जिवराज दापकर यांना नोबेल ऑफिसर पुरस्कार जाहीर
हदगाव (प्रकाश जाधव ) - हदगाव येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष तहसीलदार जीवराज दापकर महाराष्ट्र राज्यस्तरीय नोबेल ऑफिसर पुरस्कार 2022 विद्रोही शिक्षक संघटना व सुजाण नागरिक संघाच्या वतीने जाहीर करण्यात आला
जीवराज दापकर अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी असून एकाच वेळी उपविभागीय अधिकारी,तहसिलदार,न.प.प्रशासक पदे सांभाळून जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहून कोरोना काळात तसेच आपत्कालीन संकटात धावून जाणारा अधिकारी म्हणून ज्यांची ख्याती आहे त्यांना संघटनेने राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर आहे.हा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 21फेब्रुवारी 2022 रोजी संत रविदास सभाग्रह हदगाव येथे होणार आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष ब्रिजेश पाटील उपविभागीय अधिकारी हदगाव, उद्घाटक माननीय वर्षाताई ठाकूर कार्यकारी अधिकारी नांदेड, कार्तिकेय आर आय ए एस अधिकारी प्रमुख मार्गदर्शक माननीय गोविंद नांदेडे पूर्व शिक्षण संचालक पुणे प्रमुख अतिथी केशव गुड्डापोड गटविकास अधिकारी हदगाव, सविता बिरगे शिक्षणाधिकारी प्राथमिक नांदेड हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक हदगाव, किशन फोले गटशिक्षणाधिकारी हदगाव यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन विद्रोही शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गुणवंत काळे, बांधकाम व्यवसायिक राजेश देशमुख मनीष तोष्णीवाल सी ए पुणे जिल्हाध्यक्ष नामदेव कराड , तालुकाध्यक्ष सुरेश कदम यांनी केले आहे.
Super
ReplyDelete