श्री महादेव मठ संस्थान येथे संजीवनी समाधी श्री गुरू बसवलिंग स्वामी यांचा 856 स्मृती महोत्सव चे आयोजन
हदगाव (प्रतिनिधी) - श्री महादेव मठ संस्थान येथे संजीवनी समाधी श्री गुरू बसवलिंग स्वामी यांचा 856 स्मृती महोत्सव चे आयोजन शिव चैतन्य महाराज यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळेस हदगाव पंचक्रोशीतील सर्व वीरशैव लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळेस गुरू बसवलिंग स्वामी संजीवनी समाधी वर अभिषेक करण्यात आला व त्यानंतर परम रहस्य पारायणाचे अध्ययन झाले व महाआरती करण्यात आली व महाप्रसाद वाटप करण्यात आला . कार्यक्रम कोरोना महामारी चे नियम पाळून साजरे करण्यात आला. या वेळेस शिव चैतन्य महाराज यांनी समाज बांधवांना उपदेश दिला व या कार्यक्रमासाठी महादेव मठ संस्थान कमेटी सदस्य ऊत्तमराव टिकोरे नारायणराव लामतुरे, मारोतराव चंदापुरे , अंबादासराव सोनोने, उमाकांतराव राऊतराव नामदेव वाकोडे, बालाजी घाळाप्पा, शिवकुमार महाजन व किसनराव मुखेडी, नारायण सोनोने, बाळु कंठाळे ,अशोकराव टिकोरे , देवानंद महाजन ,सतिष महाजन ,संतोष टिकोरे ,निखील तोडकर ,विलास पोगरे , देविदास टाले आणि हदगाव परिसरातील भाविक भक्त महिला मंडळ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment