Thursday, 21 April 2022

ग्रामीण रुग्णालय माहूर येथे आरोग्य मेळावा संपन्न .

ग्रामीण रुग्णालय माहूर येथे आरोग्य मेळावा संपन्न .
 शासनाच्या विविध योजनांचा जनतेने लाभ घ्यावा. तहसिलदार किशोर यादव. 

विनोद भारती
माहूर (प्रतिनिधी) गोरगरीब जनतेला आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी केंद्र 
सरकारतर्फे आजादीका अमूर्त महोत्सव या योजनेला अनुसरून संपूर्ण देशात दिनांक 18 एप्रिल 2022 ते 22 एप्रिल या कालावधीत  तालूका स्तरावर आरोग्य मेळावे आयोजीत करण्याबाबत सूचना दिल्या त्या अनुषंगाने दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी ग्रामीण रुग्णालय माहूर येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नीळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार किशोर यादव यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष फिरोज दोसानी, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड,,नगरसेवक गोपू महामूने,  नगरसेविका सौ. कविता राजू सौंदलकर, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख जोतिबा खराटे , रुग्ण कल्याण समिती सदस्य अनिल वाघमारे, किशन राठोड, शहर प्रमूख निरधारी जाधव, गोर सेनेचे प्रफुल्ल जाधव, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव,आकाश कांबळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आरोग्य अभियान मेळाव्यास सुरवात करण्यात आली .
यावेळी  ग्रामीण रुग्णालयातर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. वाघमारे यांनी केलेल्या प्रास्ताविकातून या मेळाव्यात  विविध आजार विषयक उपचार व उपलब्ध असलेल्या सुविधा तसेच पंतप्रधान जन सुरक्षा योजनेचे कार्ड, मरणोत्तर अवयवदान,ईत्यादीबाबत   मार्गदर्शन केले, पाचशे छत्तीस रुग्णांनी या मेळाव्याचा लाभ घेतला .राजकीय बडे नेते, अधिकारी यांनी या मेळाव्याकडे जाणीवपूर्वक नेहमीच्या सवयीप्रमाणे पाठ फिरवली असल्याने यांना निमंत्रित करण्याची गरजच काय असा प्रश्न उपस्थित करून रुग्ण कल्याण समिती सदस्य तथा जेष्ठ पत्रकार नंदू संतान यांनी गैरहजर कर्मचार्‍यांना कारने दाखवा नोटीस पाठवून त्यांचेवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी तहसिलदार किशोर यादव यांचेकडे करून खंत व्यक्त केली नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी नियोजित मेळाव्याचा प्रचार व प्रसार करणे कामी रुग्णालय प्रशासन कमी पडल्याने रुग्णसंख्या कमी असल्याचे मत व्यक्त केले. मेळाव्याचे अध्यक्ष तहसिलदार किशोर यादव यांनी  शासनाकडून आरोग्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले विशेष बाब म्हणजे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांना रोजा असताना सुद्धा त्यांनी रक्तदान करून समाजासमोर आदर्श निर्माण केला तसेच तहसीलदार किशोर यांनी देखील रक्तदान केले. विशेष बाब म्हणजे या  मेळाव्यात सहभागी झालेल्या रूग्ण व अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी पुरी भाजी व शिरा भोजनाची व्यवस्था साईनाथ महाराज वसमतकर या सेवाभावी संस्थेकडून मोफत करण्यात आली होती. त्या बद्दल वसमतकर मठाचे मुनीम तथा विश्वस्त भाउ पाटील (हडसनीकर) यांचे तोंडभरून कौतुक करत रुग्णालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अभिजित अंबेकर यांनी केले तर वैद्यकीय अधिक्षक डॉ व्यंकटेश भोसले यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment