भूकंपाच्या पार्श्वभूमीवर रेणुका देवी मंदिराचे बांधकाम सक्षम न झाले नसल्याचे उघड!
फायर ऑडिट च्या नावाने पण बोंबा बोंब; विश्वस्त बरखास्तेची मागणी!
विनोद भारती
माहूर (प्रतिनिधी ) - साडे तीन शक्तीपीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूरच्या श्री रेणुका देवी या प्राचीन मंदिराच्या बांधकाम अंकेशनाचा प्रश्न नुकत्याच नांदेड व यवतमाळ जिल्ह्यात आलेल्या ४.४ स्केलच्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर ऐरणीवर आला आहे. रेणुका देवी संस्थान चे प्रभारी व्यवस्थापक योगेश साबळे यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता व्यवस्थापकांनी स्ट्रक्चर ऑडिट बाबतीत मला काहीच माहीत नाही असे सांगत काखा वर केल्याने मंदिर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. असाच काहीसा प्रकार फायर ऑडीट बाबातसुद्धा घडला असून अशासकीय विश्वस्त स्ट्रक्चर व फायर ऑडिट बाबत गंभीर नसल्याने त्यांचे धर्मादाय खात्याकडून सूमोटो निलंबन गरजेचे आहे.
जगत जननी आई रेणुका माते चे माहूर येथील पुरातन मंदिर जगप्रसिद्ध असून हे ठिकाणी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.सदरील मंदिर हे १२ व्या शतकातील प्राचीन वास्तुशिल्प असून पुरातत्व विभागाच्या अख्यारित आहे.या पूर्वी सदरील मंदिर वण विभागाच्या जागेवर होते,परंतू काही अति हुशार कोल्ह्यानी त्याचा ताबा भावणीक्तेच्या भुरख्या आड मिळवून मूळ मालक असलेल्या वण विभागाला विश्वस्त पदापासून डावलत बोगस मुंताखफ च्या आधारे सात विश्वस्त धर्मदाय खात्याची कागदो पत्री दिशाभूल करून विश्वस्त झाले असून तेच विश्वस्त चार शासकीय विश्वस्ता ना पण अंधारात ठेऊन स्ट्रक्चर व फायर ऑडीट कडे दुर्लक्ष करीत आहे.
सदरील प्राचीन रेणुका मंदिर पुरातत्व खात्याच्या निगराणी खाली असून स्थानिक विस्वस्थानी मातृतीर्थ तलावाचा जसा अनधिकृत ताबा घेतला,तसाच प्रकार रेणुका मंदिर परिसरा बाबतीत चालू ठेवला आहे.त्या मुळेच मूळ मूर्तीचे विद्रुपीकरण,प्राचीन नंदादिपाची नासंधुस,या शिवाय पोकळ पायऱ्या, त्तटरक्षक भिंतीला पडलेल्या भेगा,कालच्या भूकंप पार्श्वभूमीवर मंदिर रक्षणासाठी सक्षम नाहीत.त्या मुळे नूतन अध्यक्षपदी रुजू झालेल्या प्रथम जिल्हा सत्र न्यायाधीशानी या अशासकीय विश्वस्त मंडळींचे काळे कारनामे बाबत आलेल्या तक्रारी प्रभारी व्यवस्थापक साबळे यांच्या कडून मागवून घेऊन प्रथम मंदिर संरक्षणचा प्रश्न सोडवावा व नंतर मंदिर प्रशासनाच्या बैठकीत ढिसाळ व्यवस्थापन व मंदिर बंद मात्र धांदाडंग्याना दर्शन सुरू या बाबत सी सी टी वी तपासावे,तसेच मंदिर नष्ट होण्याच्या बेतात असताना कोरोना काळात अनधिकृत बडवे मंडळी कडून मागविण्यात येत असलेल्या मनी ऑर्डर व उद्या यांचे बँक खाते तपासून फोन पे व गूगल पे च्या माध्यमातून आलेल्या लाखोच्या देणग्या त्यांतून मंदिर प्रशासनाचे झालेले आर्थिक नुकसान तपासावे अशी मागणी ना बच्चू कडू प्रणित प्रहार जनशक्ती चे विधान सभा प्रमुख शिवचरण राठोड व तानुबाई बिर्जे पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार अडकिने यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment