येवली येथील पल्लवी च्या विवाहाला साईप्रसाद बळीराजा चेतना अभीयानातुन मदतीची सामाजिक बांधिलकी
हदगाव (प्रतिनिधी ) - तामसा येथुन आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजे येवली ता.हदगांव येथील विठ्ठल सहदेव चोढेंकर यांना एक हेक्टर कोरडवाहू जमीन असुन पाचही मुलीच आहेत. शेती व मजुरी करून दोन मुलीचा विवाह केला.तिसरी मुलगी पल्लवी हिचा विवाह केदारनाथ येथील मुलांशी विवाह जुळला असुन पंधरा एप्रिल रोजी छोटेखानी विवाह ठरला . पहिल्या दोन मुलीचे कर्ज डोक्यावर असताना तिसऱ्या मुलीच लग्न ठरले.प्रत्येक मुलीला आपल्या विवाहाला काही तरी साहित्य असावे वाटते पण परिस्थितीमुळे साहित्य खरेदी करण्यासाठी अडचण आली असल्याची माहिती त्यांनी साईप्रसाद परीवाराला दिली.
गेल्या काही वर्षांपासून अनेक ठिकाणी गरजु कुटुंबासाठी मदत करीत गेल्या तीन काही महिन्यांपासून साईप्रसाद परीवाराकडुन नांदेड जिल्हा शेतकरी आत्महत्या मुक्त करण्यासाठी सुरू केलेल्या साईप्रसाद बळीराजा चेतना अभियानांतर्गत देश विदेशातील दानशूर व्यक्तींच्या दायीत्वाने मंगळवारी पाच रोजी पल्लवी च्या घरी नेहमी प्रमाणे कोणताही चेहरा समोर न येता निस्वार्थी पणाणे विवाहाच्या दहा दिवस अगोदर गोदरेज आलमारी गाधी पंलग संसार उपयोगी सर्व भांडी देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली. घरी आलेले साहित्य बघुन कुटुंबाला आनंदाला पारावार उरला नाही.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य राजेश फुलारी राजवाडीकर, राजकुमार वाकोडे, कंठाळे, शिंदे राजु पांडे, पत्रकार बंडु माटाळकर, रामराव मोहीते, राजु पांचाळ रेणापूर, प्रभाकर दहीभाते, यांच्या गावातील प्रतिष्ठित
No comments:
Post a Comment