हदगाव येथे "स्वर दीपावली" संगीत मैफिलीचे आयोजन
हदगाव (प्रतिनिधी ) - हदगाव येथील व्यापारी बांधवांच्या वतीने रविवार दिनांक 7 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री सात वाजता स्वर दीपावली या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
हदगाव येथील राष्ट्रीय क्लब मैदानावर संपन्न होणाऱ्या स्वर दीपावली संगीत मैफिलीमधे गायक प्रा. डॉ. शिवराज शिंदे, गायिका प्रियंका मनाठकर, नांदेड तसेच गायक प्रा. डॉ. राहुल भोरे, सय्यद अमजद या कलाकारांचा समावेश असणार आहे. त्यांना तबला साथ स्वप्नील धुळे, ढोलक साथ परमानंद जाधव, कीबोर्ड अजय शेवाळे व अमित पूर्णेकर, ॲक्टोपॅड आदित्य डावरे हे नांदेड येथील कलाकार साथ-संगत करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन व्याख्याते गजानन जाधव हे करणार आहेत. या कार्यक्रमासाठी हदगाव येथील सर्व व्यापारी बांधवांच्या सहकार्याने दीपावली निमित्त या स्वर मैफिलीचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये मराठी, हिंदी चित्रपटगीत तसेच अभंग, भावगीत, भक्तीगीत, गवळण, लावणी, पोवाडा व इतर गीतप्रकारांचे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन हदगाव व्यापारी बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment