हिंमत असेल तर नारायण राणेनी माहूर -किनवट तालुक्यात येऊन दाखवावे.ज्योतीबा खराटे
विनोद भारती
श्रीक्षेत्र माहूर ( प्रतिनिधी )केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे पडसाद माहूर शहरात उमटले आहेत.दि.24 ऑगस्ट रोजी दु.1 वा.जिल्हा उपप्रमुख ज्योतीबा खराटे यांचे नेतृत्वात शिवसैनिकांनी जोरदार घोषणा देत पुतळा जाळून राणे यांच्या त्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. यावेळी खराटे यांनी हिंमत असेल तर राणे यांनी माहूर -किनवट तालुक्यात येऊन दाखविण्याचे आव्हान दिले.
यावेळी तालुका प्रमुख सुदर्शन नाईक,शहर प्रमुख निरधारी जाधव,युवा सेनेचे संदीप गोरडे,शोषल मीडिया प्रमुख जितु चोले,दिपककाका कन्नलवार,पं.स.चे माजी सभापती नामदेव कातले,अभिषेक जयस्वाल, उपसभापती उमेश जाधव, अशोक उपलवाड, दिपक कांबळे,सुरेश आराध्ये,संतोष दुबे,अभिषेक दुबे,हनुमंत मुंडे,खुशाल तामखाने,प्रफुल्ल बाळसकर,सदानंद पुरी यांचेसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.पो.नि.नामदेव रिठे यांचे नेतृत्वात स.पो.नि. अण्णासाहेब पवार,शारदासूत खामनकर,इंगळे,कन्नलवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
No comments:
Post a Comment