माहूर नगर पंचायत कार्यालयात जेष्ठ नागरिक कक्षाची केली स्थापना
माहूर ( प्रतिनिधी)शासनाच्या वतीने जेष्ठ नागरिकांसाठी थोडेसे मायबापासाठी पण हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्याअनुषंगाने विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या आदेशानुसार नुसार मुख्याधिकारी राकेश गिड् यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 1 आक्टोंबर 2021 रोजी जेष्ठ नागरिक दिनानिमित्त नगर पंचायत कार्यालयात थोडेसे मायबापासाठी या उपक्रमांतर्गत कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी यांच्या हस्ते जेष्ठ नागरिक कक्षाची स्थापना करण्यात आली यावेळी न. पं. च्या। वतीने जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला, या उपक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन शहरातील जेष्ठ नागरीकाची माहीती संकलीत केली जाणार असून नगर पंचायत कार्यालयामार्फत शासनाला अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी यांनी दिली यावेळी संदीप थोरात, सहा प्रकल्प अधिकारी देविदास जोंधळे, सुरेंद्र पांडे, विजय शिंदे यांचेसह अनेकांची उपस्थिती होती
No comments:
Post a Comment