Monday, 20 December 2021

महासंचालक पांढरपट्टे यांच्या आश्वासनानंतर जेष्ठ पत्रकारांचे उपोषण स्थगित

महासंचालक पांढरपट्टे यांच्या आश्वासनानंतर जेष्ठ पत्रकारांचे उपोषण स्थगित.
अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या लढ्याला यश.
हदगाव (प्रतिनिधी ) - आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसाठीचे अर्ज येत्या जानेवारी महिण्यातील बैठकीत सादर करुन घेऊन निर्णय कळविण्याचे आश्वासन राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांनी दिल्यानंतर चार जेष्ठ पत्रकारांनी आज नांदेड येथील जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयासमोरचे आपले आमरण उपोषण स्थगित केले असून यासाठी अ.भा.मराठी पत्रकार परिषदेने पाठींबा दिल्याने त्यांच्या या लढ्याला यश प्राप्त झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की,महाराष्ट्र शासनाच्या वतिने जेष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना सुरु करण्यात आलेली आहे मात्र या योजनेच्या पात्रतेसाठी जाणीवपूर्वक जाचक अटी लादून राज्यभरातील जेष्ठ पत्रकारांचा अवमान करण्यात येत आहे असाच प्रकार नांदेड येथेही घडला असून जेष्ठ पत्रकार डि.पी. विष्णुपूरीकर,माधव संताजी अटकोरे,मोहम्मद सत्तार आरेफ,सौ.अनुराधा धोंडोपंत विष्णुपूरीकर या चौघांनी या योजनेसाठी स्वतःची परिपूर्ण प्रस्ताव सादर केली होती परंतू, सदरील चारही प्रस्ताव तात्काळ मार्गी लावण्याऐवजी त्यात  जाणीवपूर्वक त्रुटी असल्याचे सांगून वेळोवेळी माघारी पाठवतांना संबंधित विभाग असलेल्या त्रुटींचा उल्लेख टाळून त्यांना या योजनेपासून वंचित ठेवित गत दोन वर्षांपासून  अपमानास्पद वागणूक देत असल्याने चौघांनीही वेळोवेळी सदरची गंभीर बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली मात्र त्यांनी दखल घेतली नसल्याने जिल्हा माहिती अधिकारी,नांदेड कार्यालयासमोर आज आमरण उपोषण सुरु केले होते.या घटनेची माहिती मिळतात अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी या बाबत लक्ष घातले तसेच,अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव कुलकर्णी, दै.प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, परिषदेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष विजय जोशी,माजी सरचिटणीस चारुदत्त चौधरी,नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप नागापूरकर, जिल्हा कार्याध्यक्ष गोवर्धन बियाणी,जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव मा.भवरे,महानगर कार्याध्यक्ष रविंद्र संगनवार, किरण वाघमारे आदींनी उपोषणाला भेट देऊन पाठींबा दिला.त्याचबरोबर,राज्याचे मुख्यमंत्री तथा,माहिती व जनसंपर्क मंत्रालयाचे मंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हा माहिती अधिकारी यांच्यामार्फत या प्रकरणात लक्ष देण्याबाबत सविस्तर निवेदन दिले.
 जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्याशीही या शिष्टमंडळाने सदरच्या न्यायीक मागणीबाबत सविस्तर चर्चा  केली.त्यांनी या प्रकरणात राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांना संपर्क साधून त्यांच्याशी यशस्वी चर्चा घडवून आणली सोबतच,त्यांनी या चारही जेष्ठ पत्रकारांचे प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सुतोवाच करुन त्यांच्याच आदेशानुसार राज्याचे माहिती (वृत्त व जनसंपर्क) संचालक दयानंद कांबळे यांनी उपोषणार्थी चारही पत्रकारांचे प्रस्ताव येत्या जानेवारी महिण्यातील समितीच्या बैठकीत सादर करुन निर्णय कळवू असे जिल्हा माहिती अधिकारी,नांदेड यांच्यामार्फत उपोषणार्थी यांना अवगत करावे असे आदेश लातूरच्या विभागीय माहिती कार्यालयाच्या उपसंचालकांना दिले त्यानुसार जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी तसे लेखी पत्र दिल्याने डि.पी.विष्णुपूरीकर, माधव अटकोरे,मोहम्मद अब्दुल सत्तार आरेफ,सौ.अनुराधा विष्णुपूरीकर या चारही जेष्ठ पत्रकारांनी त्यांच्या कार्यालयासमोरील आपले आमरण उपोषण स्थगित केले.
दरम्यान जेष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी सुरु केलेल्या योजनेत त्रुटींच्या नावाखाली प्रशासनाच्या निष्क्रिय कार्यपद्धतीमूळे अवमान होत असल्याने एका जेष्ठ महिला पत्रकारांसह तिन जेष्ठ पत्रकारांवर आमरण उपोषण बसण्याची वेळ आल्याने राज्यभरातील पत्रकार संतप्त झाले असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच माहिती व जनसंपर्क मंत्रालयाचाही कार्यभार असल्याने त्यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष देण्याची मागणी केली आहे.
 या उपोषणाला अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे माजी सदस्य तथा दै.उद्याचा मराठवाडाचे संपादक राम शेवडीकर,प्रल्हाद उमाटे,दै.पुण्यनगरीचे कालिदास जहागीरदार,सुधीर प्रधान,बजरंग शुक्ला,रविंद्र कुलकर्णी, राजकुमार कोटलवार,संघरत्न पवार,लक्ष्मीकांत पाटील,चंदन मिश्रा आदींसह नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे  पदाधिकारी व जिल्हाभरातील पत्रकारांनी भेट देऊन पाठिंबा दिला.

Tuesday, 30 November 2021

आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते आज रुई येथे विविध विकास कामाचे उध्दाटन व कार्यकर्ता सवांद कार्यक्रम

आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते आज रुई येथे विविध विकास कामाचे उध्दाटन व कार्यकर्ता सवांद कार्यक्रम


हदगाव (प्रतिनिधी) - विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते आज दि. १ डिसेबर रोजी हदगाव तालुक्यातील रुई (धा) येथे विविध विकास कामाचे उध्दाटन करण्यात येणार असल्याची माहिती रुईचे सरपंच तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा तालुकाध्यक्ष अमोल कदम रूईकर यांच्याकडून प्राप्त झाली आहे.


आमदार अमोल मिटकरी हे आज दि. १ डिसेबर रोजी हदगाव दौ-यावर येणार असून त्यांच्या हदगाव तालुक्यात विविध ठिकाणी भेटी गाठी होणार असल्याचे समजून येत आहे. त्यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा पहता अकोला, हिगोली, कमळनुरी,रुई (धा) ता. हदगाव, तामसा ता.हदगाव , विवाह सोहळा भेट असा दौरा असल्याचे कळत आहे. त्यांच्या आमदार निधी मधून हदगाव तालुक्यातील रुई (धा) येथे जे विकास कामे करण्यात येणार आहेत त्यांचे उध्दाटन देखिल होणार आहे. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काग्रेसचे तालुकाध्यक्ष वंसतरावजी देशमूख, डॉ.देवराव पाटील बाभळीकर, फेरोज खान पठाण तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. आमदार अमोल मिटकरी यांचा चाहता वर्ग तालुक्यात मोठया प्रमाणात असल्यामूळे रुई सरपंच मंडळीकडून त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम व कार्यकर्ता सवांद कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले असुन यावेळी ते आपल्या मित्रमंडळी व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याशी सवांद देखिल साधणार आहेत. विकास कामाचे उध्दाटन सायंकाळी ६ वाजता होणार असल्याने त्यांचे विचार ऐकण्यासाठी चाहत्या वर्गानी उपस्थित राहण्याचे आवाहण अमोल कदम रुईकर व सरपंच, उपसरंपच ग्रामपंचायत सदस्य व समस्त गावकरी मंडळीने केले आहे.


Wednesday, 24 November 2021

कवाना सह परीसरातील गावाच्या विकासासाठी कमी पडणार नाही - आमदार जवळगावकर

कवाना सह परीसरातील गावाच्या  विकासासाठी कमी पडणार नाही - आमदार जवळगावकर
बरडशेवाळा  (प्रतिनिधी)- पळसा जिल्हा परिषद गटातील तरोडा,  चोंरबा खु, चोंरबा बु, पिंगळी,गारगोटवाडी , खरबी, कुसळवाडी, गारगव्हान  या आठ गावातील सभामंडपासाठी आमदार स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी दहा लाख निधीचे व कवाना येथील तिर्थक्षेत्र श्री संत नंदी महाराज सभागृहाचे पंचेवीस लाख रुपये निधीतून झालेल्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा व गारगव्हान येथील शाळेच्या नवीन बांधकाम वर्ग खोलीचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते सोमवार २२ रोजी संबंधित गावात छोटेखानी कार्यक्रमात उदघाटन करण्यात आले.
कवाना येथील उपसरपंच तथा आमदार जवळगावकर यांच् समर्थक संदिप पवार यांनी कवाना येथील तिर्थक्षेत्रासह गावातील विविध विकास कामांसाठी आमदार जवळगावकर यांच्या कडे मागणी केली. 

