Tuesday, 5 April 2022

इतिहास विभागाच्या वतीने ऑनलाईन राष्ट्रीय सेमिनार संपन्न

इतिहास विभागाच्या वतीने ऑनलाईन राष्ट्रीय सेमिनार संपन्न.

हदगाव (प्रतिनिधी ) : नायगाव बाजार येथील शरदचंद्र महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि आयक्यूएसी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सवानिमित शिवाजी महाराजांचे स्त्रीविषयक विचार या विषयावर एकदिवसीय ऑनलाईन सेमिनार दि.5 एप्रिल, 2022 रोजी घेण्यात आले या सेमिनारच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. हरीबाबू हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एज्युकेशन सोसायटी नायगाव बा. चे सचिव प्रा. रविंद्र चव्हाण हे होते. या समिनारचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदडचे अधिष्ठाता प्रो.डॉ. अजय टेंगसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमूख वक्ते प्रो.नितीनकुमार बावळे हे होते तर प्रमुख मार्गदर्शकाच्या भुमिकेत प्रो. डॉ. रामभाऊ मुटकुळे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. मुटकुळे म्हणाले की, भारतामध्ये आजही स्त्रीला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळाले नाही. स्वतःच्या घरापासूनच स्त्रीला स्वावंलंबी बनवून तिला सबळ बनविले पाहीजे तरच या देशात स्त्रीचा सन्मान होईल आणि छ. शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉ.के. हरीबाबू यांनी अतिशय महत्वाची माहीती दिली. भारतात पुर्वी महिलांचा सन्मान व्हायच्या देवीच्या रुपामध्येही त्यांना आपण सन्मान देतो . शिवाजी राजांना सर्व भारतभर आदर्श राजा मानतो तर मग शिवाजी राजांनी ज्या पद्धतीने स्त्रीयांचा सन्मान केलेला आहे त्यांना न्याय दिलेला आहे त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांना जीवनभराची अद्दल घडविली त्याच पध्दतीने त्यांचे अनुयायी कार्य केल्यास भारतात कधीच महिला, असहाय आणि मागास घटकावर कधीच अन्याय अत्याचार होऊ शकत नाहीत. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस इतिहास विभागाचे प्रमूख प्रो. डॉ. दादाराव पानपट्टे यांनी प्रास्ताविक मांडले.आयक्यूएसी चे समन्वयक प्रा. अमितकुमार पांडे आणि नॅकचे समन्वयक प्रा.डॉ. वैभव कवडे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तांत्रिक सहकार्य केले. इतिहास विभागातील प्रा. काठेवाडे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिले. सुंदर संचलन प्रा.डॉ. साईनाथ वाघमारे यांनी केले तर उपस्थित सर्वांचे  आभार प्रा.बालाजी गायकवाड आणि प्रा. साहेबराव गाणारकर यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ. श्याम पाटील, प्रो. डॉ. प्रकाश नांगरे, प्रो. बलभीम वाघमारे, प्रा.डॉ. शंकर गड्डमवार, प्रा.डॉ.एन.पी. सानप, प्रा.डॉ. सिद्दीकी, प्रा.डॉ. संजय भालेराव,प्रा.डॉ. राऊतखेडकर मॅडम,ग्रंथपाल डॉ.बी.आर. लोकलवार, प्रा.डॉ. शिंदे मॅडम, प्रा.डॉ. वाडीकर मॅडम, प्रा.पांगरकर मॅडम, प्रा.डॉ. गोविंद परडे, प्रा.डॉ.पी.जी. धुमाळे, प्रा. संजय गायकवाड,प्रा.डॉ. शेटकार, प्रा.पंढरी गायकवाड, प्रा. कमलाकर, प्रा.सुभाष गायकवाड यांच्यासह महाविद्यालयाचे अधिक्षक प्रशांत बिलवणीकर व सर्व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment