कोरोना योद्धा म्हणून पत्रकारांचा होणार सन्मान
माहूर (प्रतिनिधी )पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने दि.3 सप्टें.रोजी स.11-30 वा.स्थानिक बालाजी मंगलम च्या सभागृहात आ.भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेत व पुढील प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत पत्रकार,वृत्तपत्रे विक्रेते व दृक्श्राव्य माध्यमांच्या प्रतिनिधींचा कोरोना योद्धा म्हणून सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात येणार आहे.या सन्मान सोहळ्याला सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पूजार,उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव,तहसीलदार सिद्धेश्वर
वरणगांवकर, नगराध्यक्षा शीतल जाधव, मुख्याधिकारी राकेश गिड्डे,गटविकास अधिकारी युवराज मेहेत्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्यंकटेश भोसले,पॉवर ऑफ मीडियाचे राज्य संघटक संदीप बाजड,पो.नि.नामदेव रिठे,डॉ.पद्माकर जगताप (पॉ.ऑ. मी.वैद्यकीय संघटना )व अॅड.दिनेश येऊतकर (पॉ.ऑ.वकील संघटना ) यांची उपस्थिती लाभणार आहे.
कोरोना काळात आपल्या जिवावर उदार होऊन आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडणाऱ्या पत्रकारांचा पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने राज्यभर क्रांती पर्व अंतर्गत सन्मान केला जात आहे.त्याच धर्तीवर पॉवर ऑफ मीडिया माहूरच्या वतीने पत्रकार,वृतपत्र विक्रेते व दृक्श्राव्य माध्यमांच्या प्रतिनिधींचा सन्मान चिन्ह देवून सन्मान केल्या जाणार आहे.*तालुक्यातील सर्वच पत्रकार संघटनेतील प्रतिनिधींना सन्मानपूर्वक निमंत्रित करून ज्येष्ठते नुसार सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती सचिव नंदकुमार जोशी यांनी दिली.
No comments:
Post a Comment