राज्यस्तरीय दशनाम गोसावी समजा मेळाव्याला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे- जिल्हा युवा उपाध्यक्ष रवि बन
संजय गिरी
नांदेड (प्रतिनिधी ) - अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तसेच धार्मिक- सामाजिक- राजकीय मान्यवरांच्या उपस्थितीत आशिर्वाद मंगल कार्यालय, योगेश्वर मंदिराजवळ, बार्शी रोड बीड येथे होणाऱ्या दशनाम गोसावी समाज परिषद बीड (महाराष्ट्र राज्य) आयोजित राज्यस्तरीय समाज मेळावा व बीज होम महायज्ञ संस्कार 2022 ह्या मोठ्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे आव्हान जिल्हा युवा उपाध्यक्ष रवि बन यांच्यावतीने समाजबांधवांना व बीड जिल्ह्यातील नागरिकांना करण्यात आले आहे . कार्यक्रमाचे अध्यक्ष- महंत महेश गिरी , उद्घाटक - पालकमंत्री ना. धनंजय मुंडे व प्रमुख अतिथी खा. प्रीतम ताई मुंडे, माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर , वीरपिता मुत्रागिर गोसावी, ह. भ. प महादेव महाराज, महंत चिंतामणी भारती , गुरु धनराज भारती, महंत संतोष गिरी, महंत शाम गिरी, ह. भ. प नारायण गिरी महाराज, महंत शुक्ल भारती महाराज, ( मुंगूसवाडा देवस्थान)
दशनाम गोसावी समाज परिषदेचे संस्थापक/अध्यक्ष ॲड. राजेंद्र बन, जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश गिरी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दि. 03 एप्रिल 2022 रविवारी रोजी सकाळी 8 वाजल्यापासून भरगच्च विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.
या निमित्ताने दशनाम गोसावी समाज परिषद बीड यांचा वतिने बिज होम महायज्ञ, राज्यस्तरीय दशनाम गोसावी समाज मेळावा ,
महाराष्ट्राचे प्रसिद्ध व्याख्याते अविनाश भारती यांचे प्रबोधन, व समाज रत्न पुरस्कार वितरण सोहळा , एकल गरजु महिलांना मदतीचे वितरण, गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा इत्यादी. एक ना अनेक कार्यक्रमाची मेजवानी संपूर्ण महाराष्ट्रातील पाहुण्यांच्या उपस्थितीत सदरील ठिकाणी अनुभवायला मिळणार असल्याचे जिल्हा युवा उपाध्यक्ष रवि बन आष्टी यांच्या वतीने सांगण्यात आली आहे. तरी बीड जिल्हातील व संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि धार्मिक वैचारिक सामाजिक सेवेची संधी द्यावी.
असे आव्हान व निमंत्रण कार्यक्रम आयोजकांच्या वतीने शेवटी रवि बन जिल्हा युवा उपाध्यक्ष यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment