माहूरच्या तालुका दंडाधिकाऱ्याचा मन माणीकारभार; तलाठी व मंडळ अधिकारी यांचा तहसीलदार विरोधात एल्गार
विनोद भारती
माहुर (प्रतिनिधी ) - माहुर येथील तहसिलदार एम. एस. वरणगावकर यांच्या मनमानी कारभाराला माहूर येथील महसूल प्रशासन व्यवस्था त्रासली असल्याने तलाठी व ग्रामसेवकांनी त्यांच्या विरोधात बंड पुकारल्याचे दिसून आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, एम. एस. वरणगावक हे मागील सहा वर्षापासून माहुर तालुक्यात नोकरी करत आहेत. माहुर तालुक्यात त्यांची नियुक्ती नायब तहसीलदार म्हणुन झाली होती परंतु 2016 साली त्यांच्याकडे प्रभारी तहसिलदार म्हणुन पदभार देण्यात आला प्रभारी तहसिलदार असताना त्यांची नियमित पदस्थापना झालेल्या एकूण चार तहसिलदार यांना परत पाठविले तसेच नियमित म्हणुन बढती झाल्यानंतर पुन्हा ते माहुर येथेच तहसिलदार म्हणुन रुजू झाले. मागील एक महिन्यापासून काही राजकीय लोकांनी त्यांच्या तक्रारी वरिष्ठांकडे केल्या त्यामुळे तहसिलदार एम एस वरणगावकर यांनी गैर समजातूनत्याच्या बाबतचा राग मनामध्ये धरून तलाठी व मंडळ अधिकारी यांना मानसिक त्रास देणे सुरू केले. वरिष्ठांना चुकीची माहिती देवून समस्त तलाठी व ग्रामसेवक यांच्या बदल गैर समज निर्माण करून देण्याचे काम केले.
तहसिलदार यांची भाषा हि खुप अर्वाच्य झाली असून महीला तलाठी असतांनाही भाष्या खूपच घाणेरडी वापरली जाते . त्यांनी तलाठी व मंडळ अधिकारी एका पत्रा द्वारे धमकी दिली तलाठी बोधे यांचे काहीही म्हणने ऐकून न घेता त्यांच्यावर गुन्हे नोंद करा असा आदेश काढला . तसेच सर्व तलाठी यांची विभागीय चौकशी करण्याचा कारस्थान रचले आहे. त्यामुळे त्यामुळे संपुर्ण तलाठी व मंडळ अधिकारी दडपणा खाली असल्यामुळे कुठलाही अनुसूचित प्रकार घडू शकतो आमच्या जिवितवास धोका निर्माण झाला आहे. या अगोदर माहुर तहसिल कार्यालयात कार्यरत दोन नायब तहसीलदार यांनी हि तहसिलदार एम. एस. वरनगावकर यांची तक्रार केली होती. माहुर तालुक्यातील राजकीय पक्ष काँग्रेस रा, काँ , शिव सेना मनसे प्रहार संघटना तसेच अनेक व्ययक्तिगत तक्रारी करण्यात आल्या आहेत. संपुर्ण तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या जिवितवास कसल्याही प्रकारचा धोका निर्माण झाल्यास याची संपुर्ण जबादारी तहसिलदार वरण गावकर यांची राहील असे निवेदन तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तीकिरणं पूजार यांना देण्यात आले आहे . एकूण 22 कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन देण्यात आले आहे . सद्यव वाद ग्रस्थ असलेल्या तहसिलदार वरनगावकर यांचेवर जील्हा अधिकारी यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. कारवाई न झाल्यास समस्त तलाठी व मंडळ अधिकारी यांचा बेमुदत संप असा निर्णय घेतला जाईल.
No comments:
Post a Comment