परीस्थिती लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे - उपविभागीय अधिकारी डापकर यांचे आवाहन
बरडशेवाळा (प्रतिनिधी ) हदगाव तालुक्यासह बरडशेवाळा बामणी फाटा पळसा मनाठा करमोडी उंचाडा पिंपरखेड परीसरात दोन दिवसांपासून सुरू असलेला पावसाने कहर केला आहे. हदगाव तालुक्यातुन जात असलेल्या कयाधू पेनगंगा नदी पात्रात हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्याने हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील जवळच्या अंतरासाठी सोयीच्या दृष्टीने अनेक गावांच्या दळणवळणाच्या सुविधेसाठी असलेल्या करमोडी ते उंचाडा कमी उंचीच्या पुलावरून व पिंपरखेड ते मार्लेगाव या मार्गाने दोन्ही नदीला पूर आला असल्याने सोमवार रात्री पासून संपर्क तुटला असुन नदी नाले ओढे भरून वाहत असल्याने काठावर असलेले पिके पाण्याखाली असल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.हवामान खात्याने आणखी चार दिवस पाऊस असल्याचे सांगितले असल्याने हदगाव हिमायतनगर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांनी पिंपरखेड येथे नदी काठावर जाऊन पाहणी करीत परीस्थितीची माहिती प्रशासनाला कळवुन आपल्या यंत्रनेला सतर्कचे आदेश दिले.तर पिंपरखेड ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असे आवाहन केले.
यावेळी हदगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हनुमंतराव गायकवाड, पिंपरखेड येथील सरपंच पिंटु पाटील, उपसरपंच पाईकराव, माजी उपसरपंच ओमप्रकाश येवले, पोलिस पाटील, तलाठी कुलकर्णी, वटाणे, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment