Tuesday, 13 December 2022

मौजे केदारगुडा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

मौजे केदारगुडा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत  विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू 
शेख मुख्तार
हदगाव (प्रतिनिधी ) -जिल्ह्यातील हदगाव तालुक्यांतील मौजे केदारगुडा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत एका विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे, मात्र या प्रकरणावरून शासनाच्या आणि शाळा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे एका निष्पाप, निरागस मुलीला आपल्या प्राणास मुकावे लागले असल्याचे दिसुन येत आहे.
 याचं शाळेच्या अनेक गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी काही महिन्यापूर्वीच अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनेच्या माध्यमातून  या आश्रम शाळेतील घडणाऱ्या विविध प्रकारच्या समस्या विषयी अवगत करून, निवेदन सादर करण्यात आले होते.त्या अनुषंगाने तत्कालिन प्रकल्प अधिकारी यांनी मु.अ.सह सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती पण शिक्षण विभागाच्या काही चतुर आधिकारी आणि कर्मचारी यांनी सोयीस्कर मार्ग शोधत कार्यवाही करण्याचे मुद्दाम हून टाळले.या बाबत शाळा प्रशासनात कोणत्याही प्रकारची सुधारणा न होता उलट या प्रकारच्या गंभीर घटना घडणे अतिशय निंदनीय बाब म्हणता येईल.
 याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत प्रकल्प कार्यालय किनवट अंतर्गत चालविली जाणारी शासकीय आदिवासी आश्रम शाळा केदारगुडा येथील इयत्ता ४ थी मध्ये शिकणाऱ्या मुलीच्या संशयास्पद मृत्यूने  जिल्ह्यातील सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. सदरील घटना दि.१२/१२/२०२२ अंदाजे सायंकाळी पाच ते सहा दरम्यान घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन थेट प्रकल्प कार्यालय आधिकारी किनवट, उप विभागीय पोलिस आधिकारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करत या प्रकरणाच्या दोषिवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
हि बातमी सर्व जिल्हाभर वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे अनेकांनी आश्रम शाळेला घेराव घालून पीडित मुलीस न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनास विनंती केली.यावेळी जमलेल्या लोकांचा एवढा आक्रोश होता की, तात्काळ कारवाई करण्याची प्रक्रिया पूर्ण करून या प्रकरणी जे दोषी असणाऱ्या व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अन्यथा मृतदेहास हात लावू देणार नाही, अशी विनंती केली होती पण शासनाच्या विविध आधिकारी आणि कर्मचारी यांच्या मध्यस्थीने काही वेळ तणाव निर्माण झाला होता पण संबंधित यंत्रणेने ठोस कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने जमलेल्या हजारोंचा रोष कमी झाला.                    शव विच्छेदन इन कॅमेऱ्यात करून दोषीवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी
 यावेळी हदगाव तालुक्यांसह ईतर ठिकाणावरून आदिवासी बांधवांनी एकच गर्दी केली होती. काल परवा भोकर आणि शंकरनगर येथील आदिवासी आश्रम शाळेतील मुलांना बेदम मारहाणीची घटना नुकतीच घडली असल्याने ही घटना घडणे म्हणजे प्रशासन या प्रकारच्या प्रकरणाचे गांभीर्य कितपत घेत आहे यावरून स्पष्ट दिसून येते. म्हणुन समस्त आदिवासी बांधवांनी  या प्रकरणाची विशेष बाब म्हणून शव विच्छेदन इन कॅमेऱ्यात करावी अशी मागणी करण्यात आली तसेच या प्रकरणात दोषी असणाऱ्या व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत पीडित मुलीस न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने जन आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 
 त्याचं बरोबर याच शाळेत या प्रकारच्या अनेक छोट्या मोठ्या प्रमाणावर घटना  मागिल काळात घडतच राहिल्या होत्या पण त्याला प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना न केल्यामुळेच ही दुर्देवी घटना घडल्याचे बोलल्या जात आहे.यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी श्रीमती भोसले नेहा, उपविभागीय पोलिस अधिकारी भोकर, हदगांव तालुक्याचे तहसीलदार श्री जिवराज डापकर, मनाठा येथील पोलीस निरीक्षक श्री विनोद चव्हाण , तामसा येथील पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे , आरोग्य अधिकारी मुरमुरे,यांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली. परंतु अद्याप मृत्यू नेमके चे कारण स्पष्ट झाले नाही ... अधिक तपास पोलीस प्रशानाच्या वतीने सूरू आहे.. यावेळी अनेक आदिवासी संघटनाचे प्रतिनीधी, पत्रकार बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment