नबाब मलीकांनी राजीनामा द्यावा .
माहूर भाजपाचे तहसिलदारांना निवेदन
माहूर ( प्रतिनिधी) मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी कडून जमीन खरेदी केल्या प्रकरणी ईडीच्या ताब्यात असलेले अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलीक यांनी राजीनामा द्यावा या मागणीचे निवेदन दिनांक 25 फेबूरवारी 2022रोजी माहूर भाजपतर्फे तहसिलदार माहूर यांना देण्यात आले.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलीक यांनी 1973 साली मुंबईत बॉम्बस्फोट प्रकरणातील सरदार शिकवली खान आणी सलीम पटेल यांचेकडून कवडीमोल भावाने जमीन खरेदी केल्या प्रकरणी ईडीने नबाब मलीक यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. नबाब मलीकांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावयास पाहीजे होता. परंतू सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीने देशाचा दुश्मन असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला मदत करणार्या नबाब मलीकांची पाठराखण करीत असून त्यांचा राजीनामा घेणार नाही असा निर्णय घेतला हिबाब निश्चितच लोकशाहीला घातक असून हा एकप्रकारचा देशद्रोहच आहे.महाविकास आघाडीच्या निर्णयाचा माहूर भाजपातर्फे जाहीर निषेध करून नबाब मलीकांच्या राजीनाम्याची मागणी करत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर प्रचंड घोषणाबाजी केली तसेच भ्रष्टाचारी मंत्री नबाब मलीक यांनी राजीनामा द्यावा अश्या मागणीचे निवेदन तहसिलदार किशोर यादव यांना दिले असून आपले निवेदन शासनाकडे पाठविण्यात येईल असे आश्वासन निवेदन कर्त्यांना दिले या निवेदनावर अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प. पू. शामबापू भारती महाराज , पत्रकार प्रकोष्टच्या जिल्हाध्यक्षा तथा महिला पत्रकार पद्माताई जयंत गीरे, तालूका अध्यक्ष अॅड दिनेश येउतकर, तालूका सरचिटणीस नीळकंठ मस्के, अच्युत जोशी, शहराध्यक्ष गोपू महामूने, जेष्ठ कार्यकर्ते विजय आमले, नंदकुमार जोशी संतोष त्याने, अर्जून मोहीते, किशोर राठोड, यांचेसह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
No comments:
Post a Comment