आमदार जवळगावकर मार्गदर्शन करताना  म्हणाले की मी कवाना गावासह तिर्थक्षेत्र श्री संत नंदी महाराज संस्थानासह  प्रत्येक गावातील  विकासासाठी कमी पडणार नाही असे आश्वासन कवाना सह छोटेखानी उपस्थित कार्यक्रमात प्रत्येक नागरिक कार्यकर्ते यांनी दिले.
यावेळी काँग्रेस कमिटी चे तालुका अध्यक्ष आनंदराव भंडारे, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव सावतकर, जिल्हा परिषद सदस्य के.सी.सुर्यवंशी,  डिंगांबर साखरे, गुलाबराव हाके, विलासराव मस्के, सुभाषराव राठोड, नंदाताई पाटोदे संरपंच, पुजा पवार उपसरपंच कवाना, पिंगळी सरपंच अशोकराव पालकर, गारगव्हान संरपंच वाढवे , नारायण नाईक, शिवाजी मस्के लिमटोक, हटी नाईक, रमेश राठोड, रामराव मिराशे, इस्माईल पिंजारी, आनंदराव मस्के, नारायण गव्हाडे सरपंच नरवाडे खरबी, चोंरबा देशमुखे सरपंच कुसळवाडी देशमुखे सरपंच, आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, यांच्या सह  गावातील प्रतिष्ठित नागरिक कार्यकर्ते  उपस्थित होते.

खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे पैनगंगा नदीवरील कारखेड -वाटेगाव पुलाला मंजुरी

खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे पैनगंगा नदीवरील कारखेड -वाटेगाव पुलाला मंजुरी
हदगाव (प्रतिनिधी ) : गेल्या अनेक वर्षा पासून हदगाव तालुक्यातील वाटेगाव व उमरखेड तालुक्यातील कारखेड दरम्यान पैनगंगा नदीवर पुल बांधण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांमधून करण्यात येत होती, याच पुलाच्या मंजुरीसाठी नागरीकांच्या मागणी वरून खासदार हेमंत पाटिल यांनी पाठपुरावा केल्यामुळे   त्यास बांधकाम विभागाने मंजुरी दिल्याने मराठवाडा विदर्भ तेलंगणा राज्याशी दळणवळणाचा प्रश्न  मिटणार आहे.यामुळे उमरखेड,महागाव  तालुक्यातील बंदी भाग , किनवट, हदगाव,हिमायतनगर तालुक्यातील नागरीकांना याचा मोठा लाभ होणार आहे.
       हदगाव तालुक्यातील वाटेगाव  आणि उमरखेड तालुक्यातील कारखेड दरम्यान पैनगंगा नदी वाहते या नदीवर हरडफ बंधारा आहे, पावसाळ्यात नदीला पाणी असतांना खरीपाच्या दरम्यान बंधारा कोंडल्यावर नदी पात्रात  मोठ्या प्रमाणात पाणी साचते, त्यामुळे उमरखेड तालुक्यातील कारखेड देवसरी सह पंचक्रोशीतील नागरीकांना रूकावरून प्रवास करत हदगाव जावे लागते, किंवा पन्नास किंमी चे अंतर कापत उमरखेड मार्गे हदगाव पोहचावे लागते केवळ पैनगंगा नदीवरील पुलामुळे होणारी परवड थांबवण्यासाठी हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा करून पुलास मंजुरी मिळुन द्यावी अशी मागणी येथील नागरीकांनी केली होती.
     याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी संबंधित विभागाशी सातत्याने पाठपुरावा केला.याबाबत ते म्हणाले की, हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हिमायतनगर - हदगांव या जवळच्या रस्त्यावर, कारखेड फाटा ते वाटेगांव दरम्यान पैनगंगा नदीवर पुल होणे आवश्यक आहे. सदरील पुल झाल्यास मराठवाडा व विदर्भातील २० ते २५ गावांना प्रवास करण्यासाठी व वाहतूकीसाठी जवळपास ४० कि.मी. चे अंतर कमी होईल. तसेच दवाखाना, शिक्षण, बाजार व ऊस वाहतुकी संदर्भात सर्व अडचणी दुर होवून, मराठवाड्यातील हदगांव व नांदेड जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यास सोईस्कर होईल. याचा विचार करून मौ.कारखेड ते वाटेगांव दरम्यान  पैनगंगा नदीवर (प्र.जि.मा.-६२) पुल मंजूर करुन निधी उपलब्ध करून द्यावा. खासदार हेमंत पाटील यांनी ही बाब मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली होती, त्यामुळेच या पुलास मंजुरी मिळाली आहे.याबाबत या भागातील नागरिकांमधून खासदार हेमंत पाटील यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

Friday, 12 November 2021

माहूर नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर ; अनेक दिग्गजांचा झाला भ्रमनिरास.

माहूर नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर
अनेक दिग्गजांचा झाला भ्रमनिरास
विनोद भारती
माहूर ( प्रतिनिधी)नगर पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 2021 च्या अनुषंगाने माहूर नगर पंचायतीचेएकून 17 वार्डासाठी वाॅर्डनिहाय आरक्षणाची सोडत तहसील कार्यालयात सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तिकीरण पूजार यांच्या अध्यक्षतेखाली तहसिलदार तथा मुख्याधिकारी राकेश गिड्डे,नायब तहसिलदार  व्हि. टी. गोविंदा, पोलीस निरीक्षक नामदेव रीठे, यांच्या उपस्थितीत पार पडली असून वॉर्ड क्रमांक 1,7.11,13,15हा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी  तर वॉर्ड क्रमांक 2,4,10,11,13,14,15सर्व साधारण महीलांसाठी आरक्षित झाला तर , वार्ड क्रमांक3,8, obc  खुला प्रवर्ग, वार्ड क्रमांक 5अनूसूचित जाती महीला, वार्ड क्रमांक 6,9,12ओ.बी.सी.महीला, वार्ड क्रमांक 16 अनुसूचित जाती (खुला) वार्ड क्रमांक5, 17 अनुसूचित जाती महीलांसाठी आरक्षित झाला, असल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या अनेक दिग्गजांचा मात्र भ्रमनिरास झाला असून कही खुशी कही गम असे वातावरण निर्माण झाले आहे,एकून 17 प्रभागाचे आरक्षण सहा. जिल्हाधिकारी किर्तिकीरण पूजार यांनी जाहीर केले यावेळी पत्रकार, सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते, या बैठकीचे सूत्र संचलन नगर पंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी केले

Saturday, 6 November 2021

हदगाव येथे "स्वर दीपावली" संगीत मैफिलीचे आयोजन

हदगाव येथे "स्वर दीपावली" संगीत मैफिलीचे आयोजन
हदगाव (प्रतिनिधी ) - हदगाव येथील व्यापारी बांधवांच्या वतीने रविवार दिनांक 7 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री सात वाजता स्वर दीपावली या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
 हदगाव येथील राष्ट्रीय क्लब मैदानावर संपन्न होणाऱ्या स्वर दीपावली संगीत मैफिलीमधे गायक प्रा. डॉ. शिवराज शिंदे, गायिका प्रियंका मनाठकर, नांदेड तसेच गायक प्रा. डॉ. राहुल भोरे, सय्यद अमजद या कलाकारांचा समावेश असणार आहे. त्यांना तबला साथ स्वप्नील धुळे, ढोलक साथ परमानंद जाधव, कीबोर्ड अजय शेवाळे व अमित पूर्णेकर, ॲक्टोपॅड आदित्य डावरे हे नांदेड येथील कलाकार साथ-संगत करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन व्याख्याते गजानन जाधव हे करणार आहेत. या कार्यक्रमासाठी हदगाव येथील सर्व व्यापारी बांधवांच्या सहकार्याने दीपावली निमित्त या स्वर मैफिलीचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये मराठी, हिंदी चित्रपटगीत तसेच अभंग, भावगीत, भक्तीगीत, गवळण, लावणी, पोवाडा व इतर गीतप्रकारांचे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन हदगाव व्यापारी बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे.

