माहूर नगरपंचायतीने रस्त्यावर टाकलेले भंगार केले जप्त
नागरीकांनी रस्तयात असलेले बांधकाम साहीत्य त्वरीत हटवावे - मुख्याधिकारी किशोर यादव.
माहूर (प्रतिनिधी) शहरातील मुख्य रस्त्याच्या कडेला भंगार साहीत्य खरेदीची दुकाने थाटली असून शहरातील रस्त्यावर प्रचंड प्रमाणात भंगार साहित्य टाकून रहदारीस अडथळा निर्माण केला ज्यामुळे रस्त्याने येजा करणाऱ्या नागरिकांसह वाहनास अडथळा निर्माण केल्यामुळे शहरातील सूज्ञ नागरिकांनी नगर पंचायतकडे तोंडी व, लेखी तक्रारी करुन सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यावरील भंगार साहित्य त्वरीत हटवण्याची मागणी केली.त्या मागणीची दखल घेत सदर दुकाने शहराबाहेर हटविण्याबाबत भंगार खरेदी करणाऱ्या व्यावसायिकांना नगर पंचायत प्रशासनाचने सूचना (नोटीस)तामील केल्या होत्या 20 दिवसाच्या कालावधीनंतरही संबधित व्यवसाईकांनी भंगार साहित्य हटविले नासल्याने तहसिलदार तथा मुख्याधिकारी किशोर यादव यांच्या आदेशानुसार कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी यांच्या नेत्रूत्वात नगर पंचायतीच्या पथकाने दिनांक 7मे 2022 मंगळवार रोजी सकाळी 12 वाजताचे दरम्यान रस्त्यावर असलेले भंगार साहीत्य जप्त केले. उप अधिक्षक सुनिल वाघ, देविदास जोंधळे, देविदास सिडाम,विशाल ढोरे, विजय शिंदे, सुरेंद्र पांडे, स्वच्छतादूत गणेश जाधव, नय्युम पाशा, सहभागी झाले होते, या कारवाईप्रमाणे शहरातील हमरस्त्यावर सूरू असलेले पोल्ट्री फार्म, व शहरात सर्वत्र अतिशय क्रूरपणे होणारी कोंबडी, बकऱ्यांची कत्तल करुन उघड्यावर होणारी मांस विक्री, भररस्त्यात बिनदिक्कतपणे उभी असलेली वाहने, बांधकाम साहीत्य हटविण्यात यावे अशी माहूरवासियांकडून अपेक्षा व्यक्त केली जात असून याबाबत तहसिलदार तथा मुख्याधिकारी किशोर यादव यांना विचारणा केली असता जागा उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रयत्न सूरू असून जागा उपलब्ध झालेवर मांसविक्रीची दुकाने शहराबाहेर घालविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. असे असले तरी नागरीकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी उघड्यावर मांस विक्री करणार्या दुकानावर कठोर कारवाई करणार की त्यांना पाठीशी घालणार याकडे शहरातील नागरीकांचे लक्ष लागले आहे .
No comments:
Post a Comment