माहूर येथे कार्यरत असलेले स. पो.नि. पवार यांचेवरहोतोय अभिनंदनाचा वर्षाव
विनोद भारती
माहूर ( प्रतिनिधी) लातूर येथे विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात कार्यरत असताना लातूर येथील संजय नगरमधध्ये 16 एप्रिल 2018 रोजी शादूल राजहमद शेख या तरुणाचा निर्घून खून झाला होता. मयताचा मुलगा शामिम शादूल शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु. र.नं116/2018 कलम 302,143,147,148,149 भादवि प्रमाणे एकून 8 जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासनिक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार व त्यांचे सहकारी पोना विनोद चलनवाढ पोहवा हनूमंत कोतवाड मपोशि व्ही. एस. मुंढे.TMC. अधिकारी सपोनि बी. एम. तोडेवाड व सर्व आमदार .यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन या गंभीर प्रकरणाचा योग्यप्रकारे तपास करून लातूर जिल्हा सत्र न्यायालयात 8 आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीशए. व्ही. गुजराथी यांनी दिनांक 17 फेबूरवारी 2022रोजी या गुन्ह्यातील सर्व 8आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी 10000रु दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सध्या अण्णासाहेब पवार हे माहूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांनी या गंभीर प्रकरणात केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे,अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे,उपविभागीय अधिकारी विलास जाधव, पोलीस निरीक्षक नामदेव रीठे,नगराध्यक्ष फिरोज दोसानी ,उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, भाजपा कार्यकर्ते संजय बनसोडे, द पॉवर ऑफ मिडीयाचे तालूका अध्यक्ष विजय आमले, पत्रकार प्रकोष्टच्या जिल्हाध्यक्षा तथा द पॉवर ऑफ मिडीयाच्या महिला पत्रकार पद्माताई जयंत गीरे,विदर्भ न्यूजचे अधिक्रुत प्रतिनिधी संजय घोगरे, यांचेसह राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार यांनी त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव करत त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment