वय,समाज आणि वर्ण याचे बंधन नसणारी...‘मैत्री’
ग्रामीण भागातही जागतिक मैत्री दिवस साजरा
नितिन कन्नलवार
वाई बाजार (प्रतिनिधी) - संपूर्ण जगात दिनांक एक ऑगस्ट हा जागतिक मैत्री दिवस म्हणून साजरा केला जातो.या दिवशी मित्र-मैत्रिणी एकमेकांच्या मनगटावर फ्रेंडशिप बॅन्ड बांधून आपल्या घट्ट मैत्रीचे प्रतिक म्हणून साजरे करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून माहितीचे आदान-प्रदान इतका मोठ्या प्रमाणात होत आहे की ते हौशी तरुणांपासून शाळकरी चिमुकला पर्यंत वैश्विक स्तरावरील अनेक ‘डे’ साजरे केले जातात. याच पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात केले जात असल्याचे उदाहरण आज झालेल्या मैत्री दिवसाच्या निमित्ताने चिमुकल्यांना ही मोह आवरता आला नाही.
मैत्री ही निखळ,निस्वार्थी असते आणि सुख-दु:खाच्या प्रसंगी पाठराखण करतांना दिसते.मैत्री वय,रुप,रंग,लिंग,संपत्ती या सर्व विषयांना बगल देत फुलते.खरतर सहवासाचा वेलीला हमखास लागलेले फळ म्हणजे मैत्री. या मैत्रीचा गौरव सिद्ध करणारा मैत्री दिवस म्हणजेच 'फ्रेंडशिप डे' इतका प्रचलित झाला आहे की,अगदी ग्रामीण भागात ही तो साजरा होतांना आज पहायला मिळतोय हा खरंच मैत्रीचा विजय आहे.
फोटो:दुर्गम माहूर तालुक्यातील वाई बाजार मध्ये पत्रकार साजीद खान यांना फ्रेंडशिप बॅन्ड बांधून शुभेच्छा देताना चिमुकली हृदया मिलिंद कंधारे.
No comments:
Post a Comment