Thursday, 21 October 2021

बहुचर्चित भोंदूबाबा कपलेसह इतर आरोपींंची न्यायालयीन कोठडीत रवानगी

बहुचर्चित भोंदूबाबा कपलेसह इतर आरोपींंची न्यायालयीन कोठडीत रवानगी 
---------------------------------
* दोन लाखांपेक्षा अधिक मुद्देमाल जप्त.
महीला आरोपी फरार
विनोद भारती
माहूर ( प्रतिनिधी) शहराच्या दक्षिणेकडील बाजुला असलेल्या गणेश मंदिराजवळ गेल्या दोन तीन।  वर्षापासून अविश्वजीत कपले या भोंदूबाबाने ठाण मांडले त्याने दैवीशक्ती प्राप्त असल्याचे भासवून अघोरी क्रुत्य करत दैविशशक्तीच्या प्रकोपाची भीती दाखवून भोळ्या भाबड्या जनतेची लुबाडणूक करुन प्रचंड प्रमाणात माया गोळा केली .डोंबिवली येथील अभियंता प्रविण शेरकर यांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच माहूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून त्याचा गोरख धंदा उघडकीस आणलासदर प्रकरणी माहूर पोलीसांनी भोंदूबाबा कपलेसह चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पोलीसांनी पुसद येथून तिन आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले मात्र महीला आरोपी मात्र अद्याप फरार होण्यात यशस्वी झाली आहे. तीनही आरोपींना  न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. दिनांक 18 आॅक्टोबर रोजी आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता  दिवानी कनिष्ठ प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पवनकुमार तापडिया यांनी आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. 
सदर प्रकरणात पोलीस निरीक्षक नामदेव रीठे, सहायक पोलिस निरीक्षक संजय पवार, बिट जमादार विजय आडे, प्रकाश देशमुख यांनी त्याच्या पुसद येथील राहत्या घरातून एक चारचाकी वाहन, लॅपटॉप, एक फ्रीज, वेल्डिंग मशीन व एक हॅकर मशिन दोन मोबाईल असा एकून दोन लाख 86 हजाराचा मुद्देमाल जप्त केलाअसून या भोंदूबाबाने आजपर्यंत असून किती लोकांची फसवणूक केली याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा आहे, सदर गुन्ह्यातील महिला आरोपीचा पोलीस शोध घेत असल्याचे पोलीस निरीक्षक नामदेव रीठे यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगीतले.

Friday, 1 October 2021

माहूर नगर पंचायत कार्यालयात जेष्ठ नागरिक कक्षाची केली स्थापना

माहूर नगर पंचायत कार्यालयात जेष्ठ नागरिक कक्षाची केली स्थापना
माहूर ( प्रतिनिधी)शासनाच्या वतीने जेष्ठ नागरिकांसाठी  थोडेसे मायबापासाठी पण हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्याअनुषंगाने विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या आदेशानुसार नुसार मुख्याधिकारी राकेश गिड् यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 1 आक्टोंबर 2021 रोजी जेष्ठ नागरिक दिनानिमित्त नगर पंचायत कार्यालयात थोडेसे मायबापासाठी  या उपक्रमांतर्गत कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी यांच्या हस्ते जेष्ठ नागरिक कक्षाची स्थापना करण्यात आली यावेळी न. पं. च्या। वतीने जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला, या उपक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन शहरातील जेष्ठ नागरीकाची माहीती संकलीत केली जाणार असून नगर पंचायत कार्यालयामार्फत शासनाला अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी यांनी दिली यावेळी संदीप थोरात, सहा प्रकल्प अधिकारी देविदास जोंधळे, सुरेंद्र पांडे, विजय शिंदे यांचेसह अनेकांची उपस्थिती होती

Tuesday, 7 September 2021

परीस्थिती लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे - उपविभागीय अधिकारी डापकर यांचे आवाहन

परीस्थिती लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे - उपविभागीय अधिकारी डापकर यांचे आवाहन
बरडशेवाळा  (प्रतिनिधी ) हदगाव तालुक्यासह बरडशेवाळा बामणी फाटा पळसा मनाठा करमोडी उंचाडा पिंपरखेड परीसरात  दोन दिवसांपासून सुरू असलेला पावसाने कहर केला आहे.   हदगाव तालुक्यातुन जात असलेल्या कयाधू पेनगंगा नदी पात्रात हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्याने हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील जवळच्या अंतरासाठी सोयीच्या दृष्टीने अनेक गावांच्या दळणवळणाच्या सुविधेसाठी असलेल्या करमोडी ते उंचाडा कमी उंचीच्या पुलावरून व पिंपरखेड ते मार्लेगाव या मार्गाने दोन्ही नदीला पूर आला असल्याने  सोमवार रात्री पासून संपर्क तुटला असुन नदी नाले ओढे भरून वाहत असल्याने काठावर असलेले पिके पाण्याखाली असल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.हवामान खात्याने आणखी चार दिवस पाऊस असल्याचे सांगितले असल्याने हदगाव हिमायतनगर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांनी  पिंपरखेड येथे नदी काठावर जाऊन पाहणी करीत परीस्थितीची माहिती प्रशासनाला कळवुन आपल्या यंत्रनेला सतर्कचे आदेश दिले.तर पिंपरखेड ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असे आवाहन केले.
यावेळी हदगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हनुमंतराव गायकवाड, पिंपरखेड येथील सरपंच पिंटु पाटील, उपसरपंच पाईकराव, माजी उपसरपंच ओमप्रकाश येवले, पोलिस पाटील, तलाठी कुलकर्णी, वटाणे, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

नदीलगतच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे - सुभाष वानखेडे

नदीलगतच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे -  सुभाष वानखेडे
हदगाव (प्रतिनिधी)- तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टी होत आहे.काही ठिकाणचा गावातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे लाईट नाही आश्या परिस्थितीत नागरिकांनी स्वत:ची व  आपल्या परिवाराची काळजी घेवून सुरक्षित घरीच राहावे .
एक दोन दिवस हि अतिवृष्टी जन्य परिस्थिती राहाण्याची शक्यता  हवामान खात्याने वर्तवली आहे. हिंगोली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावातिल संपूर्ण नागरिकांनी सतर्क राहावे आसे अव्हान हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार सुभाष वानखेडे यानी केले आहे.
या वर्षीचा पावसाळा खूपच अतिवृष्टी जन्य आहे.एवढ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे की थांबायचं नावच घेत नाही.गेली 2 दिवस झाले एकसारखा धो धो पाऊस पडतच आहे.काही गावातील घराच्या आजूबाजूने नाल्यासारखे पाणी वाहत आहे.
 हिंगोली मतदारसंघातिल नागरिक या अतिवृष्टी ने हतबल होवुन आपला जिव मुठीत धरुन राहत आहेत आश्यावेळी बाहेर न निघणे व घरातच राहुन काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यातच लाईट नसल्याने अबाल वृधांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत.काही ठिकाणी प्रचंड पावसामुळे विजेचे सगळे खांब मोडुन पडल्याने या परिस्थिती ला सामोरे जावे लागत असल्याचे कळते व काही ठिकाणी पावसाच्या ओलाव्यामुळे लोखंडी पोलला कंरट लागण्याचीही भिती आसल्याने काही अनुचित प्रकार घडुन जिवित हानी होवु नये म्हणून विज वितरण कंपनीकडून खबरदारी घेतल्या जात असल्याचेही समजते .
गावा गावात नाल्यासारखे जे पाणी वाहत आहे त्या पाण्याने आता गल्लीत उग्र रूप धारण केलेले चित्र काही ठिकाणचे दिसत आहे.विशेषतः शेतकरी व नदिलगतच्या गावकर्याना स्वतः बरोबर आपल्या गुरा-जनावराची सुरक्षित ठिकाणी ठेवणे महत्त्वाचे आहे दोन तिन दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आपण खचुन न जाता या अतिवृष्टी चा सामना करुन आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी आसे अव्हान माजी खासदार सुभाष वानखेडे यानी नागरीकांना केले आहे.

Monday, 6 September 2021

हदगाव येथे विविध ठिकाणी बैल पोळा उत्साहात साजरा

हदगाव येथे विविध ठिकाणी बैल पोळा उत्साहात साजरा

हदगाव /बरडशेवाळा (प्रतिनिधी) - हदगाव तालुक्यात बैल पोळा सण साजरा हदगाव तालुक्यातील विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. मौजे बरडशेवाळा सह परिसरात बळीराजा साठी सर्वात आनंदाचा क्षण असलेला बैल पोळा हा सण साजरा करत असताना मौजे बरडशेवाळा येथील गेल्या काही वर्षापासून जगावर कोरोना सारख्या महामारी संकट असल्यामुळे शासनाच्या नियमानुसार आपल्या घरीच बैलजोडीची पूजा करून आनंदाने साजरा केल्याचे चित्र दिसून येत आहे. 
मौजे बरडशेवाळा, पळसा, बामणी, मनाठा परिसरात पोळा हा सण साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे निवघा बाजार परिसरात हस्तरा, बोरगाव, रुई, धानोरा या परिसरात देखील पोळा हा सण साजरा करण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. 
तालुकयातील बरडशेवाळा येथे काँग्रेस कार्यकर्ते आनंदराव मस्के यांनी बैल पोळा सन उत्साहात साजरा केला. याच बरोबर बरडशेवाळा येथील शेतकरी बालाजी दुर्गे, संतोष मस्के, निवघा बाजार येथील विकास मस्के पळसा येथील ज्ञानेश्वर हराळे, हडसनी येथील राहुल शिवशंकर गिरी यांनी परंपरे नुसार चालत आलेला बैला पोळा हा सन बैलांची सजावट करुन व त्याला नैवद्य दाखवुन अशिर्वाद घेत साजरा केला.

Thursday, 2 September 2021

माहूर न. पं. कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केला ठाण्यातील घटनेचा निषेध

माहूर न. पं. कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केला ठाण्यातील घटनेचा  निषेध
माहूर (प्रतिनिधी ) ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पीता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्याचा माहूर नगर पंचायत कर्मचा-यांनी   काळ्या फिती लावून निषेध केला. 
         अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनाधिकृत हातगाड्यांवर कारवाई करीत असतांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या  हातगाडीवाल्यांनी सहाय्यक आयुक्त व त्यांच्या अंगरक्षकावर  तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला केला.त्यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली. या गुन्हेगारी कृत्याचा कर्मचारी संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष वैजनाथ स्वामी, देविदास सिडाम,सुनील वाघ,गंगाधर दळवे,सुरेंद्र पांडे,विशाल ढोरे, विजय शिंदे,मंगल देशमुख,नयुम शेख,मजर शेख,भाग्यश्री रासवते, देविदास जोंधळे,संदीप थोरात, गणेश जाधव,शेख शफिबाबी, विलास बरडे यांनी काळ्या फीती लाऊन निषेध करून तशा   आशयाचे निवेदन मुख्याधिकारी राकेश गिड्डे यांना दिले.

कोरोना योद्धा म्हणून पत्रकारांचा होणार सन्मान

कोरोना योद्धा म्हणून  पत्रकारांचा होणार सन्मान
 माहूर (प्रतिनिधी )पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने दि.3 सप्टें.रोजी स.11-30 वा.स्थानिक बालाजी मंगलम च्या सभागृहात आ.भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेत व पुढील प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत पत्रकार,वृत्तपत्रे विक्रेते व दृक्श्राव्य माध्यमांच्या प्रतिनिधींचा कोरोना योद्धा म्हणून सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात येणार आहे.या सन्मान सोहळ्याला सहाय्यक जिल्हाधिकारी  किर्तीकिरण पूजार,उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव,तहसीलदार सिद्धेश्वर
वरणगांवकर, नगराध्यक्षा शीतल जाधव, मुख्याधिकारी राकेश गिड्डे,गटविकास अधिकारी युवराज मेहेत्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्यंकटेश भोसले,पॉवर ऑफ मीडियाचे राज्य संघटक संदीप बाजड,पो.नि.नामदेव रिठे,डॉ.पद्माकर जगताप (पॉ.ऑ. मी.वैद्यकीय संघटना )व अॅड.दिनेश येऊतकर (पॉ.ऑ.वकील संघटना ) यांची  उपस्थिती लाभणार आहे. 
              कोरोना काळात आपल्या जिवावर उदार  होऊन आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडणाऱ्या  पत्रकारांचा पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने राज्यभर क्रांती पर्व अंतर्गत सन्मान केला जात  आहे.त्याच धर्तीवर पॉवर ऑफ मीडिया माहूरच्या वतीने पत्रकार,वृतपत्र विक्रेते व दृक्श्राव्य माध्यमांच्या प्रतिनिधींचा सन्मान चिन्ह देवून सन्मान केल्या जाणार आहे.*तालुक्यातील सर्वच पत्रकार संघटनेतील प्रतिनिधींना सन्मानपूर्वक निमंत्रित करून ज्येष्ठते नुसार सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती सचिव  नंदकुमार जोशी यांनी दिली.

Tuesday, 31 August 2021

ठाणे येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा हदगाव नगर परिषदेच्या वतीने जाहीर निषेध

ठाणे येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा हदगाव नगर परिषदेच्या वतीने जाहीर निषेध
 महाराष्ट्र राज्य नगरपरिषद , नगरपंचायत कर्मचारी / संवर्ग कर्मचारी संघटना शाखा हदगाव जि.नांदेड यांच्या वतीने काळ्या फिती लावून जाहीर निषेध 
-----------------------------------------------------------
हदगाव (प्रतिनिधी ) - ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे यांचेवर झालेल्या भ्याड हाल्याचा जाहीर निषेध म्हणून एक दिवस काळ्या फिती लावून काम बंद बाबत   दि. 30 ऑगस्ट 2021 रोजी ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे या सायंकाळी 5.30 च्या सुमारास अतिक्रमण विरोधी पथक घेवून अनाधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत असताना तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीचे फेरीवाले यादव यांनी त्यांच्यावर व त्यांचे सुरक्षा रक्षकावर कार्यालयीन कामकाज करत असतांना शासकीय कामात अडथळा करून त्यांचेवर जीवघेणा हल्ला केला . यामध्ये त्यांच्या हाताची बोटे छाटली असून गंभीर स्वरूपाचा भ्याड हल्ला केला आहे . या सर्व प्रकाराचा हदगाव नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे व हदगाव नगर परिषद सर्व कर्मचारी आज दिनांक 31 ऑगस्ट 2021 रोजी काळ्या फिती लावून काम  करण्यात येत आहे. अशा प्रकारचे निवेदन प्रभारी मुख्याधिकारी नगरपरिषद यांच्याकडे दिले आहे .या निवेदनावर चक्रपाणी कदम, प्रशांत जोपळे, श्यामसुंदर मोरे,कुलदीप बोकारे, श्रीमती मीराताई गुंडे, शेख अमेर फहिम अहमद, श्रीमती शैलजा, फुलारी शेख अजीम शेख इकाब, या निवेदनावर सर्व कर्मचारी नगर परिषद हदगाव यांच्या स्वाक्षर्‍या आहेत

श्री महादेव मठ संस्थान येथे संजीवनी समाधी श्री गुरू बसवलिंग स्वामी यांचा 856 स्मृती महोत्सव चे आयोजन


श्री महादेव मठ संस्थान येथे संजीवनी समाधी श्री गुरू बसवलिंग स्वामी यांचा 856 स्मृती महोत्सव चे आयोजन 

हदगाव (प्रतिनिधी) - श्री महादेव मठ संस्थान येथे संजीवनी समाधी श्री गुरू बसवलिंग स्वामी यांचा 856 स्मृती महोत्सव चे आयोजन शिव चैतन्य महाराज यांच्या अध्यक्षतेखाली  करण्यात आले. यावेळेस हदगाव पंचक्रोशीतील सर्व वीरशैव लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळेस गुरू बसवलिंग स्वामी संजीवनी समाधी वर अभिषेक करण्यात आला व त्यानंतर परम रहस्य पारायणाचे अध्ययन झाले व महाआरती करण्यात आली व महाप्रसाद वाटप करण्यात आला . कार्यक्रम कोरोना महामारी चे नियम पाळून साजरे करण्यात आला. या वेळेस शिव चैतन्य महाराज यांनी समाज बांधवांना उपदेश दिला व या कार्यक्रमासाठी महादेव मठ संस्थान कमेटी सदस्य ऊत्तमराव टिकोरे नारायणराव लामतुरे, मारोतराव चंदापुरे , अंबादासराव सोनोने, उमाकांतराव राऊतराव नामदेव  वाकोडे, बालाजी घाळाप्पा, शिवकुमार महाजन व किसनराव मुखेडी, नारायण सोनोने, बाळु कंठाळे ,अशोकराव टिकोरे , देवानंद महाजन ,सतिष महाजन  ,संतोष टिकोरे ,निखील तोडकर  ,विलास पोगरे , देविदास  टाले आणि हदगाव  परिसरातील भाविक भक्त महिला मंडळ उपस्थित होते.

Tuesday, 24 August 2021

हिंमत असेल तर नारायण राणेनी माहूर -किनवट तालुक्यात येऊन दाखवावे : ज्योतीबा खराटे

हिंमत असेल तर नारायण राणेनी माहूर -किनवट तालुक्यात येऊन दाखवावे : ज्योतीबा खराटे

विनोद भारती
श्रीक्षेत्र माहूर ( प्रतिनिधी  )केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बाबत  आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे  पडसाद माहूर शहरात उमटले आहेत.दि.24 ऑगस्ट रोजी दु.1 वा.जिल्हा उपप्रमुख ज्योतीबा खराटे यांचे नेतृत्वात शिवसैनिकांनी   जोरदार घोषणा देत पुतळा जाळून राणे यांच्या   त्या वक्तव्याचा जाहीर  निषेध केला. यावेळी खराटे यांनी हिंमत असेल तर राणे यांनी माहूर -किनवट तालुक्यात येऊन दाखविण्याचे आव्हान दिले.
     यावेळी तालुका प्रमुख सुदर्शन नाईक,शहर प्रमुख निरधारी जाधव,युवा सेनेचे संदीप गोरडे,शोषल मीडिया प्रमुख जितु चोले,दिपककाका कन्नलवार,पं.स.चे माजी सभापती नामदेव कातले,अभिषेक जयस्वाल, उपसभापती उमेश जाधव, अशोक उपलवाड, दिपक कांबळे,सुरेश आराध्ये,संतोष दुबे,अभिषेक दुबे,हनुमंत मुंडे,खुशाल तामखाने,प्रफुल्ल बाळसकर,सदानंद पुरी यांचेसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.पो.नि.नामदेव रिठे यांचे नेतृत्वात  स.पो.नि. अण्णासाहेब पवार,शारदासूत खामनकर,इंगळे,कन्नलवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
वय,समाज आणि वर्ण याचे बंधन नसणारी...‘मैत्री’
ग्रामीण भागातही जागतिक मैत्री दिवस साजरा

नितिन कन्नलवार
वाई बाजार (प्रतिनिधी) - संपूर्ण जगात दिनांक एक ऑगस्ट हा जागतिक मैत्री दिवस म्हणून साजरा केला जातो.या दिवशी मित्र-मैत्रिणी एकमेकांच्या मनगटावर फ्रेंडशिप बॅन्ड बांधून आपल्या घट्ट मैत्रीचे प्रतिक म्हणून साजरे करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून माहितीचे आदान-प्रदान इतका मोठ्या प्रमाणात होत आहे की ते हौशी तरुणांपासून शाळकरी चिमुकला पर्यंत वैश्विक स्तरावरील अनेक ‘डे’ साजरे केले जातात. याच पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अनुकरण ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात केले जात असल्याचे उदाहरण आज झालेल्या मैत्री दिवसाच्या निमित्ताने चिमुकल्यांना ही मोह आवरता आला नाही.
मैत्री ही निखळ,निस्वार्थी असते आणि सुख-दु:खाच्या प्रसंगी पाठराखण करतांना दिसते.मैत्री वय,रुप,रंग,लिंग,संपत्ती या सर्व विषयांना बगल देत फुलते.खरतर सहवासाचा वेलीला हमखास लागलेले फळ म्हणजे मैत्री. या मैत्रीचा गौरव सिद्ध करणारा मैत्री दिवस म्हणजेच 'फ्रेंडशिप डे' इतका प्रचलित झाला आहे की,अगदी ग्रामीण भागात ही तो साजरा होतांना आज पहायला मिळतोय हा खरंच मैत्रीचा विजय आहे.
फोटो:दुर्गम माहूर तालुक्यातील वाई बाजार मध्ये पत्रकार साजीद खान यांना फ्रेंडशिप बॅन्ड बांधून शुभेच्छा देताना चिमुकली हृदया मिलिंद कंधारे.

हिंमत असेल तर नारायण राणेनी माहूर -किनवट तालुक्यात येऊन दाखवावे.ज्योतीबा खराटे

हिंमत असेल तर नारायण राणेनी माहूर -किनवट तालुक्यात येऊन दाखवावे.ज्योतीबा खराटे
विनोद भारती
श्रीक्षेत्र माहूर ( प्रतिनिधी  )केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बाबत  आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे  पडसाद माहूर शहरात उमटले आहेत.दि.24 ऑगस्ट रोजी दु.1 वा.जिल्हा उपप्रमुख ज्योतीबा खराटे यांचे नेतृत्वात शिवसैनिकांनी   जोरदार घोषणा देत पुतळा जाळून राणे यांच्या   त्या वक्तव्याचा जाहीर  निषेध केला. यावेळी खराटे यांनी हिंमत असेल तर राणे यांनी माहूर -किनवट तालुक्यात येऊन दाखविण्याचे आव्हान दिले.
     यावेळी तालुका प्रमुख सुदर्शन नाईक,शहर प्रमुख निरधारी जाधव,युवा सेनेचे संदीप गोरडे,शोषल मीडिया प्रमुख जितु चोले,दिपककाका कन्नलवार,पं.स.चे माजी सभापती नामदेव कातले,अभिषेक जयस्वाल, उपसभापती उमेश जाधव, अशोक उपलवाड, दिपक कांबळे,सुरेश आराध्ये,संतोष दुबे,अभिषेक दुबे,हनुमंत मुंडे,खुशाल तामखाने,प्रफुल्ल बाळसकर,सदानंद पुरी यांचेसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.पो.नि.नामदेव रिठे यांचे नेतृत्वात  स.पो.नि. अण्णासाहेब पवार,शारदासूत खामनकर,इंगळे,कन्नलवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Wednesday, 18 August 2021

पुतळ्याच्या जागेच्या मागणीला पाठींबा दर्शविण्यासाठी माहूर कडकडीत बंद.

पुतळ्याच्या जागेच्या मागणीला पाठींबा दर्शविण्यासाठी माहूर कडकडीत बंद.
विनोद भारती
श्रीक्षेञ माहूर (प्रतिनिधी )-  हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याची नियोजित जागा मोकळी करून घेण्यासाठी गोर सेनेने दि.14 ऑगस्ट पासून  न.पं.कार्यालयाच्या प्रांगणात आमरण उपोषण  सुरू केले आहे.त्यास पाठींबा दर्शविण्यासाठी    माहूर शहरातील व्यापा-यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.
        नियोजित पुतळ्या संदर्भात गोर सेनेने सुरू केलेल्या आमरण उपोषणावर तोडगा काढण्यासाठी नगर पंचायतीने दि.18 ऑगस्ट रोजी स.11वा. तातडीची ऑन लाईन बैठक घेतली. तीत स्व.वसंतराव नाईकांच्या नियोजित पुतळ्याचा ठराव एकमुखाने पारित करण्यात आला. 
      दरम्यान उपोषणाच्या  चौथ्या दिवशी पंधरा पैकी अकरा उपोषणार्थींची प्रकृती खालावली होती.त्यांचेवर ग्रामीण रूग्णालयात उपचार करून त्यांना उपोषण स्थळी पाठविण्यात आले.
  
"आजच्या ऑन लाईन बैठकीत नियोजित  पुतळयाच्या जागेचा ठराव एकमुखाने पारित झाला असून जागेच्या मालकी हक्का संदर्भात आजच महसुल व भूमि अभिलेख कार्यालयाला पत्र व्यवहार  करण्यात आला आहे. ज्या व्यक्तीच्या ताब्यात आज ती जागा आहे,त्यांना मालकी हक्क सिद्ध करण्या संदर्भात पुरावे सादर करण्यासाठी तिन दिवसाची नोटीस बजावली आहे.उपोषणा प्रती प्रशासन संवेदनशील आहे."
मुख्याधिकारी राकेश गिड्डे

Tuesday, 17 August 2021

हदगाव तालुक्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

हदगाव तालुक्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी 
 संतोष मस्के
बरडशेवाळा (प्रतिनिधी) -   हदगाव तालुक्यातील पळसा येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून  मंगळवार  रोजी जयंती साजरी करण्यात आली. 
यावेळी पळसा येथील उपस्थित शिल्पाताई रणजित कांबळे (सरपंच ) ,  राजूभाऊ मदन काला (उपसरपंच), सदस्य दिपक पाटील , कामाजी निमंङगे , शंकर कदम , गजानन मस्के,  गणेश हमरे ,शंकर मस्के , प्रमोद कांबळे, परभाकर धांडे , राव राज , ज्ञानेश्वर हराळे व पळसा येथील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Sunday, 15 August 2021

बरडशेवाळा परिसरात स्वातंत्र्य दिन साजरा

बरडशेवाळा परिसरात  स्वातंत्र्य दिन साजरा

संतोष मस्के
बरडशेवाळा (प्रतिनिधी ) -हदगाव तालुक्यातील मौजे बरडशेवाळा ,पळसा, बामणी , मनाठा या परिसरात ठीक- ठिकाणी स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला . हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथील मनाठा अंतर्गत येणारी पोलीस चौकीचे बीड जमादार एम .एन. पवार , कॉन्स्टेबल आनंद वाघमारे,  पोलीस पाटील दत्तात्रय मस्के यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
 प्राथमिक आरोग्य केंद्र बरडशेवाळा येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मानस पुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी उपस्थित सर्व कर्मचारी वर्ग अंगणवाडी सेविका , आशा वर्कर्स बरडशेवाळा येथील (सरपंच) सौ सोनाली ताई ज्ञानेश्वर मस्के , (उपसरपंच) मालाबाई भाऊराव सूर्यवंशी,  ग्रामपंचायत सदस्य रुस्तुम कुमकर , सदस्य गौतम आवटे,  सामाजिक कार्यकर्ते आनंदराव मस्के,  रामेश्वर केशवराव मस्के, पोलीस पाटील दत्तात्रय मस्के बरडशेवाळा येथील  प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते . 
बरडशेवाळा येथील ग्रामपंचायत कार्यालय येथील (सरपंच)   सै सोनालीताई ज्ञानेश्वर मस्के यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले . यावेळी उपसरपंच मालनबाई भाऊराव सूर्यवंशी,  ग्रामपंचायत सदस्य रुस्तम कुमकर , सदस्य वसंतराव चौधरी,  गौतम आवटे , गजानन पाटील,  ग्रामपंचायत सेवक अनिल जमदाडे , गंगाधर जमदाडे , पोलीस पाटील,  गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. 
 गावातील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा बरडशेवाळा येथील शाखा व्यवस्थापक पी .टी .पावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी  कर्मचारी बी. व्ही चव्हाण, एस .जी .बाभळे , सेवक मुक्तार  भैय्या व गावातील सरपंच ,उपसरपंच, पोलीस पाटील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. 
 सेवा सहकारी सोसायटी येथील ध्वजारोहण बरडशेवाळा चे चेअरमन यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी गोविंदराव इजळकर, पोस्टमॅन बालाजी चौधरी, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरडशेवाळा येथील ध्वजारोहन मुख्याध्यापक सूर्यवंशी सर यांच्या हस्ते करण्यात आले..  यावेळी उपस्थित शाळेचे अध्यक्ष संतोष तानाजी मस्के (सरपंच),  उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य,  सेवक शिक्षक चङङू सर , शेख  मॅडम, सोनटक्के मॅडम , नामेवार मॅडम , पोलीस पाटील उपस्थित होते . यावेळी शाळेच्या वतीने (सरपंच) सौ सोनाली मस्के यांचा सत्कार करण्यात आला.

Thursday, 12 August 2021

माहूरच्या तालुका दंडाधिकाऱ्याचा मन माणीकारभार; तलाठी व मंडळ अधिकारी यांचा तहसीलदार विरोधात एल्गार

माहूरच्या तालुका दंडाधिकाऱ्याचा मन माणीकारभार;  तलाठी व मंडळ अधिकारी यांचा तहसीलदार विरोधात एल्गार
विनोद भारती
माहुर (प्रतिनिधी ) - माहुर येथील तहसिलदार एम. एस. वरणगावकर यांच्या मनमानी कारभाराला माहूर येथील महसूल प्रशासन व्यवस्था त्रासली असल्याने तलाठी व ग्रामसेवकांनी त्यांच्या विरोधात बंड पुकारल्याचे दिसून आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की,  एम. एस. वरणगावक  हे मागील सहा वर्षापासून माहुर तालुक्यात नोकरी करत आहेत. माहुर तालुक्यात त्यांची नियुक्ती नायब तहसीलदार म्हणुन झाली होती परंतु 2016 साली त्यांच्याकडे प्रभारी तहसिलदार म्हणुन पदभार देण्यात आला प्रभारी तहसिलदार असताना त्यांची नियमित पदस्थापना झालेल्या एकूण चार तहसिलदार यांना परत पाठविले तसेच नियमित म्हणुन बढती झाल्यानंतर पुन्हा ते माहुर येथेच तहसिलदार म्हणुन रुजू झाले. मागील एक महिन्यापासून काही राजकीय लोकांनी त्यांच्या तक्रारी वरिष्ठांकडे केल्या त्यामुळे तहसिलदार एम एस वरणगावकर  यांनी गैर समजातूनत्याच्या बाबतचा राग मनामध्ये धरून  तलाठी व मंडळ अधिकारी यांना मानसिक त्रास देणे सुरू केले.  वरिष्ठांना चुकीची माहिती देवून समस्त तलाठी व ग्रामसेवक यांच्या बदल गैर समज निर्माण करून देण्याचे काम केले.
 तहसिलदार  यांची भाषा हि खुप अर्वाच्य झाली असून महीला तलाठी असतांनाही भाष्या खूपच घाणेरडी वापरली जाते . त्यांनी तलाठी व मंडळ अधिकारी एका पत्रा द्वारे धमकी दिली  तलाठी बोधे यांचे काहीही म्हणने ऐकून न घेता त्यांच्यावर गुन्हे नोंद करा असा आदेश काढला . तसेच सर्व तलाठी यांची विभागीय चौकशी करण्याचा कारस्थान रचले आहे. त्यामुळे त्यामुळे संपुर्ण तलाठी व मंडळ अधिकारी दडपणा खाली असल्यामुळे कुठलाही अनुसूचित प्रकार घडू शकतो आमच्या जिवितवास धोका निर्माण झाला आहे. या अगोदर माहुर तहसिल कार्यालयात कार्यरत दोन नायब तहसीलदार यांनी हि तहसिलदार एम. एस. वरनगावकर  यांची तक्रार केली होती.  माहुर तालुक्यातील राजकीय पक्ष काँग्रेस रा, काँ , शिव सेना मनसे प्रहार संघटना तसेच अनेक व्ययक्तिगत तक्रारी करण्यात आल्या आहेत. संपुर्ण तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या जिवितवास कसल्याही प्रकारचा धोका निर्माण झाल्यास याची संपुर्ण जबादारी तहसिलदार वरण गावकर  यांची राहील असे निवेदन तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तीकिरणं पूजार यांना देण्यात आले आहे . एकूण 22 कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन देण्यात आले आहे . सद्यव वाद ग्रस्थ असलेल्या तहसिलदार वरनगावकर यांचेवर जील्हा अधिकारी यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. कारवाई न झाल्यास समस्त तलाठी व मंडळ अधिकारी यांचा बेमुदत संप असा निर्णय घेतला जाईल.

Tuesday, 10 August 2021

हदगाव नागरीकांचे ऋण कधीही विसरणार नाही - दुय्यम निबंधक सुभाष निलावाड

हदगाव नागरीकांचे ऋण कधीही विसरणार नाही -  दुय्यम निबंधक सुभाष  निलावाड

संतोष मस्के
बरडशेवाळा (प्रतिनिधी) - दुय्यम निबंधक  सुभाष बालाजिराव नीलावाड यांची नुकतीच चंद्रपुर येथे बदली झाली असून त्यांच्या  जागी बडगुजर यांची नियुक्ती झाली आहे. बरडशेवाळ येथील नागरीक दत्तराव नाईक, गंगाधर  मस्के, यशवंत कुमकर, अच्युतराव मस्के, राधाबाई  मस्के, निर्मलाबाई कुमकर, शिवकांताबाई पांचाळ यांच्यावतीने सुभाष  निलावाड यांचा निरोप तर बडगुजरवार  यांचे आगमन झाल्या  बदल सत्कार केला.

या  बाबत सविस्तर  माहिती अशी  की, कोरोणा माहामारीमूळे बदल्या हया रखडल्या होत्या. परंतू कोरोणा माहामारीचे संकट थोडे ओसले असल्याने शासनाच्यावतीने बदल्याचे सत्र सुरू झाले असता. हदगाव येथील रजिस्टर कार्यायातील गत तिन वर्षापासून आपले कर्तव्य  बजावत असलेले दुय्यम निबंधक सुभाष नीलावाड  व लिपीक संभाजी सोनटक्के यांची बदली झाली  असता  यांच्या ठिकाणी बडगुजर साहेब हे दुय्यम निंबधक म्हणून रूजु झाले असून सोनटक्के यांच्या ठिकाणी अनिता  मस्के हया रुजू  झाल्या आहेत.सुभाष  निलावाड यांची चंद्रपूर येथे बदली झाल्याची  माहिती प्राप्त झाली आहे. 
बरडशेवाळा  येथील रहिवाशी दत्तराव नाईक, गंगाधर  मस्के, यशवंत कुमकर, अच्युतराव मस्के, राधाबाई  मस्के, निर्मलाबाई कुमकर, शिवकांताबाई पांचाळ यांनी सुभाष निलावड व संभाजी सोनटक्के यांना  निरोप तर बडगूजर साहेब व अनिता मस्के यांचे आंगमना  निमित्त सत्कार केला आहे. यावेळी सुभाष निलावाड यांनी आपले विचार व्यक्त करताना हदगाव नागरीकाकडून मिळालेले सहकार्य कधी विसरणार नसल्याचे  विचार  मांडले. तर संभाजी सोनटक्के यांनी निलावाड साहेब सोबत काम करताना नवनविन अनुभवासह माहितीचा साठा  देखिल प्राप्त झाल्याच्या भावना  व्यक्त केल्या. 

