आनंद दत्तधाम आश्रमात वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
दत्ता महाराज बितनाळकर पुण्यतिथी उत्साहात हजारो भक्तांचा मेळा
माहूर (प्रतिनिधी ) -
माहूर येथील आनंद दत्तधाम आश्रम उर्फ वसमतकर मठ येथे दि. २७ जून रोजी विविध कार्यक्रम संपन्न झाले. त्यामध्ये वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व महाप्रसाद आदी कार्यक्रमांचा समावेश होता. आनंद दत्त शाम आश्रम माहूर यांच्या वतीने माहूरगडावर गेल्या २५ वर्षापासून दैनंदिन अन्नदानाची परंपरा अविरतपणे सुरु असून कोरोना कालावधीत माहूर शहरात मोठ्या प्रमाणात गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व आवश्यक धनधान्य मठाच्या वतीने पुरविण्यात आले. तर ग्रामीण रुग्णालयात भरती रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळचे भोजन मोफत पुरविण्याचा उपक्रम सुरु केला. स्वच्छता अभियान राबविले. वृक्षारोपणचे उपक्रम सुरु केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम मोझरी ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रम वर्धा पर्यत सप्तसूत्री उपक्रम राबवून गुरुसंदेश पदयात्रा व संत बाळगीर महाराज स्वच्छता दिंडी च्या माध्यमातून भक्तांना आदर्श जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या स्वच्छता, शिक्षण, महिला बचत, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, शेतकरी आत्महत्या, जीवाचा उद्धार,आदी विषयावर कीर्तन, प्रवचनातून उपदेश केला.
द.भ.प. साईनाथ महाराज यांनी झोळी खांद्यावर घेऊन राज्यभर व्यसनमुक्ती व दुर्गुणमुक्तीचे दान मागण्याचा संकल्प केला. कोरोना प्रतिबंधक लसीकरण कॅम्पचे आयोजन करून लसीकरण मध्ये सहभाग घेतला. आश्रमाच्या वतीने वसमत, महागाव, सवना, मुदखेड, येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळचे मोफत भोजन आनंद दत्त धाम आश्रम माहूरशी संलग्न असलेल्या मठांच्या माध्यमातून देण्याचा उपक्रम राबविण्यात येते. दोन वर्ष कोरोना महामारीच्या अनुशंगाने प्रशासनाच्या प्रतिबंधामुळे नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करता अली नव्हती परंतु यावर्षी निर्बध खुले झाल्याने राज्यभरतील शिष्यमंडळीनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. कार्यक्रमास सीताराम ठाकरे पाटील, वसमत शिवसेना प्रमुख प्रभाकर क्षीरसागर, निळकंठ पाटील, भाऊराव पाटील, कॉंग्रेस माहूर तालुका प्रवक्ते जयकुमार अडकीने, रमेश तमखाने, विलास पाटील रोहीपिंपळगावकर, दिलीप पाटील कोपरकर, गजानन कलाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय माहूर चे एस. आर. देशमुख, सी. पी. जोशी, दवणे, राठोड, कातले आदिसह बहुसंख्य शिष्यमंडळी विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थित होती.
द.भ.प. साईनाथ महाराज बितनाळकर यांच्या सुश्राव्य कीर्तन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी गणित विषयक मार्गदर्शक पुस्तिका प्रा. वानखेडे यवतमाळ लिखित व प्रकाशित मॅथ३६० या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सकाळपासूनच महाप्रसाद कार्यक्रम सुरु होता.
No comments:
Post a Comment