Thursday, 17 March 2022

ग्रामीण रुग्णालय माहूर येथे मोफत वैद्यकीय दंत, महाआरोग्य शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा - डॉ. व्यंकटेश भोसले

ग्रामीण रुग्णालय माहूर येथे मोफत वैद्यकीय दंत, महाआरोग्य शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा - डॉ. व्यंकटेश भोसले
विनोद भारती
माहूर ( प्रतिनिधी) राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत  ग्रामीण रुग्णालय माहूर येथे दिनांक 21मार्च 2022 रोजी सोमवारी मोफत वैद्यकीय व दंत चिकित्सा महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेआहे. दिनांक 21।मार्च रोजी सकाळी 9 ते दूपारी 2 यावेळेत  नाव नोंदणी करण्यात येणार असून दूपारी 4वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे तपासणीनंतर दिनांक 22ते24 मार्च या कालावधीत रुग्णांवर  तज्ञ डॉक्टरांकरवी विनामूल्य शस्रक्रीया केली जाणार असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. व्यंकटेश भोसले यांनी  दिली.
 नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी किर्तिकिरण पूजार, आमदार भीमराव केराम, खासदार हेमंत पाटील, यांची विशेष उपस्थिती लाभणार असून  डॉ.एकनाथडी.माले, .उपसंचालक आरोग्य सेवा लातूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर, डॉ. बालाजी शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड, यांचेसह डॉ. व्यंकटेश भोसले वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय माहूर, मांडवी, हिमायतनगर, उपजिल्हा रुग्णालय गोकूंदा येथील वैद्यकीय अधिकारी हे सहभागी होणार असून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी,राष्ट्रीय बाल स्वाथ्य योजनेतील वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका,  ग्रामीण रुग्णालय व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील एन. एम.व एम पी डब्ल्यू ईत्यादी सेवा बजावणार आहेत. आयोजित शिबिरात स्किल मिक्स सेवा अंतर्गत गूरू गोविदसिंग सामान्य रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर 21 रोजी तपासणीकामी उपलब्ध असणार आहेत. या शिबिरात हायड्रोसिल (अंडव्रुध्दी) हर्निया , अपेंडीक्स, शरीरावरील गाठीवर शस्त्रक्रिया,, दंत चिकित्सा मोफत औषधोपचार करण्यात येणार आहे. तसेच 35 वर्षावरील महीलांचे गर्भाशय मूख, व स्तन कॅन्सर , मानोरुग्णांची तपासणी, एक्सरे, ईसीजी,बी.पी.शूगर एच.टी एन.सी.डी प्रोग्राम, रक्त तपासणी, व सोनोग्राफी मोफत होणार असल्याचे डॉ. व्यंकटेश भोसले यांनी सांगितले. यासाठी अत्याधूनिक  शस्रक्रीया कक्षात सर्जन, व भूलतज्ञ डॉक्टरांकरवी रुग्णांवर शस्त्रक्रिया करून। मोफत औषधोपचार केले जाणार असल्याची  माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ .भोसले यांनी पत्रकारांना सांगितले 
माहूर हा आदिवासी बहुल डोंग्राराळ भाग असल्याने या भागातील रूग्णांना नांदेड, यवतमाळ येथे जाउन उपचार करणेसाठी शेकडो किलोमिटरचा प्रवास करून आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक दृष्ट्या  परवडणारे नसल्याने ग्रामीण रुग्णालय माहूर येथील आयोजित मोफत आरोग्य शिबीरात जास्तीत जास्त  रुग्णांनी तपासणी करून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा तसेच स्रीभ्रुण हत्या रोखण्यासाठी आरोग्य विभागाला  सहकार्य करावे असे आवाहन  डॉ. भोसले यांनी केले आहे

No comments:

Post a Comment