Sunday, 1 August 2021

वय,समाज आणि वर्ण याचे बंधन नसणारी...‘मैत्री’ग्रामीण भागातही जागतिक मैत्री दिवस साजरा.

वय,समाज आणि वर्ण याचे बंधन नसणारी...‘मैत्री’
ग्रामीण भागातही जागतिक मैत्री दिवस साजरा.
दुर्गम माहूर तालुक्यातील वाई बाजार मध्ये पत्रकार साजीद खान यांना फ्रेंडशिप बॅन्ड बांधून शुभेच्छा देताना चिमुकली हृदया मिलिंद कंधारे.
---------------------------------------------------------------
नितिन कन्नलवार
वाई बाजार (प्रतिनिधी) - संपूर्ण जगात दिनांक एक ऑगस्ट हा जागतिक मैत्री दिवस म्हणून साजरा केला जातो.या दिवशी मित्र-मैत्रिणी एकमेकांच्या मनगटावर फ्रेंडशिप बॅन्ड बांधून आपल्या घट्ट मैत्रीचे प्रतिक म्हणून साजरे करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून माहितीचे आदान-प्रदान इतका मोठ्या प्रमाणात होत आहे की ते हौशी तरुणांपासून शाळकरी चिमुकला पर्यंत वैश्विक स्तरावरील अनेक ‘डे’ साजरे केले जातात. याच पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अनुकरण ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात केले जात असल्याचे उदाहरण आज झालेल्या मैत्री दिवसाच्या निमित्ताने चिमुकल्यांना ही मोह आवरता आला नाही.
मैत्री ही निखळ,निस्वार्थी असते आणि सुख-दु:खाच्या प्रसंगी पाठराखण करतांना दिसते.मैत्री वय,रुप,रंग,लिंग,संपत्ती या सर्व विषयांना बगल देत फुलते.खरतर सहवासाचा वेलीला हमखास लागलेले फळ म्हणजे मैत्री. या मैत्रीचा गौरव सिद्ध करणारा मैत्री दिवस म्हणजेच 'फ्रेंडशिप डे' इतका प्रचलित झाला आहे की,अगदी ग्रामीण भागात ही तो साजरा होतांना आज पहायला मिळतोय हा खरंच मैत्रीचा विजय आहे.


हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा, पळसा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा, पळसा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी 
 संतोष मस्के
बरडशेवाळा (प्रतिनिधी) - हदगाव तालुक्यातील
बरडशेवाळा, पळसा, बामणी , मनाठा, पिंपरखेड या परिसरात ठीक ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ व्ही जयंती साजरी करण्यात आली. 
बरडशेवाळा येथील दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी छोट्या खानी कार्यक्रमाचे आयोजन करून अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली . यावेळी बरडशेवाळा येथील उपसरपंच भाऊराव सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य पंडित जमधाडे, विजय जमधाडे, दगडू सोनटक्के, अनिल जमधाडे, बालाजी ससाने, नारायण भालेराव व इतर मान्यवर उपस्थित होते. 
तर  ग्रामपंचायत कार्यालय पळसा येथे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पळसा येथील सरपंच सो. शिल्पा कांबळे , उपसरपंच संजय काला, ग्रामपंचायत सदस्य गजानन मस्के , ज्ञानेश्वर हराळे, शंकर कदम व इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Saturday, 24 July 2021

माहूर शहरात तिन ठिकाणी घरफोडी.एकाच घरातून 6 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला

माहूर शहरात तिन ठिकाणी घरफोडी.एकाच घरातून 6 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला
विनोद भारती
 माहूर (प्रतिनिधी ) माहूर शहरात दि.23 जुलैच्या मध्यरात्री नंतर अज्ञात चोरांनी ब्राम्हण गल्लीतल्या संतोष राजाभाऊ जोशी यांच्या घरातील लॉकर तोडून 6 रोख 21 हजार रुपयाची रोख रक्कम व 98 हजार रुपये किंमतीच्या सोन्या चांदीच्या मौल्यवान दागिन्यावर ताव मारला. यासंदर्भात जोशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून माहूर पोलीसांनी कलम 457,380 नुसार अज्ञात चोरा विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 
माहूर शहरात शुक्रवारला मध्यरात्री नंतर रात्री 12 ते सकाळी 4 वाजताचे दरम्यान चोरट्यांनी संतोष जोशी यांच्या घरातील ईतर दारांची प्रथम कडी   लावली.त्यानंतर  तळमजल्यातील  खोलीतले लॉकर तोडून जबर चोरी केली.त्याच रात्री साई रेणुका नगरीत विजय रामदास घाटे यांच्या घरातील 3 भाडेकरूंच्याही खोलीचे दार तोडून काही मुद्देमाल लंपास केला.त्या तिन्ही खोलीत दोन शिक्षक व वाई बाजार येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत कार्यरत असलेले कर्मचारी सुट्टी निमित्त गावाकडे गेल्याने पोलीसात तक्रार दाखल झाली नाही.
फिंगर प्रिंट यूनिट हेडचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक कठाळे व  डॉग स्कॉडचे पथक शहरात दाखल झाले असून जून नावाच्या कुत्रीला घेवून त्यांनी  तपास केला.घटनेची  माहिती मिळताच  सकाळीच उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव यांचे नेतृत्वात स.पो.नि.नामदेव मद्दे,अण्णासाहेब पवार,बिट जामदार विजय आड़े,ठाणे अंमलदार बाबु जाधव,पो.कॉ.चंद्रप्रकाश नागरगोजे,योगिनाथ पाटील,प्रकाश देशमुख,साहेबराव सगरोळीकर यांनी  प्रत्यक्ष स्थळी धाव घेवून पंचनामा केला. पुढील तपास स्वतः मद्दे हेच करीत आहेत.
 संतोष जोशी यांचेकडे 7 लाख 19 हजार रुपयाच्या चोरी प्रकरणी तक्रार प्राप्त झाली असून शहरात  रात्रीला गस्ती सुरू आहे.तसेच घाटे यांच्या घरातील भाडेकरू बाहेर गावी असल्याने अद्याप पर्यंत तक्रार दाखल झाली नाही.शहरातील सर्वच सी.सी.टीव्ही तपासल्या जाणार असल्याचे  नामदेव मद्दे यांनी सांगितले.
एकाच महीन्यात माहूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या दत्त मांजरी येथे झालेला खून व रात्री झालेल्या जबरी चोरीने पोलिसा समोर नवे आव्हान उभे केले आहे.

Thursday, 22 July 2021

शिराढोण येथील अवैध दारू विक्री बंद करा - महिलांची मागणी

शिराढोण येथील अवैध दारू विक्री बंद करा - महिलांची मागणी
शिराढोण महिलांचा ग्रामपंचायतवर मोर्चा

शिराढोण (प्रतिनिधी) - गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री वाढल्याने गावातील अनेक कुटुंबात वाद होतात तर सध्या शाळा बंद असल्याने लहान मुलं घरीच असतात आणि दारुड्यांचे संस्कार लहान मुलांवर पडतात, यामुळे गावातील अनेक लहान शाळकरी मुले सुद्धा दारूच्या व्यसनाधीन झालीत.एकीकडे मागील ५ महिन्यापासून कोरोना लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनता घरात बसून आहे. शासनाकडून ५ किलो मोफत तांदूळ देऊन स्वतःची सुटका करून घेण्यात मात्र हाताला काम नसलेल्या गोरगरिबांच्या घरात असलेले पैसेही शिराढोण येथील अवैध दारू विक्रीमुळे मद्यपी गमावत असून गृहिणी महिला संसार कसा चालवावा या विवंचनेत सापडल्या आहेत.शिराढोण येथे अवैध दारूचा महापूर सुरु असून अबालवृद्ध दारूच्या आहारी गेला आहे कुटुंबाचा उदर्निर्वाहा साठी असणारे पैसे दारूत गमावत असल्याने त्यांचे मुलं बाळांची उपासमार होत आहे.शिराढोण येथील महिला मंडळी च्या वतीने उस्माननगर पोलीस स्टेशनला व ग्रामपंचायत ला निवेदन देण्यात आले असून समस्त महिलांनी बुद्धविहार ते ग्रामपंचायत  मोर्चा काढला. गावातील महिला अवैध दारूमुळे त्रस्त झाल्या असून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे हा गंभीर प्रश्न या कोरोना लॉकडाऊन काळात परिसरातील ग्रामीण भागातील महिलांना पडला आहे.

Tuesday, 20 July 2021

राजगड येथे विमानतळ सुरू करून हवाई सुंदरी प्रशिक्षण केंद्र स्थापन करावे - खासदार हेमंत पाटील

राजगड येथे विमानतळ सुरू करून  हवाई सुंदरी प्रशिक्षण केंद्र स्थापन करावे - खासदार हेमंत पाटील
माहूर (प्रतिनिधी) : किनवट तालुक्यातील राजगड येथे १९८० च्या दशकात  प्रस्तावित करण्यात आलेली विमान धावपट्टी पुन्हा कार्यान्वित करून त्याचे विमानताळात रूपांतर करण्यात यावे सोबतच  हवाई सुंदरी आणि वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करावे अशी मागणी हिंगोली लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (सिंधीया )यांच्याकडे केली आहे.
         प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात किनवट तालुक्यातील जवराला आणि बुधवार पेठ या गावातील आदिवासी बांधवांनी आदिवासी समाजाचे प्रसिद्ध  ढेमसा हे आदिवासी नृत्य सादर केले होते.त्यामुळेच  श्रीमती इंदिरा गांधी यांनी या दोन्ही गावांना भेटी देऊन त्याठिकाणीची संस्कृती त्यांची जीवनशैली जाणून घेण्याचा आणि  सहभागी कलाकारांना भेटण्याचा  मनोदय  व्यक्त केला होता, इंदिरा गांधी येणार असल्याने त्यांचे विमान किंवा हेलिकॉप्टर त्याभागात  उतरावे आणि त्यांना या   दोन्ही गावांना जाता यावे म्हणून जवळचा पर्याय  राजगड असल्याने त्याठिकाणी वन विभागाच्या जमिनीवर  सन १९८० च्या दशकात   रोजगार हमीच्या कामावरील  मजूरांच्या साहाय्याने धावपट्टी तयार करण्यात आली होती.पुढे काही कारणास्तव इंदिरा गांधी यांचा नियोजित दौरा रद्द झाला. नंतरच्या काळात अनेक राजकीय घडामोडीनंतर   या धावपट्टीची शासन दरबारी केवळ कागदोपत्री नोंद करण्यात आली.पुढे यावर कोणीही प्रश्न उपस्थित केला नाही आणि हे ठिकाण आहे त्या स्थितीमध्ये उपेक्षित राहीले . खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या खासदार पदाची धुरा हाती घेतल्यानंतर राजगड येथे भेट दिली होती.तेव्हापासून या धावपट्टीला पुन्हा कार्यान्वित करून त्याचे विमानतळामध्ये रुपांतर करावे,याठिकाणाहून  विमान वाहतूक सुरू करण्याचा मनोदय त्यांच्या मनी होता त्या अनुषंगाने त्यांनी आज ( दि.२०) रोजी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (सिंधीया)यांची भेट घेतली यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी मंत्री महोदयांना या भागाची आणि संबंधित धावपट्टीची पार्श्वभूमी सांगितली आणि याठिकाणी पुन्हा ही धावपट्टी सुरू करून त्याचे विमानतळामध्ये रूपांतर करावे तसेच  वैमानिक आणि हवाई सुंदरी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात यावे जेणेकरून याभागातील आदिवासी बहुल समाजातील तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होईल असेही ते म्हणाले. याठिकाणचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मराठवाड्यात औरंगाबाद नंतर कुठेच विमानतळ नव्हते आणि  नांदेड जिल्ह्यातील  ही पहिलीच धावपट्टी होती. नांदेड चे विमानतळ यानंतर तयार करण्यात आले हे विशेष.हे विमानतळ  कार्यन्वित करण्यात आल्यास विदर्भातील गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, आणि संबंध हिंगोली लोकसभा मतदारसंघ सोबतच आंध्रप्रदेश मधील आदीलाबाद, निझामाबाद,निर्मल या ठिकाणच्या जनतेला सोयीचे होऊन विमानसेवेचा मार्ग सुकर होईल तसेच गडचिरोली आणि किनवट मधील नक्षलग्रस्त भागात केंद्रीय राज्य राखीव जवानांच्या (सीआरपीएफ ) तुकड्या  उतरविण्यासाठी या विमानतळाचा उपयोग होऊ शकतो असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले. सोबतच नांदेड -मुंबई आणि नांदेड-दिल्ली-पुणे ही विमानसेवा नियमित सुरू करावी जेणेकरून याठिकाणी ये - जा करणाऱ्या नागरिकांना सोयीचे होईल.सर्वात महत्वाचे म्हणजे यामुळे किनवट आणि आजूबाजूच्या परिसरात व  संबंध हिंगोली लोकसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील व पर्यायाने मतदारसंघाचा विकास होईल.

Wednesday, 14 July 2021

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर रेणुका देवी मंदिराचे बांधकाम सक्षम न झाले नसल्याचे उघड!

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर रेणुका देवी मंदिराचे बांधकाम सक्षम न झाले नसल्याचे उघड! 

फायर  ऑडिट च्या नावाने पण बोंबा बोंब; विश्वस्त बरखास्तेची मागणी!
विनोद भारती
माहूर (प्रतिनिधी ) - साडे तीन शक्तीपीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूरच्या श्री रेणुका देवी या प्राचीन मंदिराच्या बांधकाम अंकेशनाचा प्रश्न नुकत्याच नांदेड व यवतमाळ जिल्ह्यात आलेल्या ४.४ स्केलच्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर ऐरणीवर आला आहे. रेणुका देवी संस्थान चे प्रभारी व्यवस्थापक योगेश साबळे यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता व्यवस्थापकांनी स्ट्रक्चर ऑडिट बाबतीत मला काहीच माहीत नाही असे सांगत काखा वर केल्याने मंदिर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. असाच काहीसा प्रकार फायर ऑडीट बाबातसुद्धा घडला असून  अशासकीय विश्वस्त स्ट्रक्चर व फायर ऑडिट बाबत गंभीर नसल्याने त्यांचे धर्मादाय खात्याकडून सूमोटो निलंबन गरजेचे आहे.   
        जगत जननी आई रेणुका माते चे माहूर येथील पुरातन मंदिर जगप्रसिद्ध असून हे ठिकाणी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.सदरील मंदिर हे १२ व्या शतकातील  प्राचीन वास्तुशिल्प असून पुरातत्व  विभागाच्या अख्यारित आहे.या पूर्वी सदरील मंदिर वण विभागाच्या जागेवर होते,परंतू काही अति हुशार कोल्ह्यानी त्याचा ताबा भावणीक्तेच्या भुरख्या आड मिळवून मूळ मालक असलेल्या वण विभागाला विश्वस्त पदापासून डावलत बोगस मुंताखफ च्या आधारे सात विश्वस्त धर्मदाय खात्याची कागदो पत्री दिशाभूल करून विश्वस्त झाले असून तेच विश्वस्त चार शासकीय विश्वस्ता ना पण अंधारात ठेऊन स्ट्रक्चर व फायर ऑडीट  कडे दुर्लक्ष करीत आहे.
सदरील प्राचीन रेणुका मंदिर पुरातत्व खात्याच्या निगराणी खाली असून स्थानिक विस्वस्थानी मातृतीर्थ तलावाचा जसा अनधिकृत ताबा घेतला,तसाच प्रकार रेणुका मंदिर परिसरा बाबतीत चालू ठेवला आहे.त्या मुळेच मूळ मूर्तीचे विद्रुपीकरण,प्राचीन नंदादिपाची नासंधुस,या शिवाय पोकळ पायऱ्या, त्तटरक्षक भिंतीला पडलेल्या भेगा,कालच्या भूकंप पार्श्वभूमीवर मंदिर रक्षणासाठी सक्षम नाहीत.त्या मुळे नूतन अध्यक्षपदी रुजू झालेल्या प्रथम जिल्हा सत्र न्यायाधीशानी या अशासकीय विश्वस्त मंडळींचे काळे कारनामे बाबत आलेल्या तक्रारी प्रभारी व्यवस्थापक साबळे यांच्या कडून मागवून घेऊन प्रथम मंदिर संरक्षणचा प्रश्न सोडवावा व नंतर मंदिर प्रशासनाच्या बैठकीत ढिसाळ व्यवस्थापन व मंदिर बंद मात्र धांदाडंग्याना दर्शन सुरू या बाबत सी सी टी वी तपासावे,तसेच मंदिर नष्ट होण्याच्या बेतात असताना कोरोना काळात अनधिकृत बडवे मंडळी कडून मागविण्यात येत असलेल्या मनी ऑर्डर व उद्या यांचे बँक खाते तपासून फोन पे व गूगल पे च्या माध्यमातून आलेल्या लाखोच्या देणग्या त्यांतून मंदिर प्रशासनाचे झालेले आर्थिक नुकसान तपासावे अशी मागणी ना बच्चू कडू प्रणित प्रहार जनशक्ती चे विधान सभा प्रमुख शिवचरण राठोड व तानुबाई बिर्जे पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार अडकिने यांनी केली आहे.