Tuesday, 1 February 2022

महसूल पथकाच्या नाकावर टिचून पैनगंगा नदीपात्रातून अवैध रेती उत्खनन सुरूच

महसूल पथकाच्या नाकावर टिचून पैनगंगा नदीपात्रातून अवैध रेती उत्खनन सुरूच
विनोद भारती
 माहूर (प्रतिनिधी )यावर्षी 
माहूर तालुक्यातील पैनगंगा नदी पात्रातील आठ वाळू घाटापैकी एकाही घाटाचा लिलाव अद्याप झाला नाही.मात्र विदर्भ हद्दीतील काही घाटाचा लिलाव झाल्याची संधी साधून वाळू तस्कर महसूल पथकाच्या नाकावर टिचून माहूर हद्दीतून अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून वाहतूक करीत असल्याने शासनाचा लाखों रुपयाचा महसूल वाळू तस्कर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या मंडळीच्या घशात जात आहे.
   माहूर तालुक्यातून वाहणा-या पैनगंगा नदी पात्राचा दहा किमी अंतराचा परिसर निसर्गपूरक क्षेत्र (इको झोन )घोषित असल्याने मागील काही वर्षात एकाही वाळू घाटाचा लिलाव झाला नव्हता. मात्र गेल्या वर्षी लांजी या एकमेव वाळू घाटाचा लिलाव झाल्याने वाळू तस्करांनी इतर घाटातून प्रचंड प्रमाणात वाळू  उपसा करून त्याची चढ्या दराने विक्री केली होती. * पैनगंगा नदी पात्रातील माहूर तालुक्याच्या हद्दीत मोठया प्रमाणात वाळू उपसा करून त्याची वाहतूक सुरु असल्याची कल्पना आपण दि.30 जाने. रोजी दु.2 वाजून 7 मिनिटांनी भ्रमनध्वनीवरून तहसीलदार किशोर यादव यांना दिली होती. मात्र तुमचे म्हणणे काय? एवढेच बोलून त्यांनी भ्रमनध्वनी बंद केल्याची*  माहिती सामाजिक कार्यकर्ते नितीन तोडसाम यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.

No comments:

Post a Comment