रमात वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

आनंद दत्तधाम आश्रमात वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप 
दत्ता महाराज बितनाळकर पुण्यतिथी उत्साहात हजारो भक्तांचा मेळा

माहूर (प्रतिनिधी ) -
 माहूर येथील  आनंद दत्तधाम आश्रम उर्फ वसमतकर मठ येथे दि. २७ जून रोजी विविध कार्यक्रम संपन्न झाले. त्यामध्ये वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार  व महाप्रसाद  आदी कार्यक्रमांचा समावेश होता. आनंद दत्त शाम आश्रम माहूर यांच्या वतीने माहूरगडावर गेल्या २५ वर्षापासून दैनंदिन अन्नदानाची परंपरा अविरतपणे सुरु असून कोरोना कालावधीत माहूर शहरात मोठ्या प्रमाणात गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व आवश्यक धनधान्य मठाच्या वतीने पुरविण्यात आले. तर ग्रामीण रुग्णालयात भरती रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळचे भोजन मोफत पुरविण्याचा उपक्रम सुरु केला. स्वच्छता अभियान राबविले. वृक्षारोपणचे उपक्रम सुरु केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा  गुरुकुंज आश्रम मोझरी ते राष्ट्रपिता महात्मा  गांधी यांच्या सेवाग्राम आश्रम वर्धा पर्यत सप्तसूत्री उपक्रम राबवून गुरुसंदेश पदयात्रा व संत बाळगीर महाराज स्वच्छता दिंडी च्या माध्यमातून भक्तांना आदर्श जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या स्वच्छता, शिक्षण, महिला बचत, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, शेतकरी आत्महत्या, जीवाचा उद्धार,आदी विषयावर कीर्तन, प्रवचनातून उपदेश केला. 

द.भ.प. साईनाथ महाराज यांनी झोळी खांद्यावर घेऊन राज्यभर व्यसनमुक्ती व दुर्गुणमुक्तीचे दान मागण्याचा संकल्प केला.  कोरोना प्रतिबंधक लसीकरण कॅम्पचे आयोजन करून लसीकरण मध्ये सहभाग घेतला. आश्रमाच्या वतीने वसमत, महागाव, सवना,  मुदखेड,  येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळचे मोफत भोजन आनंद दत्त धाम आश्रम माहूरशी संलग्न असलेल्या मठांच्या माध्यमातून  देण्याचा उपक्रम राबविण्यात येते. दोन वर्ष कोरोना  महामारीच्या अनुशंगाने प्रशासनाच्या प्रतिबंधामुळे नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करता अली नव्हती परंतु यावर्षी निर्बध खुले झाल्याने राज्यभरतील शिष्यमंडळीनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. कार्यक्रमास सीताराम ठाकरे पाटील, वसमत शिवसेना प्रमुख प्रभाकर क्षीरसागर, निळकंठ पाटील, भाऊराव पाटील, कॉंग्रेस माहूर तालुका प्रवक्ते जयकुमार अडकीने, रमेश तमखाने, विलास पाटील रोहीपिंपळगावकर, दिलीप पाटील कोपरकर,  गजानन कलाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय माहूर चे एस. आर. देशमुख, सी. पी. जोशी, दवणे, राठोड, कातले  आदिसह  बहुसंख्य शिष्यमंडळी विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थित होती.

  द.भ.प. साईनाथ महाराज बितनाळकर यांच्या सुश्राव्य कीर्तन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी गणित विषयक मार्गदर्शक पुस्तिका प्रा. वानखेडे यवतमाळ लिखित व प्रकाशित मॅथ३६० या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.  सकाळपासूनच महाप्रसाद कार्यक्रम सुरु होता.

Tuesday, 7 June 2022

माहूर नगरपंचायतीने रस्त्यावर टाकलेले भंगार केले जप्त

माहूर नगरपंचायतीने रस्त्यावर टाकलेले भंगार केले जप्त 
नागरीकांनी रस्तयात असलेले बांधकाम साहीत्य त्वरीत हटवावे - मुख्याधिकारी किशोर यादव. 
माहूर (प्रतिनिधी) शहरातील मुख्य रस्त्याच्या कडेला भंगार साहीत्य खरेदीची दुकाने थाटली असून शहरातील रस्त्यावर प्रचंड प्रमाणात भंगार साहित्य टाकून रहदारीस अडथळा निर्माण केला ज्यामुळे रस्त्याने येजा करणाऱ्या नागरिकांसह वाहनास अडथळा निर्माण केल्यामुळे शहरातील सूज्ञ नागरिकांनी नगर पंचायतकडे तोंडी व, लेखी तक्रारी करुन सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यावरील भंगार साहित्य त्वरीत हटवण्याची मागणी केली.त्या मागणीची दखल घेत सदर दुकाने शहराबाहेर हटविण्याबाबत भंगार खरेदी करणाऱ्या व्यावसायिकांना नगर पंचायत प्रशासनाचने सूचना (नोटीस)तामील केल्या होत्या 20 दिवसाच्या कालावधीनंतरही संबधित व्यवसाईकांनी भंगार साहित्य हटविले नासल्याने तहसिलदार तथा मुख्याधिकारी किशोर यादव यांच्या आदेशानुसार कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी यांच्या नेत्रूत्वात नगर पंचायतीच्या पथकाने दिनांक 7मे 2022 मंगळवार रोजी सकाळी 12 वाजताचे दरम्यान रस्त्यावर असलेले भंगार साहीत्य जप्त केले. उप अधिक्षक सुनिल वाघ, देविदास जोंधळे, देविदास सिडाम,विशाल ढोरे, विजय शिंदे, सुरेंद्र पांडे, स्वच्छतादूत गणेश जाधव, नय्युम पाशा, सहभागी झाले होते, या कारवाईप्रमाणे शहरातील हमरस्त्यावर सूरू असलेले पोल्ट्री फार्म, व शहरात सर्वत्र अतिशय क्रूरपणे होणारी कोंबडी, बकऱ्यांची कत्तल करुन उघड्यावर होणारी मांस विक्री, भररस्त्यात बिनदिक्कतपणे उभी असलेली वाहने, बांधकाम साहीत्य हटविण्यात यावे अशी माहूरवासियांकडून अपेक्षा व्यक्त केली जात असून याबाबत तहसिलदार तथा मुख्याधिकारी किशोर यादव यांना विचारणा केली असता जागा उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रयत्न सूरू असून जागा उपलब्ध झालेवर मांसविक्रीची दुकाने शहराबाहेर घालविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. असे असले तरी नागरीकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी उघड्यावर मांस विक्री करणार्‍या दुकानावर कठोर कारवाई करणार की त्यांना पाठीशी घालणार याकडे शहरातील नागरीकांचे लक्ष लागले आहे .

Sunday, 5 June 2022

सुभाष सटवाजी ढगे सेवानिवृत्त

सुभाष सटवाजी ढगे सेवानिवृत्त
द्वारकाबाई कांबळे
हदगाव (प्रतिनिधी ) -  विदु्यत महावितरण ,सहाय्यक अभियंता शाखा कार्यालय तामसा (शहर) मध्ये कार्यरत ‍असलेले श्री सुभाष सटवाजी ढगे (लाईनमन) हे नियत वयोमानानुसार दि.३१/०५/२२रोजी ३९ वर्षाच्या प्रदिर्घ सेवा करुन सेवानिवृत्त झाले त्याचा उपविभागिय कार्यालय महावितरण हदगाव येथे उप- कार्यकारी अभियंता ढवळे साहेब यांच्या हस्ते  सपत्नीक सत्कार  करण्यात आला. यावेळी महावितरणचे कर्मचारी अविनाश खंदारे ,कुंटुरकर साहेब ,सोनसळे साहेब, पठाणसाहेब ई.कर्मचारी  व कुंटुबिय उपस्थित होते.

माहूरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात संपन्न

माहूरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात संपन्न 
  महिलांनी अहिल्यादेवी होळकरांचा आदर्श घ्यावा-  तासके

माहूर ( प्रतिनिधी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती स्थानिक कपिलेश्वर धर्मशाळेच्या प्रांगणात धनगर समाजाचे नेते विलास गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष फिरोज दोसानी, भाजपा नेते अॅड रमण जायभाये,, भाजपा तालूका अध्यक्ष अॅड दिनेश येउतकर, डॉ. निरंजन केशवे, नगरसेवक गोपू महामूने, राजू सौंदलकर, दिलीप मूनगीनवार, अनिल वाघमारे, बालाजी बामने यांच्या प्रमूख उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भाजपा तालूका अध्यक्ष अॅड दिनेश येउतकर, भाजपा नेते तथा विधानसभा संयोजक अॅड रमण जायभाये, डॉ. निरंजन केशवे, नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच धनगर समाज संघटनेचे प्रवक्ते तासके यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जिवन चरित्रावर आधारीत सखोल मार्गदर्शन। केले  महिलांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तत्पूर्वी माहूर शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पुण्यश्लोक अहील्यादेवी चौकाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.यावेळी द पॉवर ऑफ मिडीयाचे तालूका अध्यक्ष विजय आमले, पत्रकार जयकुमार अडकीने, गणेश चव्हाण,हिंगाडे, नंदकुमार जोशी, वसंत कपाटे,मंदाबाई हिंगाडे तोडसाम,मारकड,यांचेसह समाज बांधव उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रूईचे सरपंच नीळकंठ मस्के, शरद भडंगे यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी मनबे यांनी केले तर संतोष गंध यांनी आभार मानले.

लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांच्या उपस्थितीत अमोल पाटील कदम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांच्या उपस्थितीत अमोल पाटील कदम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
संदिप गिरी
 हदगाव( प्रतिनिधी) - हदगाव: माधवराव पाटील देवसरकर साहेब याचे कट्टर समर्थक तसेच स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड चे तालुका उपअध्यक्ष अमोल पाटील कदम याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
  हदगाव हदगाव शहरातील शासकीय विश्रामग्रह येथे  शिवसेनेचे शिवसेनेचे माजी जिल्हा अध्यक्ष तथा लोकनेते बाबुराव  कदम कोहळीकर यांच्या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस साजरा करण्यात आला.  वाढदिवसाच्या वेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष गजानन पाटील तसेच .तालुका अध्यक्ष संदिप गिरी,, दासराव चव्हाण, सरपंच प्रतिनिधी श्याम पाटील बोरगांवकर, बबनराव कदम, सूरज सोनू, शिवम पोधाडे, आब्रस पठाण, माधव पाटील पवार, कृष्णा सूर्यवंशी, अमोल पाटील यांची उपस्थिती होती .

Saturday, 23 April 2022

प्रा. नरसिंग पिंपरणे यांना पीचडी प्रदान

        प्रा. नरसिंग पिंपरणे यांना पीचडी प्रदान 
नांदेड (प्रतिनिधी) -- वसमत  येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे शिक्षक प्रा. नरसिंग पिंपरणे यांना पीएच.डी. प्राप्त झाली. त्यांनी डॉ.राजपालसिंग चिखलीकर यांच्या
मार्गदर्शनाखाली “द पोयल ऑफ द सबाटुन इन द सिलेक्ट नॉव्हेल्स ऑफ गुरदीयाल
सिंग” हा प्रंबध सादर केला होता. त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष  माजी मंत्री जयप्रकाश
दांडेगावकर,नांदेड महापालिकेचे मा. ऊपायुक्त तथा
विधी अधिकारी अजितपालसिंघ संधु, सतिश कंठाळे नांदेड शहरातील मित्र चरणकमलजितसिंग जहागीरदार, जसपालसिंग कोल्हापुरे, सरबदीपसिंग, कुलदीपसिंग अखबारवाले, सुरिंदरपालसिंग बंशबुंगई, सदाशिव हाळदे, भगवानसिंग यांनी अभिनंदन केले.

Thursday, 21 April 2022

ग्रामीण रुग्णालय माहूर येथे आरोग्य मेळावा संपन्न .

ग्रामीण रुग्णालय माहूर येथे आरोग्य मेळावा संपन्न .
 शासनाच्या विविध योजनांचा जनतेने लाभ घ्यावा. तहसिलदार किशोर यादव. 

विनोद भारती
माहूर (प्रतिनिधी) गोरगरीब जनतेला आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी केंद्र 
सरकारतर्फे आजादीका अमूर्त महोत्सव या योजनेला अनुसरून संपूर्ण देशात दिनांक 18 एप्रिल 2022 ते 22 एप्रिल या कालावधीत  तालूका स्तरावर आरोग्य मेळावे आयोजीत करण्याबाबत सूचना दिल्या त्या अनुषंगाने दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी ग्रामीण रुग्णालय माहूर येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नीळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार किशोर यादव यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष फिरोज दोसानी, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड,,नगरसेवक गोपू महामूने,  नगरसेविका सौ. कविता राजू सौंदलकर, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख जोतिबा खराटे , रुग्ण कल्याण समिती सदस्य अनिल वाघमारे, किशन राठोड, शहर प्रमूख निरधारी जाधव, गोर सेनेचे प्रफुल्ल जाधव, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव,आकाश कांबळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आरोग्य अभियान मेळाव्यास सुरवात करण्यात आली .
यावेळी  ग्रामीण रुग्णालयातर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. वाघमारे यांनी केलेल्या प्रास्ताविकातून या मेळाव्यात  विविध आजार विषयक उपचार व उपलब्ध असलेल्या सुविधा तसेच पंतप्रधान जन सुरक्षा योजनेचे कार्ड, मरणोत्तर अवयवदान,ईत्यादीबाबत   मार्गदर्शन केले, पाचशे छत्तीस रुग्णांनी या मेळाव्याचा लाभ घेतला .राजकीय बडे नेते, अधिकारी यांनी या मेळाव्याकडे जाणीवपूर्वक नेहमीच्या सवयीप्रमाणे पाठ फिरवली असल्याने यांना निमंत्रित करण्याची गरजच काय असा प्रश्न उपस्थित करून रुग्ण कल्याण समिती सदस्य तथा जेष्ठ पत्रकार नंदू संतान यांनी गैरहजर कर्मचार्‍यांना कारने दाखवा नोटीस पाठवून त्यांचेवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी तहसिलदार किशोर यादव यांचेकडे करून खंत व्यक्त केली नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी नियोजित मेळाव्याचा प्रचार व प्रसार करणे कामी रुग्णालय प्रशासन कमी पडल्याने रुग्णसंख्या कमी असल्याचे मत व्यक्त केले. मेळाव्याचे अध्यक्ष तहसिलदार किशोर यादव यांनी  शासनाकडून आरोग्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले विशेष बाब म्हणजे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांना रोजा असताना सुद्धा त्यांनी रक्तदान करून समाजासमोर आदर्श निर्माण केला तसेच तहसीलदार किशोर यांनी देखील रक्तदान केले. विशेष बाब म्हणजे या  मेळाव्यात सहभागी झालेल्या रूग्ण व अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी पुरी भाजी व शिरा भोजनाची व्यवस्था साईनाथ महाराज वसमतकर या सेवाभावी संस्थेकडून मोफत करण्यात आली होती. त्या बद्दल वसमतकर मठाचे मुनीम तथा विश्वस्त भाउ पाटील (हडसनीकर) यांचे तोंडभरून कौतुक करत रुग्णालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अभिजित अंबेकर यांनी केले तर वैद्यकीय अधिक्षक डॉ व्यंकटेश भोसले यांनी सर्वांचे आभार मानले.

Tuesday, 5 April 2022

येवली येथील पल्लवी च्या विवाहाला साईप्रसाद बळीराजा चेतना अभीयानातुन मदतीची सामाजिक बांधिलकी

येवली येथील पल्लवी च्या विवाहाला साईप्रसाद बळीराजा चेतना अभीयानातुन मदतीची सामाजिक बांधिलकी
हदगाव (प्रतिनिधी ) - तामसा येथुन आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजे येवली ता.हदगांव येथील विठ्ठल सहदेव चोढेंकर यांना एक हेक्टर कोरडवाहू जमीन असुन  पाचही मुलीच आहेत. शेती व मजुरी करून दोन मुलीचा विवाह केला.तिसरी मुलगी पल्लवी हिचा विवाह केदारनाथ येथील मुलांशी विवाह जुळला असुन पंधरा एप्रिल रोजी छोटेखानी विवाह ठरला . पहिल्या दोन  मुलीचे कर्ज डोक्यावर असताना तिसऱ्या  मुलीच लग्न ठरले.प्रत्येक मुलीला आपल्या विवाहाला काही तरी साहित्य असावे वाटते पण परिस्थितीमुळे साहित्य खरेदी करण्यासाठी अडचण आली असल्याची माहिती त्यांनी  साईप्रसाद परीवाराला दिली. 
गेल्या काही वर्षांपासून अनेक ठिकाणी गरजु कुटुंबासाठी मदत करीत गेल्या तीन काही महिन्यांपासून साईप्रसाद परीवाराकडुन नांदेड जिल्हा शेतकरी आत्महत्या मुक्त करण्यासाठी सुरू केलेल्या साईप्रसाद बळीराजा चेतना अभियानांतर्गत देश विदेशातील दानशूर व्यक्तींच्या दायीत्वाने मंगळवारी पाच रोजी पल्लवी च्या घरी नेहमी प्रमाणे कोणताही चेहरा समोर न येता निस्वार्थी पणाणे विवाहाच्या दहा दिवस अगोदर गोदरेज आलमारी गाधी पंलग संसार उपयोगी सर्व भांडी देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली. घरी आलेले साहित्य बघुन कुटुंबाला आनंदाला पारावार उरला नाही.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य राजेश फुलारी राजवाडीकर, राजकुमार वाकोडे, कंठाळे, शिंदे  राजु पांडे, पत्रकार बंडु माटाळकर, रामराव मोहीते, राजु पांचाळ रेणापूर, प्रभाकर दहीभाते, यांच्या गावातील प्रतिष्ठित

इतिहास विभागाच्या वतीने ऑनलाईन राष्ट्रीय सेमिनार संपन्न

इतिहास विभागाच्या वतीने ऑनलाईन राष्ट्रीय सेमिनार संपन्न.

हदगाव (प्रतिनिधी ) : नायगाव बाजार येथील शरदचंद्र महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि आयक्यूएसी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सवानिमित शिवाजी महाराजांचे स्त्रीविषयक विचार या विषयावर एकदिवसीय ऑनलाईन सेमिनार दि.5 एप्रिल, 2022 रोजी घेण्यात आले या सेमिनारच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. हरीबाबू हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एज्युकेशन सोसायटी नायगाव बा. चे सचिव प्रा. रविंद्र चव्हाण हे होते. या समिनारचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदडचे अधिष्ठाता प्रो.डॉ. अजय टेंगसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमूख वक्ते प्रो.नितीनकुमार बावळे हे होते तर प्रमुख मार्गदर्शकाच्या भुमिकेत प्रो. डॉ. रामभाऊ मुटकुळे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. मुटकुळे म्हणाले की, भारतामध्ये आजही स्त्रीला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळाले नाही. स्वतःच्या घरापासूनच स्त्रीला स्वावंलंबी बनवून तिला सबळ बनविले पाहीजे तरच या देशात स्त्रीचा सन्मान होईल आणि छ. शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉ.के. हरीबाबू यांनी अतिशय महत्वाची माहीती दिली. भारतात पुर्वी महिलांचा सन्मान व्हायच्या देवीच्या रुपामध्येही त्यांना आपण सन्मान देतो . शिवाजी राजांना सर्व भारतभर आदर्श राजा मानतो तर मग शिवाजी राजांनी ज्या पद्धतीने स्त्रीयांचा सन्मान केलेला आहे त्यांना न्याय दिलेला आहे त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांना जीवनभराची अद्दल घडविली त्याच पध्दतीने त्यांचे अनुयायी कार्य केल्यास भारतात कधीच महिला, असहाय आणि मागास घटकावर कधीच अन्याय अत्याचार होऊ शकत नाहीत. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस इतिहास विभागाचे प्रमूख प्रो. डॉ. दादाराव पानपट्टे यांनी प्रास्ताविक मांडले.आयक्यूएसी चे समन्वयक प्रा. अमितकुमार पांडे आणि नॅकचे समन्वयक प्रा.डॉ. वैभव कवडे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तांत्रिक सहकार्य केले. इतिहास विभागातील प्रा. काठेवाडे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिले. सुंदर संचलन प्रा.डॉ. साईनाथ वाघमारे यांनी केले तर उपस्थित सर्वांचे  आभार प्रा.बालाजी गायकवाड आणि प्रा. साहेबराव गाणारकर यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ. श्याम पाटील, प्रो. डॉ. प्रकाश नांगरे, प्रो. बलभीम वाघमारे, प्रा.डॉ. शंकर गड्डमवार, प्रा.डॉ.एन.पी. सानप, प्रा.डॉ. सिद्दीकी, प्रा.डॉ. संजय भालेराव,प्रा.डॉ. राऊतखेडकर मॅडम,ग्रंथपाल डॉ.बी.आर. लोकलवार, प्रा.डॉ. शिंदे मॅडम, प्रा.डॉ. वाडीकर मॅडम, प्रा.पांगरकर मॅडम, प्रा.डॉ. गोविंद परडे, प्रा.डॉ.पी.जी. धुमाळे, प्रा. संजय गायकवाड,प्रा.डॉ. शेटकार, प्रा.पंढरी गायकवाड, प्रा. कमलाकर, प्रा.सुभाष गायकवाड यांच्यासह महाविद्यालयाचे अधिक्षक प्रशांत बिलवणीकर व सर्व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्ममहोत्सव समितीच्यावतीने राणीसावरगाव येथील शाळेत बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्ममहोत्सव समितीच्यावतीने राणीसावरगाव येथील शाळेत बक्षीस वितरण समारंभ उत्साहात 
नांदेड (प्रतिनिधी) - श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व घटकांना सोबत घेऊन साजरी करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य माधव जाधव यांनी सुचवलेल्या पद्धतीने नियोजन करून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला समस्त गावकार्‍यांच्या वतीने पूजन करून पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. यात सर्व तरुणांनी एकच गनवेश घालून गावातील उपस्थित सर्वांना फेटे बांधून मिर्वणुकीत शिवाजी महाराजांचे मावळे, ढोल ताशा पथक,लेझिम पथक, बँड पथक, घोडदळ व टाळ मृदूंग असलेले वारकरी घेऊन हजारोजनसमुदयाच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली.
तसेच शालेय विद्यार्थासाठी शिवचरित्रवार आधारित सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन केले होते. त्यात गावातील सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदवाला होता. या परीक्षेत सर्वाधिक बक्षीसे श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रायमरी इंग्लिश स्कुल व उच्च प्राथमिक-माध्यमिक विद्यालयाच्या सर्वाधिक नऊ विद्यार्थांनी प्रथम द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरचे दोन विद्यार्थी, जिल्हा परिषद विद्यालयाचे दोन विद्यार्थी, सवित्रीबाई फुले आश्रम शाळेचा एक विद्यार्थी व राजमाता जिजाऊ आश्रम शाळेच्या एक विद्यार्थांनी प्रथम द्वितीय क्रमांकाचे बक्षीसे मिळवले *ज्यात छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थिनीन पवार गीतांजली राजेभाऊ ही सर्वाधिक 84 गुण घेत प्रथम क्रमांक मिळवला तर*
एकून 3 गटात 15 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे त्यांना बक्षीस स्वरूपात छावा, संभाजी, ययाती, मृत्युंजय, पानिपत,आसूड असे विविध कादंबर्‍या बक्षीस म्हणाणून देण्यात आले त्याचे विवरण पुढील प्रमाणे.. (गट 1 ला - वर्ग 4,5,6) 
प्रथम क्रमांक - कृष्णा राम डोणे (वर्ग 6 वा, सावित्रीबाई फुले प्राथमिक आश्रम शाळा) (मार्क 60)
प्रथम क्रमांक - प्रांजली रघुनाथ केंद्रे (वर्ग 6 वा, श्री छत्रपती शिवाजी प्रायमरी इंग्लिश स्कूल) (मार्क 60)
प्रथम क्रमांक - सृष्टी बापुराव वावरे (वर्ग 6 वा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालय) (मार्क 60)
प्रथम क्रमांक - ञिभुवन संगमेश्वर इरगुंडे (वर्ग 5 वा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालय) (मार्क 60)
द्वितीय क्रमांक - समर्थ बालाजी जाधव (वर्ग 5 वा, जि. प.प्र.शाळा) (मार्क 58)
द्वितीय क्रमांक- राणा गणेश मेकडे (वर्ग 6 वा, श्री छत्रपती शिवाजी प्रायमरी इंग्लिश स्कूल) (मार्क 58)
द्वितीय क्रमांक - संकेत तुकाराम कदम (वर्ग 6 वा, श्री छत्रपती शिवाजी प्रायमरी इंग्लिश स्कूल) (मार्क 58)
(गट 2 रा - वर्ग 7,8) प्रथम क्रमांक - पवार गीतांजली राजेंद्र (वर्ग 8 वा, श्री छत्रपती शिवाजी प्रायमरी इंग्लिश स्कूल) (मार्क 84) द्वितीय क्रमांक - प्रेरणा भारत जाधव (वर्ग 7 वा, श्री छत्रपती शिवाजी प्रायमरी इंग्लिश स्कूल) (मार्क 80) (गट 3 रा वर्ग - 9,10) प्रथम क्रमांक - प्रदीप अनुरथ भोसले (वर्ग 9 वा, राजमाता जिजाऊ आश्रम शाळा) (मार्क 74)  द्वितीय क्रमांक - श्वेता बाळासाहेब कदम (वर्ग 9 वा, श्री छत्रपती शिवाजी प्रायमरी इंग्लिश स्कूल) (मार्क 68) द्वितीय क्रमांक - पुंडलीक राम धापसे (वर्ग 9 वा,श्री छत्रपती शिवाजी प्रायमरी इंग्लिश स्कूल) (मार्क 68) द्वितीय क्रमांक - गुडदे मधुकर हनुमंत (वर्ग 9 वा, श्री छत्रपती शिवाजी प्रायमरी इंग्लिश स्कूल) (मार्क 68) द्वितीय क्रमांक - देवानंद नागोराव जिलेवाड (वर्ग 10 वा, जि.प .प्र .शाळा)(मार्क 68) द्वितीय क्रमांक - प्रज्ञा बालाजी जाधव (वर्ग 9 वा,जि. प. प्र .शाळा) (मार्क 68) या पद्धतीने बक्षीस मिळवलेल्या विद्यार्थी व पालकांचा गौरव व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन जयंती मंडळाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय राणीसावरगाव येथे दिनांक 31मार्च 20222 गुरुवार रोजी केले होते.
या परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना बक्षिसाच्या स्वरूपात विविध कादंबर्‍या तसेच पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ.मोहन कुलकर्णी उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पीएसआय डोंगरे तसेच डॉ.सोळंके , डॉ.शिंदेसाहेब, डॉ.रेवनवार , डॉ.कांगणे , भिकाणे (म.पोलीस.) ई.मान्यवरांची उपस्थिती लाभली.या यशस्वी कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री छत्रपती शिवाजी उच्च प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्यँकट कदम व सहशिक्षिका शर्मदा मंगलगे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रायमरी इंग्लिश स्कुलचे प्रिन्सिपलं शेविंयार जोसेफ व माधमिकच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री गनाचार्य यांनी सहकार्य केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अजिंक्य माधव जाधव यांनी आभार व्यक्त केले.

Saturday, 2 April 2022

राज्यस्तरीय दशनाम गोसावी समजा मेळाव्याला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे- जिल्हा युवा उपाध्यक्ष रवि बन

राज्यस्तरीय दशनाम गोसावी समजा मेळाव्याला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे- जिल्हा युवा उपाध्यक्ष रवि बन 
संजय गिरी
नांदेड (प्रतिनिधी ) - अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तसेच धार्मिक- सामाजिक- राजकीय मान्यवरांच्या उपस्थितीत आशिर्वाद मंगल कार्यालय, योगेश्वर मंदिराजवळ, बार्शी रोड बीड येथे होणाऱ्या दशनाम गोसावी समाज परिषद बीड (महाराष्ट्र राज्य) आयोजित राज्यस्तरीय समाज मेळावा व बीज होम महायज्ञ संस्कार 2022 ह्या मोठ्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे आव्हान जिल्हा युवा उपाध्यक्ष रवि बन यांच्यावतीने समाजबांधवांना व बीड जिल्ह्यातील नागरिकांना करण्यात आले आहे .               कार्यक्रमाचे अध्यक्ष- महंत महेश गिरी , उद्घाटक - पालकमंत्री ना. धनंजय मुंडे व प्रमुख अतिथी खा. प्रीतम ताई मुंडे, माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर , वीरपिता मुत्रागिर गोसावी, ह. भ. प महादेव महाराज, महंत चिंतामणी भारती , गुरु धनराज भारती, महंत संतोष गिरी, महंत शाम गिरी,  ह. भ. प नारायण गिरी महाराज, महंत शुक्ल भारती महाराज, ( मुंगूसवाडा देवस्थान) 
   दशनाम गोसावी  समाज  परिषदेचे संस्थापक/अध्यक्ष  ॲड. राजेंद्र बन, जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश गिरी  या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दि. 03 एप्रिल 2022 रविवारी रोजी सकाळी 8 वाजल्यापासून भरगच्च विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात आल्याचे प्रसिद्धी  पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे. 
या निमित्ताने दशनाम गोसावी समाज परिषद बीड यांचा वतिने  बिज होम  महायज्ञ, राज्यस्तरीय दशनाम गोसावी समाज मेळावा ,
 महाराष्ट्राचे प्रसिद्ध व्याख्याते अविनाश भारती यांचे प्रबोधन, व समाज रत्न पुरस्कार वितरण सोहळा , एकल गरजु  महिलांना मदतीचे वितरण,  गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा इत्यादी. एक ना अनेक कार्यक्रमाची मेजवानी संपूर्ण महाराष्ट्रातील पाहुण्यांच्या उपस्थितीत सदरील ठिकाणी अनुभवायला मिळणार असल्याचे जिल्हा युवा उपाध्यक्ष रवि बन आष्टी यांच्या वतीने सांगण्यात आली आहे. तरी बीड जिल्हातील व संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि धार्मिक वैचारिक सामाजिक सेवेची संधी द्यावी.
 असे आव्हान व निमंत्रण कार्यक्रम  आयोजकांच्या वतीने शेवटी रवि बन जिल्हा युवा उपाध्यक्ष यांनी केले आहे.

Thursday, 31 March 2022

उप विभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव यांचा निरोप समारंभ संपन्न

उप विभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव यांचा निरोप समारंभ संपन्न
माहूरकरांनी दिलेल प्रेम कधीच विसरू शकत नाही.. 
उपविभागीय अधिकारी विलास जाधव
विनोद भारती
माहूर (( प्रतिनिधी) माहूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात गेल्या दोन ते अडीच वर्षापासून कार्यरत असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव हे सेवानिवृत्त झाले असून दिनांक 31 मार्च रोजी उपविभागीय पोलीस अधिकारीववि
विजय डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली। तर। नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या प्रमूख उपस्थितीत निरोप समारंभ पार पडला,.यावेळी माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव रीठे,पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र तिडके,,सिदंखेड,मांडवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मल्हार शिवरकर, यांचेसह माहूर शहरातील नागरीक,पत्रकारांनी  त्यांचा सत्कार करून त्यांना उर्वरीत आयूष्य सूख समाधान आनंदात जावे यासाठी शुभेच्छा दिल्या, यावेळी विजय डोंगरे, उपविभागीय अधिकारी किनवट, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, जेष्ठ पत्रकार नंदू संतान, द पॉवर ऑफ मिडीयाचे तालूका अध्यक्ष विजय आमले,, वसंत कपाटे,महीला पत्रकार पद्माताई गिरे,, किसान ब्रिगेडचे अविनाश टनमने, यांनी   मनोगत व्यक्त केले,यावेळी पत्रकार बजरंग हजारे, गणेश चव्हाण, राजू दराडे, वाईबाजारचे प्रतिष्ठीत व्यापारी नितिन पाटील, यांचेसह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते मा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपमहानिरीक्षक अण्णासाहेब पवार यांनी केले तर पोलीस उप निरीक्षक संजय पवार यांनी आभार मानले. 
,

Thursday, 17 March 2022

ग्रामीण रुग्णालय माहूर येथे मोफत वैद्यकीय दंत, महाआरोग्य शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा - डॉ. व्यंकटेश भोसले

ग्रामीण रुग्णालय माहूर येथे मोफत वैद्यकीय दंत, महाआरोग्य शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा - डॉ. व्यंकटेश भोसले
विनोद भारती
माहूर ( प्रतिनिधी) राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत  ग्रामीण रुग्णालय माहूर येथे दिनांक 21मार्च 2022 रोजी सोमवारी मोफत वैद्यकीय व दंत चिकित्सा महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेआहे. दिनांक 21।मार्च रोजी सकाळी 9 ते दूपारी 2 यावेळेत  नाव नोंदणी करण्यात येणार असून दूपारी 4वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे तपासणीनंतर दिनांक 22ते24 मार्च या कालावधीत रुग्णांवर  तज्ञ डॉक्टरांकरवी विनामूल्य शस्रक्रीया केली जाणार असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. व्यंकटेश भोसले यांनी  दिली.
 नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी किर्तिकिरण पूजार, आमदार भीमराव केराम, खासदार हेमंत पाटील, यांची विशेष उपस्थिती लाभणार असून  डॉ.एकनाथडी.माले, .उपसंचालक आरोग्य सेवा लातूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर, डॉ. बालाजी शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड, यांचेसह डॉ. व्यंकटेश भोसले वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय माहूर, मांडवी, हिमायतनगर, उपजिल्हा रुग्णालय गोकूंदा येथील वैद्यकीय अधिकारी हे सहभागी होणार असून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी,राष्ट्रीय बाल स्वाथ्य योजनेतील वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका,  ग्रामीण रुग्णालय व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील एन. एम.व एम पी डब्ल्यू ईत्यादी सेवा बजावणार आहेत. आयोजित शिबिरात स्किल मिक्स सेवा अंतर्गत गूरू गोविदसिंग सामान्य रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर 21 रोजी तपासणीकामी उपलब्ध असणार आहेत. या शिबिरात हायड्रोसिल (अंडव्रुध्दी) हर्निया , अपेंडीक्स, शरीरावरील गाठीवर शस्त्रक्रिया,, दंत चिकित्सा मोफत औषधोपचार करण्यात येणार आहे. तसेच 35 वर्षावरील महीलांचे गर्भाशय मूख, व स्तन कॅन्सर , मानोरुग्णांची तपासणी, एक्सरे, ईसीजी,बी.पी.शूगर एच.टी एन.सी.डी प्रोग्राम, रक्त तपासणी, व सोनोग्राफी मोफत होणार असल्याचे डॉ. व्यंकटेश भोसले यांनी सांगितले. यासाठी अत्याधूनिक  शस्रक्रीया कक्षात सर्जन, व भूलतज्ञ डॉक्टरांकरवी रुग्णांवर शस्त्रक्रिया करून। मोफत औषधोपचार केले जाणार असल्याची  माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ .भोसले यांनी पत्रकारांना सांगितले 
माहूर हा आदिवासी बहुल डोंग्राराळ भाग असल्याने या भागातील रूग्णांना नांदेड, यवतमाळ येथे जाउन उपचार करणेसाठी शेकडो किलोमिटरचा प्रवास करून आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक दृष्ट्या  परवडणारे नसल्याने ग्रामीण रुग्णालय माहूर येथील आयोजित मोफत आरोग्य शिबीरात जास्तीत जास्त  रुग्णांनी तपासणी करून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा तसेच स्रीभ्रुण हत्या रोखण्यासाठी आरोग्य विभागाला  सहकार्य करावे असे आवाहन  डॉ. भोसले यांनी केले आहे

Monday, 28 February 2022

माहूरनगर पंचायततीचा 51कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर.

माहूरनगर पंचायततीचा 51कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर. 
माहूर ( प्रतिनिधी) नगर पंचायतीच्या सभागृहात दिनांक 28 फेबूरवारी रोजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या अध्यक्षतेखाली,उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, तहसिलदार तथा मुख्याधिकारी किशोर यादव, कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी यांच्या प्रमूख उपस्थितीत विषेश सभा संपन्न झालीया सभेमध्ये सन 2022-23 चा 515777410 एक्कावन कोटी सत्तावन्न लाख सत्याहत्तर हजार चारशे दहारुपये एवढ्या रककमेचा रक्कम 1121551 रुपये शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. 
    28 फेबूरवारी 2022रोजी नगर पंचायतीच्या सभागृहात पार पडलेल्या अर्थसंकल्पीय सभेत कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले ज्यात नगर पंचायत दर करापासून 17580000एक कोटी पंच्याहत्तर लाख अंशी हजार रूपये,विशेष वसूलीतून 4400000चौरेचाळीस लाख रुपये, महसुली उत्पनातून 372778000रूपये शासनाकडून मिळणाऱ्या अनूदानापोटी398250000रुपये संकीर्ण वसुली व ईतर   दलीत वस्ती अनूदानापोटी 7911106 व ईतर 5092000 अशा प्रारंभिक शिलकीसह 516898961 रूपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला .
सामान्य प्रशासन वसुली विभागासाठी14195000रूपये सार्वजनीक सुरक्षेसाठी 29925000रुपये,रस्ते, नाली, सभाग्रुह बांधकामव आरोग्य सेवेसाठी 392448000रुपये ग्रंथालय 721100रुपये,दलीत वस्तीतील कामे व ईतर 49800000रूपये खर्चाची तरतूद करण्यात आली असून 1121551शिलकीसह अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर करण्यात आला. 
यावेळी अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा करण्यात आली नगराध्यक्ष फिरोज दोसानी, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, तहसिलदार तथा मुख्याधिकारी किशोर यादव, यांचेसह उपस्थित सर्व नगरसेवक सहभागी झाले होते यावेळी न, पंचायतचे स्थापत्य अभियंता प्रतिक नाईक,, विजय शिंदे,संदीप थोरात सुरेंद्र पांडे याचे सह कर्मचारी उपस्थित होते शेवटी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी सर्वांचे आभार मानले.

Saturday, 26 February 2022

नबाब मलीकांनी राजीनामा द्यावा .माहूर भाजपाचे तहसिलदारांना निवेदन

नबाब मलीकांनी राजीनामा द्यावा .
माहूर भाजपाचे तहसिलदारांना निवेदन
 
माहूर ( प्रतिनिधी) मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी कडून जमीन खरेदी केल्या प्रकरणी ईडीच्या ताब्यात असलेले अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलीक यांनी राजीनामा द्यावा या मागणीचे निवेदन दिनांक 25 फेबूरवारी 2022रोजी माहूर भाजपतर्फे तहसिलदार माहूर यांना देण्यात आले. 
     राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलीक यांनी 1973 साली मुंबईत बॉम्बस्फोट प्रकरणातील सरदार शिकवली खान आणी सलीम पटेल यांचेकडून कवडीमोल भावाने जमीन खरेदी केल्या प्रकरणी ईडीने नबाब मलीक यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. नबाब मलीकांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावयास पाहीजे होता. परंतू सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीने देशाचा दुश्मन असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला मदत करणार्‍या नबाब मलीकांची पाठराखण करीत असून त्यांचा राजीनामा घेणार नाही असा निर्णय घेतला हिबाब निश्चितच लोकशाहीला घातक असून हा एकप्रकारचा देशद्रोहच आहे.महाविकास आघाडीच्या निर्णयाचा माहूर भाजपातर्फे जाहीर निषेध करून नबाब मलीकांच्या राजीनाम्याची मागणी करत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर प्रचंड घोषणाबाजी केली तसेच भ्रष्टाचारी मंत्री नबाब मलीक यांनी राजीनामा द्यावा अश्या मागणीचे निवेदन तहसिलदार किशोर यादव यांना दिले असून आपले निवेदन शासनाकडे पाठविण्यात येईल असे आश्वासन  निवेदन कर्त्यांना दिले या निवेदनावर अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प. पू. शामबापू भारती महाराज , पत्रकार प्रकोष्टच्या जिल्हाध्यक्षा तथा महिला पत्रकार पद्माताई जयंत गीरे, तालूका अध्यक्ष अॅड दिनेश येउतकर, तालूका सरचिटणीस नीळकंठ मस्के, अच्युत जोशी, शहराध्यक्ष गोपू महामूने, जेष्ठ कार्यकर्ते विजय आमले, नंदकुमार जोशी संतोष त्याने, अर्जून मोहीते, किशोर राठोड, यांचेसह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कूपटी येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून केली आत्महत्या

कूपटी  येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून केली आत्महत्या 
माहूर (प्रतिनिधी) माहूर तालुक्यातील कूपटी येथील शेतकरी विनोद गणपत राठोड वय 55वर्ष याने कर्जाला कंटाळून आपल्या राहत्या घराच्या संडासमध्ये दोरीने गळफास   घेऊन आत्महत्या केली. 
   निसर्गाचा लहरीपणा व सततच्या नापिकीमूळेआधीच माहूर तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाला असून आपल्या कूटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत आहे. त्यात बँकेचे,व  खाजगी सावकाराच्या कर्जाचा  ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांची दोन्ही मुले पोट भरण्यासाठी आंध्र प्रदेशात गेले असून त्यास ईतर कोणाचाही आधार नसल्याने आर्थिक विवंचनेत होता,.कर्जाची परतफेड कशाच्या भरवशावर करावी यामूळे चिंताग्रस्त झालेला कूपटी येथील शेतकरी विनोद गणपत राठोड याने कर्जाला कंटाळून दिनांक 24 फेबूरवारी 2022रोजी  दुपारी तीन वाजता संडासमध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.यापरकरणी सुरेश विष्णू राठोड रा. भिमपूर ता. माहूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक नामदेव रीठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मारोती चव्हाण यांनी गु. र. न. 08/22022कलम  174सिआरपीसी  प्रमाणेआकस्माक म्रुत्यूची नोंद केली असून पुढील तपास बिट जमादार बाबू जाधव हे करीतआहेत. सदर शेतकर्‍याच्या आत्महत्येमूळे कूपटी परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Wednesday, 23 February 2022

तांदळा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक, सरपंचाने संगनमताने केला लाखोचा 'भ्रष्टाचार' - शेख फकीर शेख वली यांनी केली चौकशीची मागणी

तांदळा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक, सरपंचाने संगनमताने केला लाखोचा 'भ्रष्टाचार' - शेख फकीर शेख वली यांनी केली चौकशीची मागणी
विनोद भारती
माहूर ( प्रतिनिधी) माहूर तालुक्यातील तांदळा ग्रामपंचायतीच्यासरपंच,ग्रामसेवक यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून संगनमताने विकास कामाच्या निधीत मोठा भ्रष्टाचार केला आहे.त्याबाबत  चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य शे.फकीर शे.वली यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती माहूर  यांच्या कडे  दि.०९ फेब्रुवारी २०२२ रोजी  दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. तांड्यातील विहीरीचे काम न करताच पैसे उच्चल केले असून,दोन वर्षापूर्वी 7.50 लक्ष रूपये खर्च करून करण्यात आले असून  दोन वर्षापासून ते बंदच आहे,सार्वजनिक पाणि पुरवठा करण्यासाठी मनरेगा मधून करण्यात आलेले विहीरीचे काम अर्धवट करुन देयके उचललीतसेच सन २०१७ते २०२१ पर्यंतचे करवसुलीव्दारे प्राप्त झालेल्या रकमेची अफरातफर केली। असून वन विभागाचे काम दाखवून निधी हडप केल,गावातील अंगणवाडी पाडून दारे,खिडकी,टीन,एँगल घरी नेऊन त्याची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली.कोंडवाड्याचे चे पाच हजार चिरे परस्पर विल्हेवाट लावली दलीत वस्तीचे २.९९लक्ष रुपये उचल करुन यामध्ये सर्व बोगस व दर्जाहीन कामे करुन निधीची विल्हेवाट लावण्यात आली असल्याचा गंभीर आरोप शेख फकीर शेख वली यांनी दिलेल्या निवेदनातून केला आहे. रस्त्याने सांडपाणी वाहत असून दुर्गंधी पसरली असल्याने नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याचे शेख फकीर यांनी म्हटले असून तांदळा येथील सरपंच, ग्रामसेवक यांनी मनमानी कारभार करून संगनमताने लाखो रुपयाचा अपहार केलाआहे तसेच सरपंच,ग्रामसेवक  यांनी पदाचा गैरवापर करुन प्रस्तावित कामाच्या शासन निकषानुसार निविदा प्रक्रिया न करता सभागृहाची मंजूरी न घेता कामे करणे व ती अपूर्ण ठेवणे असे प्रकार केले आहेत.तसेच सरपंच,ग्रामसेवक  यांनी ठराव न घेता मर्जीतल्या लोकांना कामे दिली आहेत. याबाबत चौकशी करुन सरपंच,ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य शे.फकीर शे.वली यांनी गटविकास अधिकारी पंचायत समीती माहूर यांचे कडे निवेदनाद्वारे केली असून गटविकास अधिकारी सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करणार त्यांना पाठीशी घालणाऱ याकडे माहूर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. .

Tuesday, 22 February 2022

पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांचे हस्ते सारखनी येशील पोलीस मदत केंद्राचे उदघाटन संपन्न

पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांचे हस्ते सारखनी येशील पोलीस मदत केंद्राचे उदघाटन संपन्न
 
माहूर. ( प्रतिनिधी) माहूर सिंदखेड पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या सारखणी  येथे ग्राम पंचायत व शारदाकंस्ट्रक्शन यांच्या सौजन्याने निर्माण करण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन दिनांक 22फेबूरवारी 2022 रोजी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांचे हस्ते पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे,अरुण डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी माहूर यांच्या प्रमूख उपस्थितीत संपन्न झाले. 
    सिंदखेड पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात असलेले सारखनी हे प्रमूख बाजारपेठ असून  आजूबाजूच्या किमान 50ते 60 गावाचा संपर्क येत असतो तसेच। किनवट, आदिलाबाद कडे येजया  करणार्‍या वाहनांसह ,ठिकाणी। आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची प्रचंड प्रमाणात गर्दी होत असते.
 सारखनीते सिंदखेड पोलीस ठाण्याचे अंतर 5ते 6किलोमीटर असल्याने सारखणी याठिकाणी कायदा शांतता सुव्यवस्था राखणेकामी सिंदखेड पोलीसांना अनेक अडचणीचा सामना करत सर्व सामान्य जनतेची सुरक्षा करणेसाठी तारेवरची कसरत करावी लागत होती नेमकी हिबाब लक्षात घेऊन सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी सारखनी ग्रामपंचायशी संपर्क साधून जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केलो असता सरपंच वनमाला तोडसाम व शारदा कंट्रक्शन यांनी  पोलीस मदत केंद्र निर्माण करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल पोलीस प्रशासनाच्या वतीने  सिंदखेडचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांचे हस्ते सरपंच वरमाला तोडक्या व शारदा कंट्रक्शन यांचा शाल श्रीफळ देऊन, सत्कार करण्यात आला यावेळी प्रतिष्ठीत व्यापारी कुंदन पवार, पवन जैस्वाल, लक्ष्मण मीसेवार, बाबूराव, नविन वाघमारे यांचेसह  ग्रामस्थ उपस्थित होते.

राणीसावरगाव येथील श्री शिवाजी महाराज शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी

राणीसावरगाव येथील श्री  शिवाजी महाराज शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी 
 नांदेड (  प्रतिनिधी):-  श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रायमरी इंग्लिश स्कुल व उच्च प्राथमिक-माध्यमिक विद्यालय राणीसावरगाव येथे दिनांक 21 फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शाळेतील विद्यार्थीनी छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजामाता व मावळ्यांची वेशभूषा केली यात शाळेचा विद्यार्थी विश्वजीत कदम व अथर्व कोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तर श्रावणी घाळगीर ,ऋषींका धापसे, भक्ती शिवसांब कोरे,आरुषी अशोक भिकाणे,सिद्धी धुळे,श्रीशा मंगलगे, रिद्धी गाडे यांनी जिजामाता यांची वेशभूषा केली, वेशभूषा केलेल्या सर्व विद्यार्थांना घोड्यावर बसून त्याच्या सोबत वेशभूषातील मावळे पथक, झाँज पथक, लेझिम पथक व सर्व विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत, लेझिम खेळत, प्रसंगी मनोरे करीत, व काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोवाड्यावर व गीतावर डान्स करीत मोठया जलोषात सम्पूर्ण गावातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन देनारी रॅली काढण्यात आली, लहान लेकरांची वेशभूषा, शिस्त, घोषणा, मनोरे, लेझिम, व डान्स पाहुण सर्व गावकरी शाळेचे व मेहनत घेणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करीत होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिकच्या मुख्याध्यपिका  जयश्री स्वामी , उच्च प्राथमिक चे मुख्याध्यापक  व्यँकट कदम , प्रायमरीचे शेविंयार  यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे क्रीडा शिक्षक  परमेश्वर क्षीरसागर  व वर्षा मेकाले  व वैजेनाथ आडे  यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील गीतावर व पोवाड्यावर मनोरे व डान्स बसवला व सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्याना सहकार्य करीत मेहनत घेतली. सम्पूर्ण गावातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात रॅली काढल्यानंतर शेवटी सर्व विद्यार्थी शाळेत येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकणारे मनोगत व्यक्त केले, या प्रसंगी उच्च प्राथमिकचे मुख्याध्यापक  कदम सरांनी मनोगत मांडताना सांगितले की,आपल्या जीवनात जो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतो तो व्यक्ती समाजात मान सन्मान प्राप्त करतो म्हणून या मानव जन्मातील चांगले व्यक्तिमत्व म्हणून जिवन जगण्यासाठी प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा असे मत मांडले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मदा मंगलगे  यांनी केले  व विठ्ठल फड  यांनी आभार व्यक्त करताना विद्यार्थाचे आत्मबल वाढण्यासाठी कोणतीही शुल्क न घेता दरवर्षी शाळेला  विठ्ठल राठोड मामा व  पिंटू मामा घोडे देतात.त्याचें मनापासून सम्पूर्ण शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो असे गौरवउदगार काढले. व सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी पार पडला.

Sunday, 20 February 2022

माहूर येथे कार्यरत असलेले स. पो.नि. पवार यांचेवरहोतोय अभिनंदनाचा वर्षाव

माहूर येथे कार्यरत असलेले स. पो.नि. पवार यांचेवरहोतोय अभिनंदनाचा वर्षाव
विनोद भारती
माहूर ( प्रतिनिधी) लातूर येथे विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात कार्यरत असताना लातूर येथील संजय नगरमधध्ये 16 एप्रिल 2018 रोजी  शादूल राजहमद शेख या तरुणाचा निर्घून खून झाला होता. मयताचा मुलगा शामिम शादूल शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु. र.नं116/2018 कलम 302,143,147,148,149 भादवि प्रमाणे एकून 8 जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासनिक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार व त्यांचे सहकारी पोना विनोद चलनवाढ पोहवा हनूमंत कोतवाड मपोशि व्ही. एस. मुंढे.TMC. अधिकारी सपोनि बी. एम. तोडेवाड व सर्व आमदार .यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन या गंभीर प्रकरणाचा योग्यप्रकारे तपास करून लातूर जिल्हा सत्र न्यायालयात 8 आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीशए. व्ही. गुजराथी यांनी दिनांक 17 फेबूरवारी 2022रोजी या गुन्ह्यातील सर्व 8आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी 10000रु दंडाची शिक्षा सुनावली आहे. 
सध्या अण्णासाहेब पवार हे माहूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांनी या गंभीर प्रकरणात केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे,अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे,उपविभागीय अधिकारी विलास जाधव, पोलीस निरीक्षक नामदेव रीठे,नगराध्यक्ष फिरोज दोसानी ,उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, भाजपा कार्यकर्ते संजय बनसोडे, द पॉवर ऑफ मिडीयाचे तालूका अध्यक्ष विजय आमले, पत्रकार प्रकोष्टच्या जिल्हाध्यक्षा तथा द पॉवर ऑफ मिडीयाच्या महिला पत्रकार पद्माताई जयंत गीरे,विदर्भ न्यूजचे अधिक्रुत प्रतिनिधी संजय घोगरे, यांचेसह राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार यांनी त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव करत त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Friday, 18 February 2022

खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश ; हिंगोली जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचे ५६ कोटी १७ लाख रुपये अनुदान प्राप्त

खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश ; हिंगोली जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचे ५६ कोटी १७ लाख रुपये अनुदान प्राप्त

हदगाव (प्रकाश जाधव ) : गतवर्षी जून ते सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसान पोटी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा पहिला टप्पा म्हणून राज्य सरकारने २९७ कोटी २५ लक्ष रुपये मंजूर करून वाटप केले होते खासदार हेमंत पाटील यांनी सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्यामुळे  प्राप्त झाली होती तर उर्वरित २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व कृषिमंत्री दादाजी भुसे साहेब यांची यांची खासदार हेमंत पाटील यांनी भेट घेऊन मागणी केली होती त्यानंतर आर्थिक मदतीची २५ टक्के म्हणजे ५६ कोटी १७ लक्ष रुपये एवढे अनुदान प्राप्त झाले आहे . 
         अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानभरपाई पोटी राज्य सरकारने जाहीर केलेल्या १० हजार कोटींच्या पॅकेजमधून उर्वरित २५ % प्रमाणे वाढीव दराने हिंगोली जिल्ह्यासाठी  मंजूर झालेले अनुदान लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत सेनगाव, हिंगोली औंढा नागनाथ, तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाल्याने जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांनी खासदार हेमंत भाऊ पाटील यांचे आभार मानले आहेत .   राज्याच्या महसूल व वन विभागाने नुकत्याच काढलेल्या शासन निर्णयाप्रमाणे अतिवृष्टी अनुदानाचा पहिला हप्ता म्हणून घोषित मदतीच्या ७५ टक्के रक्कम वाटप केली आहे . अतिवृष्टी आणि त्यामुळे उदभवलेल्या पूर्वपरीस्थीतीने हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते . ऐन पीक काढणीच्या हंगामात झालेल्या  अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी २९७ कोटी  आर्थिक मदत खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने मिळाली होती . हिंगोली जिल्ह्यासाठी मिळालेल्या मदतीमुळे खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री  अजित पवार , महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व महाविकास आघाडी सरकारचे मनस्वी आभार मानले आहे तर हिंगोली लोकसभा मतदार संघातील शेतकरी वर्गातून मिळालेल्या मदतीमुळे समाधान व्यक्त केले जात आहे .

जिवराज दापकर यांना नोबेल ऑफिसर पुरस्कार जाहीर

जिवराज दापकर यांना नोबेल ऑफिसर पुरस्कार जाहीर
हदगाव (प्रकाश जाधव ) - हदगाव येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष तहसीलदार जीवराज दापकर महाराष्ट्र राज्यस्तरीय नोबेल ऑफिसर पुरस्कार 2022 विद्रोही शिक्षक संघटना व सुजाण नागरिक संघाच्या वतीने जाहीर करण्यात आला  
जीवराज दापकर अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी असून एकाच वेळी उपविभागीय अधिकारी,तहसिलदार,न.प.प्रशासक  पदे सांभाळून जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहून कोरोना काळात तसेच आपत्कालीन संकटात  धावून जाणारा अधिकारी म्हणून ज्यांची ख्याती आहे  त्यांना  संघटनेने राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर आहे.हा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 21फेब्रुवारी  2022 रोजी संत रविदास सभाग्रह हदगाव येथे होणार आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष ब्रिजेश पाटील उपविभागीय अधिकारी हदगाव, उद्घाटक माननीय वर्षाताई ठाकूर  कार्यकारी अधिकारी नांदेड, कार्तिकेय आर आय ए एस अधिकारी प्रमुख मार्गदर्शक माननीय गोविंद नांदेडे पूर्व शिक्षण संचालक पुणे प्रमुख अतिथी केशव गुड्डापोड  गटविकास अधिकारी हदगाव, सविता बिरगे शिक्षणाधिकारी प्राथमिक नांदेड हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक हदगाव, किशन फोले गटशिक्षणाधिकारी हदगाव यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन विद्रोही शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गुणवंत काळे, बांधकाम व्यवसायिक राजेश देशमुख मनीष तोष्णीवाल  सी ए पुणे जिल्हाध्यक्ष नामदेव कराड , तालुकाध्यक्ष सुरेश कदम यांनी केले आहे.

Tuesday, 15 February 2022

सिंदखेड येथे शहिद दिन ,शिवाजी महाराज आणि संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

सिंदखेड येथे शहिद दिन ,शिवाजी महाराज आणि संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
विनोद भारती
माहूर ( प्रतिनिधी)शहीद दीन छत्रपती शीवाजी मह्राराज, व संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून  समस्त गावकऱ्यांच्या  वतीने सिंदखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रमूख उपस्थितीत  रक्तदान 
शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सर्प्रथम मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलित करुन रक्तदान शिबिरास सुरवात करण्यात आली  .तसेच पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली तद्नंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले तद्नंतर   रक्तदानास सुरुवात करण्यात आली.यावेळी प्रथम कुमारी साक्षी कत्तेवार हिने रक्तदान कार्यक्रमाला 
सुरवात करण्यात आली या  शिबिरात एकून 71 रक्त दात्यांनी रक्तदान केले आहे.रक्तदान केले
असून आयोजकांच्या वतीने मेडल व प्रशस्ती पत्र देऊन रकदात्यांचाना गौरविण्यात आले. यावेळी शेकन्ना गुंडावार,माजी सेनीक राजारामबतुलवार,पत्रकार शेक मजहर महेश कोटूरवार, अफरोज शेख उपस्थित होते शिबिराच्या यशस्वितेसाठी अमोल रागेवार, स्वप्नील, सौरभ,यांनि अथक परिश्रमघेतले यावेळी गावकरी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday, 8 February 2022

माहूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी एकून सहा उमेदवारी अर्ज दाखल

माहूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी एकून सहा उमेदवारी अर्ज दाखल
विनोद भरती
माहूर ( प्रतिनिधी) दिनांक 14 फेबूरवारी रोजी होउ घातलेल्या माहूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख 7फेबूरवारी 2022 जाहीर झाली होती परंतू गानसम्राज्ञी भारत रत्न लता मंगेशकर यांच दुःखद निधन झाल. आणी केंद्र सरकारने दोन दिवसाचा दुखवटा जाहीर केला तसेच राज्य शासनाने 7 फेबूरवारी 2022 रोजी सार्वजनिक सूटी जाहीर करण्यात आली असल्याने 8फेबूरवारी 2022रोजी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले होते. त्याअनुषंगाने दिनांक 8फेबूरवारी रोजी नगर पंचायत कार्यालयात दूपारी दोन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले असून यात राष्ट्रीय कॉंग्रेसपक्षातर्फे  राजेंद्र केशवे यांनी दोन तर बालाजी भंडारे यांनी एक नामांकन पत्र दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे फिरोज दोसानी यांनी दोन तर शिवसेनेतर्फे सौ आशाताई निरधारी जाधव यांनी एक नामांकन पत्र असे एकून सहा उमेदवारी अर्ज दाखल दाखल करण्यातझाले आहे. प्रशासनाच्यावतीने निवडणूक निर्वाचन अधिकारी तहसिलदार तथा मुख्याधिकारी किशोर यादव यांनी उमेदवारीअर्ज स्वीकारले असून दिनांक 11फेबूरवारी दूपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत दिनांक १४फेबूरवारी 2022रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी किर्तिकिरण पूजार यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाची निवड होणार आहे अशी माहिती कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी यांनी दिली.यावेळी बांधकाम अभियंता प्रतिक नाईक प्रकल्प अधिकारी जोंधळे, सुनिल वाघ, दिळवे, विजय शिंदे.सूरेंद्र पांडे उपस्थित होते.

Sunday, 6 February 2022

निहीत स्वार्थासाठी हिंदु मुस्लिम असा प्रचार करणाऱ्या राष्ट्रवादीने आम्हांला धर्मनिपेक्षता शिकवू नये - डॉ.निरंजन केशवे

निहीत स्वार्थासाठी हिंदु मुस्लिम असा प्रचार करणाऱ्या राष्ट्रवादीने आम्हांला धर्मनिपेक्षता शिकवू नये - डॉ.निरंजन केशवे 
विनोद भारती
माहूर (प्रतिनिधी )स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्याने या पक्षाला फार मोठा इतिहास आहे. सर्व धर्माला सोबत घेऊन वाटचाल करणा-या काँग्रेस पक्षाने मागील पाच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन नगराध्यक्ष फिरोज दोसाणी व शितल जाधव यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. याशिवाय आमच्या पक्षाने मुस्लिम समाजाचा उपनगराध्यक्ष करून त्या समाजाला न्याय सुद्धा दिला होता.त्यामुळे आपले ईप्सीत साध्य करण्यासाठी कुणीही हिंदू/मुस्लिम असा भेदभाव करू नये असे मत काँग्रेसच्या वैद्यकीय सहाय्यता आघाडीचे राज्य समन्व्यक डॉ. निरंजन केशवे यांनी   प्रसारमाध्यमाशी बोलताना व्यक्त केले.
      पुढे बोलातांना ते म्हणाले आमचे नेते पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असतांना  माहुर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी 75 कोटी रुपयांचा भरीव निधी दिला होता. आताही साहेबांच्या नेतृत्वाखालीच या शहराचा विकास होऊ शकतो, अशी  शहरातील प्रत्येक नागरिकाची भावना आहे.चव्हाण साहेबांच्या आशीर्वादाने माजी नगराध्यक्ष प्राचार्य राजेंद्र केशवे यांनी सर्व जाती धर्माच्या नागरिकांना सोबत घेऊन आपल्या 14 महिन्याच्या कार्यकाळात पाठपुराव्यात सातत्य राखून नळ योजना कार्यान्वित करण्यासह अनेक विकास खेचून आणले,आणि त्यात दर्जाही राखला होता.विकासाबाबत शहरवासीयांची भावना लक्षात घेऊनच आम्ही काँग्रेस पक्षाचाच  नगराध्यक्ष करण्यासाठी आग्रही असल्याचे डॉ.निरंजन केशवे यांनी स्पष्ट केले. धर्मनिरपेक्षता हा काँग्रेस पक्षाचा मुळगाभा असल्याने वा आम्ही काँग्रेसजन त्या संस्कृतीत वाढल्याने  धर्मनिरपेक्षता डावलून हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारण्याचा प्रश्न येतोच कुठे असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

Friday, 4 February 2022

माहूर न. पंच्या नगराध्यक्ष व।उपनगराध्यक्षाची 14फेबूरवारी रोजी होणार निवड

माहूर न. पंच्या नगराध्यक्ष व।उपनगराध्यक्षाची 14फेबूरवारी रोजी होणार निवड
विनोद भारती
माहूर ( प्रतिनिधी) माहूर नगर पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली असून दिनांक 14 फेबूरवारी 2022रोजी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाची निवड होणार असून या निवडीकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे .
माहूर नगर पंचायतमध्ये  राष्ट्रवादी काँग्रेस 7,राष्ट्रीय कॉग्रेस 6 शिवसेना 3,भाजपा 1असे पक्षीय बलाबल आहे नगराध्यक्षपद सर्वसाधारन प्रवर्गासाठी राखीव असून संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूक पार पडलेल्या नगर परिषदा व नगर पंचायतमध्ये ज्या पक्षाचे नगरसेवक जास्त त्यपक्षाचा नगराध्यक्ष, व दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या पक्षाचा उपनगराध्यक्ष  निवडण्यात यावा असा नुकताच महाविकास आघाडीतर्फे फतवा  जारी करण्यात आला आहे.त्या अनुषंगाने नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा तर उपनगराध्यक्ष राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचा होणे क्रमप्राप्त आहे. परंतू महाविकास आघाडीने काढलेल्या  फतव्याचे स्थानिक पातळीवर कितपत पालन होणार कि आघाडीत बिघाडी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
14 फेबूरवारी रोजी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी किर्तिकिरण पूजार यांच्या अध्यक्षतेखाली नगर पंचायत कार्यालयात विशेष सभा आयोजित करण्यात आली असून दिनांक 7फेबरवारीरोजी नामनिर्देशनपत्रे दाखल करणे त्याच दिवशी 11ते 2 यावेळेत नामनिर्देशन पत्राची छाननी होणार तर 9फेबूरवारी पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार आहे. दिनांक 14 फेबूरवारी रोजी सकाळी 11वाजता नगराध्यक्षाची निवड करण्यात येणार असून त्याचदिवशी दुपारी 1ते तिन यावेळेत उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र स्विकारणे 3ते 3.30 यावेळेत नामनिर्देशन पत्र मागे घेणे व 3.45 वाजता उपनगराध्यक्ष निवडण्यात येणार आहे तर नगरसेवकांना यानियोजीत सभेचे सूचनापत्र नोटीसा) 2 फेबूरवारी रोजी देण्यात आल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीला 11दिवसाचा कालावधी शिल्लक असल्याने याकाळात राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेस हे तिन पक्ष महाविकासआघाडीच्या फतव्याचे पालन करणार की घोडेबाजार भरविनार याबाबत माहूर शहरात रंगतदार चर्चा ऐकावयास मिळत आहे .

Tuesday, 1 February 2022

महसूल पथकाच्या नाकावर टिचून पैनगंगा नदीपात्रातून अवैध रेती उत्खनन सुरूच

महसूल पथकाच्या नाकावर टिचून पैनगंगा नदीपात्रातून अवैध रेती उत्खनन सुरूच
विनोद भारती
 माहूर (प्रतिनिधी )यावर्षी 
माहूर तालुक्यातील पैनगंगा नदी पात्रातील आठ वाळू घाटापैकी एकाही घाटाचा लिलाव अद्याप झाला नाही.मात्र विदर्भ हद्दीतील काही घाटाचा लिलाव झाल्याची संधी साधून वाळू तस्कर महसूल पथकाच्या नाकावर टिचून माहूर हद्दीतून अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून वाहतूक करीत असल्याने शासनाचा लाखों रुपयाचा महसूल वाळू तस्कर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या मंडळीच्या घशात जात आहे.
   माहूर तालुक्यातून वाहणा-या पैनगंगा नदी पात्राचा दहा किमी अंतराचा परिसर निसर्गपूरक क्षेत्र (इको झोन )घोषित असल्याने मागील काही वर्षात एकाही वाळू घाटाचा लिलाव झाला नव्हता. मात्र गेल्या वर्षी लांजी या एकमेव वाळू घाटाचा लिलाव झाल्याने वाळू तस्करांनी इतर घाटातून प्रचंड प्रमाणात वाळू  उपसा करून त्याची चढ्या दराने विक्री केली होती. * पैनगंगा नदी पात्रातील माहूर तालुक्याच्या हद्दीत मोठया प्रमाणात वाळू उपसा करून त्याची वाहतूक सुरु असल्याची कल्पना आपण दि.30 जाने. रोजी दु.2 वाजून 7 मिनिटांनी भ्रमनध्वनीवरून तहसीलदार किशोर यादव यांना दिली होती. मात्र तुमचे म्हणणे काय? एवढेच बोलून त्यांनी भ्रमनध्वनी बंद केल्याची*  माहिती सामाजिक कार्यकर्ते नितीन तोडसाम यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.

Saturday, 8 January 2022

वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व कब्रस्तानमध्ये स्वच्छता

वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व कब्रस्तानमध्ये स्वच्छता

हदगाव (प्रतिनिधी) -    हदगांव कब्रस्तानमध्ये (दुसरे) ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये जीवनांकुर बहुउद्देशिय सेवाभावी संस्था,हदगांव मार्फत वृक्षारोपणास सुरुवात करण्यात आली होती.वाढदिवस,महापुरुषांच्या जयंती,पुण्यतिथी,राष्ट्रीय सण,पूर्वजांच्या स्मरणार्थ अशा विविध कार्यक्रमांचे औचित्य साधून जनजागृती करीत विविध पर्यावरनण उपयोगी वृक्षांचे रोपन करुन त्यांचे यशस्वी संगोपन करण्यात आल्याने रोपन केलेली सर्व वृक्ष जिवंत आहेत. 
  आज दि.आठ रोजी डाॅ.आरती हरिश्चंद्र चिल्लोरे यांच्या सव्वीसाव्या वाढदिवसानिमित्त जांभळाच्या सव्वीस वृक्षांची व कब्रस्तान सुशोभीकरणासाठी जास्वंद,गुलाब रोपांची लागवड करुन कब्रस्तानमधील तण काढून  स्वच्छता करण्यात आली.
    यावेळी हरिश्चंद्र चिल्लोरे जीवनांकुर संस्थापक,मौलाना,शेख शहबाज एमसीएन पत्रकार,अब्दुला चाऊस संपादक आझाद निर्णय न्युज आदी उपस्थीत होते.