आम आदमी पार्टीची शाखा विस्तार बैठकीतचे हदगाव येथे आयोजन
हदगाव (प्रतिनिधी) दि 09 ऑक्टोबर 2022 रविवारी सकाळी 10 वाजता आर्य समाज मंदिर हदगाव जि. नांदेड येथे आम आदमी पार्टी च्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे .
भारत देशात सामाजिक राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे .शिक्षण , आरोग्य , रोजगार , लाईट , पाणी ,रस्ता , महिला सुरक्षा , बाल हक्क सुरक्षा , राशन , शेतीसाठी रस्ता-पाणी-लाईट व अन्य अत्यावश्यक सुविधा जनतेस फार कष्टाने व अपमानित होऊन मिळवाव्या लागत आहेत त्याही आवश्यक इतक्या दर्जेदार मिळत मिळत नाहीत . अनेक ठिकाणी अनियमितता व गैरप्रकार दिसून येत आहेत यास महाराष्ट्र राज्यातील जनता पूर्णपणे वैतागली आहे .अगोदर काँग्रेस - राष्ट्रवादी , नंतर सेना -भाजप , नंतर शिंदे -फडणवीस या सरकारानी पूर्णपणे जनतेचा विश्वासघात केल्याचे दिसून येत आहे .सदरील राज्यकर्त्यांनी केवळ आपला स्वतःचा स्वार्थ साधून घेऊन प्रचंड माया जमविली आणि आपल्या हितचिंतकाचे भले केल्याचे दिसून येत आहे . पैशातून निवडणूक जिंकणे आणि निवडणुकीतून अमाप पैसा संपत्ती मिळविणे हाच यांचा व्यवसाय दिसून येत आहे . शेतकरी , बेरोजगार , पूर्णतः उध्वस्त होत असल्याचे स्पस्ट झाले आहे .यास आता एकच पर्याय असल्याचे सर्वसामान्य नागरिक , युवक , युवती याचे म्हणणे आहे तो म्हणजे केजरीवाल व त्यांची आम आदमी पार्टी . दिल्ली , पंजाब या राज्याप्रमाणे शिक्षण-आरोग्य -लाईट -पाणी मोफत आणि बाकी व्यस्थेचे सुनियोजन सामाजिक न्याय हवा असेल तर आम पार्टी शिवाय दुसरा पर्याय नाही असे जनतेने मान्य केले आहे .म्हणून महाराष्ट्र राज्यात आम्हा सर्वांना मिळून आम आदमी पार्टीचे सरकार आणायचे आणि आपला विकास आपणच करून घेयायचा असा संकल्प जनतेनी केला आहे यास प्रत्येक्षात उतरविण्यासाठी त्या मार्गाने काम करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले आहे .तरी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे आपआपल्या ज्या जबाबदाऱ्या हव्या आहेत त्या अधिकृतपणे स्वीकारून कार्य करावे असे आवाहन आम आदमी पार्टी च्या वतीने करण्यात आले आहे .यावेळी अनेक नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे..
No comments:
Post a Comment