जिल्हाध्यक्ष हिमांशु इंगोले यांच्या उपस्थित सपन्न झाली बैठक
हदगाव (प्रतिनिधी ) - हिमायतनगर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे दि . २ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष हिमांश अ.इंगोले यांच्या अध्यक्षेखाली बैठक घेण्यात आली त्यात तर प्रमुख पाहण म्हणून नांदेड जिल्हा सचिव राजकमार भसारे या बैठकीस हजर होते.
बैठकीच्या सरवातीला भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान चे शिल्पकार लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली . त्यानंतर या बैठकित हिमायतनगर शहरा सह ग्रामीण भागात वेळोवेळी पत्रकारांच्या समस्या व गोर गरीब नागरीकांना लेखणीतून न्याय मिळून देण्यासाठी नेहमी अग्रेसर राहणारे नागोराव शिंदे पळसपरकर यांची ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी व करंजी येथील पत्रकार परमेश्वर सूर्यवंशी यांची हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी , उपाध्यक्ष गंगाधर गायकवाड सचिव पदी सनिल चव्हाण सल्लागार म्हणून आनंद जळपते कोषाध्यक्ष विनोद चंदनगे तर संघटक पदी विजय वाठोरे कृष्णा राठोड सहसचीव पदी निवड करण्यात आली .
उर्वरित कार्यकारनी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे परमेश्वर सूर्यवंशी यांनी सांगितले यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष हिमांश अ.इंगोले, जिल्हा सचिव राजक गरे, तस्रण भारत चे प्रतिनिधी मनोज पाटील, लोकपत्रचे दिलीप शिंदे, सामाजिक कार्यकर्ते मन्ना शिंदे, माधव कदम, राज गायकवाड, बाबराव जरगेवाड, पांडुरंग मिराशे, प्रशांत राहुलवाड सह आदि पत्रकार व कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते.
No comments:
Post a Comment