वीज पडून मृत्यू पावलेल्या शेतकर्यांचे कुटुंबियांना 4 लक्ष रुपये चा धनादेश सुपूर्द
माहूर (.विनोद भारती) - शेतातील भुईमुगाचे कुटार झाकण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू पावल्याची घटना दि 19 मे रोजी सकाळी 7: 30 वाजता माहूर तालुक्यातील पालाईगुडा येथे घडली.किरण गेमसिंग जाधव वय 40 वर्षं असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.सदरील शेतकऱ्याच्या कुटुंबियांना 4 लक्ष रुपये चा धनादेश माहूर तहसील प्रशासनाच्या वतीने आज सुपूर्द करण्यात आला.
तालुक्यातील पानोळा हे येथील शेतकरी किरण गेमसिंग जाधव वय 40 वर्ष व त्यांची पत्नी विद्या हे दोघे दि.19 मे रोजी सकाळी 7 : 30 वाजेच्या दरम्यान पालाईगुडा (भोरड) येथील शेतकरी गणेश नरसिंग राठोड यांच्या शेतात भुईमुगाचे कुटार झाकण्यासाठी गेले असता अचानक विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला. या दरम्यान शेतात भुईमूग कुटारचा ढीग झाकण्याचे काम करीत असताना किरण गेमसिंग जाधव यांच्या अंगावर वीज पडल्याने तो बेशुद्ध झाला त्यास तातडीने माहूर च्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.त्यांची प्रकृती चिंताजनक वाटत असल्याने पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.
याबाबत सिंदखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. व महसूल प्रशासनाने पंचनामा करून रितसर प्रस्ताव शासनाकडे पाठवला. भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र राज्य चे सरचिटणीस धरमसिंग राठोड यांनी संबंधित लाभार्थ्यांस शासकीय मदत मिळावी यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. तबल दीड महिन्याच्या कालावधी नंतर संबंधित इसमाच्या कुटूंबियांना शासकीय मदत मिळाली.
यावेळी माहूर चे तहसीलदार किशोर यादव, मंडळ अधिकारी जी. पी.पडकोंडे,तलाठी व्ही.पी.राजूरवार आदींच्या उपस्थितीत मयत किरण जाधव यांची पत्नी विद्या किरण जाधव यांना 4 लक्ष रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.यावेळी पानोळा येथील सेवा सहकारी सोसायटी चे माजी चेअरमन संजय कुमरे, प्रल्हाद राठोड, निरंजन राठोड, सामाजिक कार्यकर्ते रवी पराते आदी उपस्थित होते.
-
No comments:
Post a Comment