Sunday, 6 February 2022

निहीत स्वार्थासाठी हिंदु मुस्लिम असा प्रचार करणाऱ्या राष्ट्रवादीने आम्हांला धर्मनिपेक्षता शिकवू नये - डॉ.निरंजन केशवे

निहीत स्वार्थासाठी हिंदु मुस्लिम असा प्रचार करणाऱ्या राष्ट्रवादीने आम्हांला धर्मनिपेक्षता शिकवू नये - डॉ.निरंजन केशवे 
विनोद भारती
माहूर (प्रतिनिधी )स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्याने या पक्षाला फार मोठा इतिहास आहे. सर्व धर्माला सोबत घेऊन वाटचाल करणा-या काँग्रेस पक्षाने मागील पाच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन नगराध्यक्ष फिरोज दोसाणी व शितल जाधव यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. याशिवाय आमच्या पक्षाने मुस्लिम समाजाचा उपनगराध्यक्ष करून त्या समाजाला न्याय सुद्धा दिला होता.त्यामुळे आपले ईप्सीत साध्य करण्यासाठी कुणीही हिंदू/मुस्लिम असा भेदभाव करू नये असे मत काँग्रेसच्या वैद्यकीय सहाय्यता आघाडीचे राज्य समन्व्यक डॉ. निरंजन केशवे यांनी   प्रसारमाध्यमाशी बोलताना व्यक्त केले.
      पुढे बोलातांना ते म्हणाले आमचे नेते पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असतांना  माहुर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी 75 कोटी रुपयांचा भरीव निधी दिला होता. आताही साहेबांच्या नेतृत्वाखालीच या शहराचा विकास होऊ शकतो, अशी  शहरातील प्रत्येक नागरिकाची भावना आहे.चव्हाण साहेबांच्या आशीर्वादाने माजी नगराध्यक्ष प्राचार्य राजेंद्र केशवे यांनी सर्व जाती धर्माच्या नागरिकांना सोबत घेऊन आपल्या 14 महिन्याच्या कार्यकाळात पाठपुराव्यात सातत्य राखून नळ योजना कार्यान्वित करण्यासह अनेक विकास खेचून आणले,आणि त्यात दर्जाही राखला होता.विकासाबाबत शहरवासीयांची भावना लक्षात घेऊनच आम्ही काँग्रेस पक्षाचाच  नगराध्यक्ष करण्यासाठी आग्रही असल्याचे डॉ.निरंजन केशवे यांनी स्पष्ट केले. धर्मनिरपेक्षता हा काँग्रेस पक्षाचा मुळगाभा असल्याने वा आम्ही काँग्रेसजन त्या संस्कृतीत वाढल्याने  धर्मनिरपेक्षता डावलून हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारण्याचा प्रश्न येतोच कुठे असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

No comments:

Post a Comment