पुतळ्याच्या जागेच्या मागणीला पाठींबा दर्शविण्यासाठी माहूर कडकडीत बंद.
विनोद भारती
श्रीक्षेञ माहूर (प्रतिनिधी )- हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याची नियोजित जागा मोकळी करून घेण्यासाठी गोर सेनेने दि.14 ऑगस्ट पासून न.पं.कार्यालयाच्या प्रांगणात आमरण उपोषण सुरू केले आहे.त्यास पाठींबा दर्शविण्यासाठी माहूर शहरातील व्यापा-यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.
नियोजित पुतळ्या संदर्भात गोर सेनेने सुरू केलेल्या आमरण उपोषणावर तोडगा काढण्यासाठी नगर पंचायतीने दि.18 ऑगस्ट रोजी स.11वा. तातडीची ऑन लाईन बैठक घेतली. तीत स्व.वसंतराव नाईकांच्या नियोजित पुतळ्याचा ठराव एकमुखाने पारित करण्यात आला.
दरम्यान उपोषणाच्या चौथ्या दिवशी पंधरा पैकी अकरा उपोषणार्थींची प्रकृती खालावली होती.त्यांचेवर ग्रामीण रूग्णालयात उपचार करून त्यांना उपोषण स्थळी पाठविण्यात आले.
"आजच्या ऑन लाईन बैठकीत नियोजित पुतळयाच्या जागेचा ठराव एकमुखाने पारित झाला असून जागेच्या मालकी हक्का संदर्भात आजच महसुल व भूमि अभिलेख कार्यालयाला पत्र व्यवहार करण्यात आला आहे. ज्या व्यक्तीच्या ताब्यात आज ती जागा आहे,त्यांना मालकी हक्क सिद्ध करण्या संदर्भात पुरावे सादर करण्यासाठी तिन दिवसाची नोटीस बजावली आहे.उपोषणा प्रती प्रशासन संवेदनशील आहे."
मुख्याधिकारी राकेश गिड्डे
No comments:
Post a Comment