Wednesday, 22 January 2025

रितेश गिरी यांची हत्या करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा द्या

रितेश गिरी यांची हत्या करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा द्या 
दशनाम गोसावी समाजाची शासनाकडे मागणी
हदगाव (प्रतिनिधी) - मौज कमालपुर ता-औसा जि-लातूर येथील रितेश विरेंद्र गिरी यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करणाऱ्या आरोपीना कठोर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाव्दारे दशनाम गोसावी समाज हदगाव बांधवाच्यावतीने तहसिलदाराकडे केली आहे
निवेदनाव्दारे शासनाकडे दिलेली माहिती अशी की, ११ जानेवारी २०२५ रोजी मौजे कमालपूर ता. औसा जि. लातूर येथील रहिवासी रितेश वीरेंद्र गिरी यांची गावातील गावगुंड मेवा दगडु थोरे, राजु फरिद पटेल, मुले प्रसिद्ध थोरे, फिरोज पटेल यांनी धारदार कोयता या शस्त्रांनी डोक्यात, मानेवर, खांद्यावर, पोटावर अत्यंत विकृत व निर्दयीपणे वार करून खून केला. त्यानंतर सदरील मृतदेह कमालपुर येथील सोयाबीनच्या गुळीच्या ढिगात लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
कमालपुर येथील फरीद पटेल, मेवा थोरे हे अतिशय गुंड प्रवृत्तीचे असुन गावात त्यांची दहशत असल्यामुळे त्यांची मुले व त्यांनी कट रचून संगनमताने रितेश गिरीचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या गुन्ह्यातील पाचवा आरोपी त्रिशाला मेवा थोरे हा फरार आहे त्यास अटक करण्यात यावे. उपरोक्त आरोपींनी कटरचून गिरी परिवारातील एकुलत्या एक मुलाचा खुन केला. त्यामुळे रितेशचे कटुंबीय भयभीत आहेत. त्यांना कायदेशीर संरक्षण द्यावे सदरील पीडित परिवाराला कायद्याने संरक्षण व न्याय मिळावा तसेच  त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असुन त्यांना आर्थिक सहकार्य करावे असे निवेदनात नमुद केले असुन निवेदनावर हिंदू धर्मगुरू दशनाम गोसावी आखाडा जिल्हाध्यक्ष राजेश गिरी, पत्रकार प्रा. गजानन गिरी, नारायण गिरी, प्रशांत भारती, शिवराज बन, राहुल गिरी, धनंजय भारती, राजकमल भारती निवघेकर व इतर गोसावी बांधवांच्या स्वाक्षऱ्या व उपस्थिती होती.

Friday, 12 July 2024

अँटी करप्शन ब्युरोची दुय्यम निबंधक श्रेणी बालाजी शंकरराव उत्तरवार यांच्यावर कारवाई

अँटी करप्शन ब्युरोची दुय्यम निबंधक श्रेणी बालाजी शंकरराव उत्तरवार यांच्यावर कारवाई 
हदगाव रजिस्टर ऑफिस येथील घटना
हदगाव (प्रतिनिधी )- नांदेड येथील अँटी करप्शन ब्युरोची हादगाव येथे दुय्यम निर्धारक श्रेणी असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रार धारकांनी नांदेड येथे तक्रार करून लाच मागणी करत असल्याची माहिती संबंधित अँटीकरप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचत दिनांक 12 जुलै रोजी कारवाई केल्याची दिसून आले. याबाबत प्राप्त झालेली माहिती अशी की,यातील तक्रारदार यांनी मौ. हदगाव येथील गट क्रमांक 256/2 मध्ये 20 गुंठे शेतजमीन खरेदी केली होती. दि. 08/07/2024 रोजी तक्रारदार नमुद शेत जमीनीच्या रजिस्ट्री करिता उप निबंधक कार्यालय, हदगाव येथे जावून लोकसेवक उत्तरवार, दुय्यम निबंधक यांना भेटले असता त्यांनी रजिस्ट्री करण्यासाठी 1,99,000/- रु. नोंदणी व मुद्रांक फी सह लाचेची मागणी केली. नमुद शेतीचे रजिस्ट्री करिता लोकसेवक मागत असलेले 1,99,000/- रु. नोंदणी व मुद्रांक फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्याचे तक्रारदार यांची खात्री झाली व त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे 
दि. 12/07/2024 रोजी याबाबत तक्रार दिली. 
       नमुद तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेडकडून लाच मागणीची पडताळणी केली असता, आलोसे क्र. 1) बालाजी उत्तरवार यांनी तक्रारदार यांना नमुद शेतीच्या रजिस्ट्री करिता नोंदणी व मुद्रांक फी सह असे म्हणून पंचासमक्ष 1,99,000/- रूपयाची मागणी केली. तेव्हा तक्रारदार यांनी नमुद रक्कम कमी करण्यास विनंती केली असता लोकसेवक यांनी 4,000/- रु. कमी द्या, असे म्हणून तडजोडी अंती 1,95,000/- रु. लाचेची मागणी करून लाच रक्कम आरोपी क्र. 2) समीउल्ला अजमतउल्ला शेख याचेकडे देण्यास सांगितले. 
     त्यावरून करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी क्र. 2) समीउल्ला यांनी तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम 1,95,000/- रु. उप निबंधक कार्यालय, हदगाव चे आवारात स्विकारून नमुद रक्कम आरोपी क्र. 3) शेख अबुबकर याचेजवळ दिली. त्यानंतर तक्रारदार यांना नोंदणी व मुद्रांक फिस भरल्याची   1,13,400/- रु. ची पावती दिली आहे. नमुद प्रकरणात लोकसेवक उत्तरवार यांनी नोंदणी व मुद्रांक फीचे नावाखाली तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 81,600/- रु. लाचेची मागणी करून नमुद रक्कम आरोपी क्र. 2) समीउल्ला यांचेद्वारे स्विकारली. नमुद लाच रक्कम आरोपी क्रमांक 3) यांनी स्वतःचे ताब्यात ठेवून गुन्हयास प्रोत्साहन दिले आहे. आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन हदगाव, जि.नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे असल्याचे सांगितले हा सापळा रचताना मार्गदर्शक डॉ.राजकुमार शिंदे, (भापोस पोलीस अधीक्षक),  पर्यवेक्षण अधिकारी श्री प्रशांत पवार (पोलीस उप अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो, नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी प्रिती जाधव ,पोलीस निरीक्षक,अँटी करप्शन ब्युरो, नांदेड,सापळा कारवाई पथकअँटी करप्शन ब्युरो, नांदेड टीम

Saturday, 22 July 2023

पिंपरखेड व करमोडी येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीची तहसीलदार विनोद मुंडमवार यांच्याकडून पाहणी

 
 भाजपाचे डॉ.श्रीकांत पाटील व चंद्रशेखर पाटील देखील शेतकऱ्यांच्या बांधावर: नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवांच्या जाणून घेतल्या समस्या 
हदगाव (प्रतिनिधी) - सातत्याने तीन दिवसापासून चालू असलेल्या पावसाने हदगाव तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून अतिवृष्टीमुळे बहुतां शेतातील पिकांची नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.अतिवृष्टीचा फटका कोणकोणत्या भागाला बसला या हेतूने प्रशासनाची यंत्रणा कामाला लागल्याची दिसून येत असून तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी मोजे पिंपरखेड व करमोडी येथील नदीकाठच्या पिकांची पाहणी केली असल्याचे कळाले आहे.ज्या शेतकरी बांधवांचे शेतातील पिकांचे नुकसान झाले त्यांच्याशी संवाद देखील साधल्याची माहिती कळाली आहे. यावेळी तहसीलदार विनोद गुंडमवार यांच्यासोबत भाजपाचे लोकसभा इच्छुक उमेदवार डॉ.श्रीकांत पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य चंद्रशेखर पाटील कोळीकर, तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी, तलाठी ,मंडळ अधिकारी ,भाजपा तालुका सरचिटणीस चंद्रकांत पवार, डॉ.सुधाकर लोमटे, विवेक चोतमाल, दिगंबर साखरे, पिंपरखेड व करमोडी येथील सरपंच ,ग्रामसेवक व गावकरी मंडळी उपस्थित होती.
श्रीकांत पाटील यांनी  कोळी येथील शेतनुकसानीची केली पाहणी
      मोजे कोळी येथे देखील मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकरी रामराव भगवान जगताप यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले.यावेळी भाजपाचे डॉ.श्रीकांत पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत संबंधित पीक नुकसानीची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व तहसीलदार विनोद गुंडमवार यांना दिली असल्याचे कळाले असून तहसीलदार देखील येथील गावातील पीक नुकसानीची पाहणी करणार असल्याचे चंद्रशेखर पाटील यांच्याकडून माहिती काढली आहे. शासन स्तरावरून लवकरात लवकर नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे  करण्याची मागणी शेतकरी बांधव करताना दिसून येत आहेत.

Tuesday, 13 June 2023

नूतन तहसीलदार विनोद गुंडमवार यांचा पत्रकाराच्या वतीने सत्कार


हदगाव (प्रतिनिधी ) - हदगाव येथे तहसीलदार म्हणून विनोद गुंडमवार रुजू झाल्यानंतर त्यांचा हदगाव तालुका सोशल मीडिया व प्रिंट मीडियाच्या पत्रकाराच्या वतीने तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सोशल मीडियाचे हदगाव तालुका अध्यक्ष मारुती काकडे, सचिव शितल भांगे ,संपादक तथा पत्रकार प्रा. गजानन गिरी, उपाध्यक्ष पत्रकार गजानन जिदेवाड, प्रवीण माने, सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन भारती , दुर्गाताई भारती पत्रकार ज्योतिबा भांगे पाटील यांच्या वतीने नूतन तहसीलदार विनोद गुंडमवार यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Thursday, 11 May 2023

शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्याची सवीता निमडगे यांची प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी


हदगाव (प्रतिनिधी ) - शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेच्या लाभासह गावस्तरावरील अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन प्रत्येक गावांसाठी ग्रामसेवक तलाठी सह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करीत असते.पण कमी कर्मचाऱ्यांच्या नावाखाली अधिकारी कर्मचारी  आपल्या सोयीनुसार राहुन काम करत असल्याने त्यांची गावभेट नावालाच उरली असुन प्रत्येक गावामध्ये काही प्रतिष्ठित यांच्याशी संपर्कात राहून काम करत असल्याने सर्व सामान्य माणसाला आपले काम करण्यासाठी हेलपाटे मारावे लागत असल्याने होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन प्रत्येकाची कामे एकाच ठिकाणी व्हावे यासाठी शासनाने राबविलेला शासन आपल्या दरबारी हा उपक्रम सर्व सामान्य माणसाला कामाला प्राधान्य देणारा ठरला आहे.या उपक्रमामुळे अनेक कामे मार्गी लावण्यासाठी फायदेशीर ठरला आहे. यामध्ये  हदगांव तालुक्यातील नव्याने झालेल्या बरडशेवाळा महसूल मंडळ वगळता सर्वच मंडळात शासन आपल्या दरबारी उपक्रम राबविण्यात आला होता.परंतु कोरोना आजारानंतर अधिकारी कर्मचारी यांच्या कडून दिलेल्या गावाकडे गावभेट नावालाच उरली आहे.यामुळे गावकऱ्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी  काम सोडून हेलपाटे मारावे लागत असुन गावपुढारीची मनधरणी करावी लागत आहे.आपल्या हक्काच्या कामासाठी  अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने सर्व सामान्य माणसाच्या हितासाठी फायदेशीर ठरलेला शासन आपल्या दारी उपक्रम पुन्हा नव्याने राबविण्याची मागणी मानव विकास  संरक्षण समितीच्या महिला नांदेड जिल्हा अध्यक्षा तथा पळसा येथील सामाजिक कार्यकर्त्या सवीताताई विनोद निमडगे यांनी उपजिल्हाधिकारी तथा हदगांव तालुक्यांचे तहसीलदार जिवराज डापकर यांच्या सह गट विकास अधिकारी डि.के.अडेराघो यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Wednesday, 12 April 2023

हदगाव येथे 30 एप्रिल रोजी सर्व रोगनिदान आरोग्य शिबीराचे आयोजन

लोकनेते बाबुराव कदम यांची माहिती
हदगाव (प्रतिनिधी ) - हदगाव तालुक्यातील आंबाळा शिवरामध्ये व्यंकटरमणा इंग्लीश स्कुल मैदानात सर्व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीरासाठी हदगाव - हिमायतनगर तालुकाक्याचे लोकनेते बाबूराव कदम कोहळीकर यांचा पूढाकार महत्वाच ठरणार आहे.
 मान्यवरांचा सत्कार करताना संदेश पाटील हडसणीकर
या बाबत माहिती अशी की, सर्व रोग निदान शिबीराची माहिती देण्यासाठी हदगाव शहरातील माहेश्वरी भवन येथे बैठकीचे अयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबूरावजी कदम होते तर प्रमूख पाहूणे डॉ. शिंगणे साहेब ( सावंगी मेघे हॉस्पीटल), डॉ. उदावंत साहेब (सांगवी मेघे हॉस्पीटल), अशोकराव पवार, भाजपा विधानसभा अध्यक्ष निळकंट कल्याणकर गोपाळ सारडा, भाजपाचे प्रकाश राठोड, भाजपाचे सचिन पाटील कामारीकर, पंजाबराव देशमूख, शेतकरी नेते प्रल्हाद सुर्यवंशी, पत्रकार प्रतिनिधी दयानंद कदम, शितल भांगे तसेच आशा वर्कस महिला प्रतिनिधी आणि लोकनेते बाबूरावजी कदम यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी लांडगे यांनी केले. प्रमूख पाहूणे शिंगणे साहेब यांनी सर्व रोग निदान आरोग्य शिबीराची माहिती उपस्थिताना दिली. अशोकराव पवार यांनी आपले आनुभव सांगितले तसेच गोपाल सारडा आणि पांडूरंग कदम यांनी देखिल आपले विचार व्यक्त केले.

बाबूराव कदम यांनी कार्यक्रमाचा आरखडा उपस्थितापूढे मांडतान ३० एप्रिल रोजी तिन स्तराव एकाच ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली. ज्यात सर्व रोग निदान शिबीर, रोजगार मेळावा तसेच बच्चत गटातील महिलांसाठी मार्गदर्शन असे तिन स्तरीय कार्यक्रम आंबाळा शिवारातील व्यंक्टरमणा इग्लीश स्कूल येथे शिबीर होणार असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुदर्शन पाटील यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना युवा जिल्हाप्रमुख संदेश पाटील हडसनिकर, शंकर कदम, मंचकराव कदम आणि सर्व बाबूराव समर्थकांनी परिश्रम घेतल्याचे दिसून आले. कार्यक्रमाला आशा वर्कस, पत्रकार बांधव, बच्चत गटातील महिला आणि बाबूराव चहाता वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होता. कार्यक्रमाच्या एकदरीत माहिती वरून हदगाव तालुक्यातील सर्वात मोठे आरोग्य शिबीर होणार असल्याचा अंदाज येत होता.

Saturday, 4 March 2023

हदगाव येथे तुळजा भवानी मंडळाचा भजन कार्यक्रम संपन्न


प्रा. गजानन गिरी
 हदगाव (प्रतिनिधी) - हदगाव शहरातील तुळजा भवानी मंडळाच्या वतीने दिनांक चार शनिवार रोजी दोरणागिरी हनुमान मंदिर कशावरून कार्यक्रमाच्या औचित्याने भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या ठिकाणी आमलकी एकादशीनिमित्त भजन सादर करण्यात आले.
 भजनी कार्यक्रमाच्या वेळी तुळजाभवानी भजनी मंडळाच्या अध्यक्षा सौ. शीलाताई चिद्रावार, उपाध्यक्ष सौ. सागरबाई वाटेगावकर ,कोषध्यक्ष सौ. अनुताई मामीडवार , सचिव सौ. वर्षाताई देशमुख, सदस्या ज्योतीताई तिवारी, सौ. गोदावरी पिंपळे, सौ पुष्पा कंठाळे, सौ. प्रमिला मुक्कावार ,चित्रा देशमुख ,    सौ. शीला मामीडवार ,सूर्यवंशी, जाधव , मुंदडा , सुमित्रा जगताप , बोंबलेताई, काळेताई, सौ कदम ताई यांची उपस्थिती होती

भाजपा तालुका अध्यक्ष तातेराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजपाचे शहर अध्यक्ष बाला कदम यांचा वाढदिवस साजरा



 हदगाव (प्रतिनिधी ) - भाजपाचे शहराध्यक्ष बाला कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात हादगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे साजरा करण्यात आला हदगाव भाजपा तालुकाध्यक्ष तातेराव पाटील वाकोडी यांनी बाला कदम यांना शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

तातेराव पाटील यांच्या हस्ते खुल्या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन
भारतीय जनता पार्टीच्या वतीने नेवरवाडी तालुका हादगाव येथे क्रिकेटचे खुले सामने ठेवण्यात आले यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष तातेराव पाटील वाकोडी यांच्या हस्ते क्रिकेटच्या खुल्या सामन्याचे उद्घाटन करण्यात आले . यावेळी त्यांच्यासोबत भाजपा पदाधिकारी व निमंत्रित सदस्य शेखर पाटील कदम व इतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . 

माजी आमदार उत्तमराव इंगळे यांचा वाढदिवस साजरा 
उमरखेड येथील भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार उत्तमराव इंगळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला भाजपा हदगाव तालुकाध्यक्ष तातेराव पाटील वाकोडे यांच्या वतीने त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासोबत भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Tuesday, 13 December 2022

गरिबीवर मात करीत विश्वंभर पोटे यांची पोलीस निरीक्षक पदी निवड



माळझरा गावकऱ्यांकडून दोन्ही पोलिस निरीक्षकाचा  सन्मान 
शेख मुख्तार
 मनाठा (प्रतिनिधी )  बामणी फाटा येथुन पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजे माळझरा ता.हदगांव हे गाव पंच्याहत्तर टक्के आदिवासी वस्तीचे दोन हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. येथे सातवीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. गावातुन प्राथमिक शिक्षण घेत आपल्या सोयीनुसार पुढील शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी आज दोन तहसीलदार , दोन पोलिस निरीक्षक, आयुक्त प्राध्यापक, अस्या विविध उच्च पदावर कार्यरत आहेत.शिकलेल्या गावांसाठी काही तरी केले पाहिजे या विचाराने त्यांच्या कडून  गावकऱ्यांकडून आयोजित केलेल्या कार्यक्रमात नेहमी अधिकारी उपस्थित राहुन मार्गदर्शन करतात.यामुळेच गावात विविध समीत्याच्या माध्यमातून दारुबंदी सह सार्वजनिक कार्यक्रम एकोप्याने होत असलेले बघायला मिळतात.
 विश्वंभर वसंता पोटे यांनी प्राथमिक शिक्षण गावात पुर्ण केले. पुढील दहावी पर्यंत शिक्षण माळझरा येथुन चार किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचगव्हान येथे केले.परीस्थीती लक्षात घेऊन पुढील शिक्षण जालना या ठिकाणी जाऊन पार्ट टाइम जॉब करीत शिक्षण घेतले. जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करून मेहनत घेऊन पोलिस शिपाई  शिखर गाठले.नुकत्याच पार पडलेल्या परीक्षेत पोलिस निरीक्षक पदावर नियुक्ती झाली असल्याने  गावकऱ्यांनी सात डिसेंबर रोजी सकाळी पोलिस निरीक्षक विश्वंभर पोटे व गावांमध्ये पहिला पोलिस निरीक्षक झालेल्या सदानंद मेंडके  यांची गावातुन मिरवणूक काढून  शालेय विस्तार अधिकारी एस.एन.बाच्छे व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा संपन्न झाला.यामध्ये उपस्थित मान्यवरांनी माळझरा सारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन पुढील शिक्षण घेत विविध पदावर यशाचे शिखर गाठत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे  कौतुक करीत उपस्थित गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. 
 यावेळी माजी पंचायत समिती सदस्य गुलाबराव हाके, सरपंच पंडीत खोकले, उपसंरपंच संजय क-हाळे, पोलिस पाटील वसंतराव कार्ले, दामोदर,डवरे, नाईक, मेंडके, संतोष बुरकुले, तुळशीराम मेंडके, शंकरराव मिराशे, तान्हाजी कार्ले, विनोद बिरकुले, साहेबराव मेंडके, देवानंद मिराशे, प्रभाकर मिराशे, दत्ता मेंडके, बापुराव मगरे, सुखदेव मिराशे,प्रकाश क-हाळे, विष्णू खोकले, सुखदेव खोकले, गजानन पाटे,कोंडबा पहाडे, शिवाजी पोटे, गणेश मिराशे,जयभाजे,भुतनर यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मौजे केदारगुडा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

मौजे केदारगुडा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत  विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू 
शेख मुख्तार
हदगाव (प्रतिनिधी ) -जिल्ह्यातील हदगाव तालुक्यांतील मौजे केदारगुडा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत एका विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे, मात्र या प्रकरणावरून शासनाच्या आणि शाळा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे एका निष्पाप, निरागस मुलीला आपल्या प्राणास मुकावे लागले असल्याचे दिसुन येत आहे.
 याचं शाळेच्या अनेक गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी काही महिन्यापूर्वीच अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनेच्या माध्यमातून  या आश्रम शाळेतील घडणाऱ्या विविध प्रकारच्या समस्या विषयी अवगत करून, निवेदन सादर करण्यात आले होते.त्या अनुषंगाने तत्कालिन प्रकल्प अधिकारी यांनी मु.अ.सह सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती पण शिक्षण विभागाच्या काही चतुर आधिकारी आणि कर्मचारी यांनी सोयीस्कर मार्ग शोधत कार्यवाही करण्याचे मुद्दाम हून टाळले.या बाबत शाळा प्रशासनात कोणत्याही प्रकारची सुधारणा न होता उलट या प्रकारच्या गंभीर घटना घडणे अतिशय निंदनीय बाब म्हणता येईल.
 याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत प्रकल्प कार्यालय किनवट अंतर्गत चालविली जाणारी शासकीय आदिवासी आश्रम शाळा केदारगुडा येथील इयत्ता ४ थी मध्ये शिकणाऱ्या मुलीच्या संशयास्पद मृत्यूने  जिल्ह्यातील सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. सदरील घटना दि.१२/१२/२०२२ अंदाजे सायंकाळी पाच ते सहा दरम्यान घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन थेट प्रकल्प कार्यालय आधिकारी किनवट, उप विभागीय पोलिस आधिकारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करत या प्रकरणाच्या दोषिवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
हि बातमी सर्व जिल्हाभर वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे अनेकांनी आश्रम शाळेला घेराव घालून पीडित मुलीस न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनास विनंती केली.यावेळी जमलेल्या लोकांचा एवढा आक्रोश होता की, तात्काळ कारवाई करण्याची प्रक्रिया पूर्ण करून या प्रकरणी जे दोषी असणाऱ्या व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अन्यथा मृतदेहास हात लावू देणार नाही, अशी विनंती केली होती पण शासनाच्या विविध आधिकारी आणि कर्मचारी यांच्या मध्यस्थीने काही वेळ तणाव निर्माण झाला होता पण संबंधित यंत्रणेने ठोस कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने जमलेल्या हजारोंचा रोष कमी झाला.                    शव विच्छेदन इन कॅमेऱ्यात करून दोषीवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी
 यावेळी हदगाव तालुक्यांसह ईतर ठिकाणावरून आदिवासी बांधवांनी एकच गर्दी केली होती. काल परवा भोकर आणि शंकरनगर येथील आदिवासी आश्रम शाळेतील मुलांना बेदम मारहाणीची घटना नुकतीच घडली असल्याने ही घटना घडणे म्हणजे प्रशासन या प्रकारच्या प्रकरणाचे गांभीर्य कितपत घेत आहे यावरून स्पष्ट दिसून येते. म्हणुन समस्त आदिवासी बांधवांनी  या प्रकरणाची विशेष बाब म्हणून शव विच्छेदन इन कॅमेऱ्यात करावी अशी मागणी करण्यात आली तसेच या प्रकरणात दोषी असणाऱ्या व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत पीडित मुलीस न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने जन आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 
 त्याचं बरोबर याच शाळेत या प्रकारच्या अनेक छोट्या मोठ्या प्रमाणावर घटना  मागिल काळात घडतच राहिल्या होत्या पण त्याला प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना न केल्यामुळेच ही दुर्देवी घटना घडल्याचे बोलल्या जात आहे.यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी श्रीमती भोसले नेहा, उपविभागीय पोलिस अधिकारी भोकर, हदगांव तालुक्याचे तहसीलदार श्री जिवराज डापकर, मनाठा येथील पोलीस निरीक्षक श्री विनोद चव्हाण , तामसा येथील पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे , आरोग्य अधिकारी मुरमुरे,यांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली. परंतु अद्याप मृत्यू नेमके चे कारण स्पष्ट झाले नाही ... अधिक तपास पोलीस प्रशानाच्या वतीने सूरू आहे.. यावेळी अनेक आदिवासी संघटनाचे प्रतिनीधी, पत्रकार बांधव उपस्थित होते.

Wednesday, 5 October 2022

महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी परमेश्वर सूर्यवंशी यांची निवड

महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी परमेश्वर सूर्यवंशी यांची निवड

जिल्हाध्यक्ष हिमांशु इंगोले यांच्या उपस्थित सपन्न झाली बैठक
हदगाव (प्रतिनिधी ) - हिमायतनगर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे दि . २ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष हिमांश अ.इंगोले यांच्या अध्यक्षेखाली  बैठक घेण्यात आली त्यात तर प्रमुख पाहण म्हणून नांदेड जिल्हा सचिव राजकमार भसारे या बैठकीस हजर होते.
बैठकीच्या सरवातीला भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान चे शिल्पकार लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली . त्यानंतर या बैठकित हिमायतनगर शहरा सह ग्रामीण भागात वेळोवेळी पत्रकारांच्या समस्या व गोर गरीब नागरीकांना लेखणीतून न्याय मिळून देण्यासाठी नेहमी अग्रेसर राहणारे नागोराव शिंदे पळसपरकर यांची ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी व करंजी येथील पत्रकार परमेश्वर सूर्यवंशी यांची हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी , उपाध्यक्ष गंगाधर गायकवाड सचिव पदी सनिल चव्हाण सल्लागार म्हणून आनंद जळपते कोषाध्यक्ष विनोद चंदनगे तर संघटक पदी विजय वाठोरे कृष्णा राठोड सहसचीव पदी निवड करण्यात आली .
उर्वरित कार्यकारनी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे परमेश्वर सूर्यवंशी यांनी सांगितले यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष हिमांश अ.इंगोले, जिल्हा सचिव राजक गरे, तस्रण भारत चे प्रतिनिधी मनोज पाटील, लोकपत्रचे दिलीप शिंदे, सामाजिक कार्यकर्ते मन्ना शिंदे, माधव कदम, राज गायकवाड, बाबराव जरगेवाड, पांडुरंग मिराशे, प्रशांत राहुलवाड सह आदि पत्रकार व कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते.

आम आदमी पार्टीची शाखा विस्तार बैठकीतचे हदगाव येथे आयोजन

आम आदमी पार्टीची शाखा विस्तार बैठकीतचे हदगाव येथे आयोजन
हदगाव (प्रतिनिधी) दि 09 ऑक्टोबर 2022 रविवारी सकाळी 10 वाजता आर्य समाज मंदिर हदगाव जि. नांदेड येथे आम आदमी पार्टी च्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे .
   भारत देशात सामाजिक राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे .शिक्षण , आरोग्य , रोजगार , लाईट , पाणी ,रस्ता , महिला सुरक्षा , बाल हक्क सुरक्षा , राशन , शेतीसाठी रस्ता-पाणी-लाईट व अन्य अत्यावश्यक सुविधा जनतेस फार कष्टाने व अपमानित होऊन मिळवाव्या लागत आहेत त्याही आवश्यक इतक्या दर्जेदार मिळत मिळत नाहीत . अनेक ठिकाणी अनियमितता व गैरप्रकार दिसून येत आहेत यास महाराष्ट्र राज्यातील जनता पूर्णपणे वैतागली आहे .अगोदर काँग्रेस - राष्ट्रवादी , नंतर सेना -भाजप , नंतर शिंदे -फडणवीस या सरकारानी पूर्णपणे जनतेचा विश्वासघात केल्याचे दिसून येत आहे .सदरील राज्यकर्त्यांनी केवळ आपला स्वतःचा स्वार्थ साधून घेऊन प्रचंड माया जमविली आणि आपल्या हितचिंतकाचे भले केल्याचे दिसून येत आहे . पैशातून निवडणूक जिंकणे आणि निवडणुकीतून अमाप पैसा संपत्ती मिळविणे हाच यांचा व्यवसाय दिसून येत आहे . शेतकरी , बेरोजगार , पूर्णतः उध्वस्त होत असल्याचे स्पस्ट झाले आहे .यास आता एकच पर्याय असल्याचे सर्वसामान्य नागरिक , युवक , युवती याचे म्हणणे आहे तो म्हणजे केजरीवाल व त्यांची आम आदमी पार्टी . दिल्ली , पंजाब या राज्याप्रमाणे शिक्षण-आरोग्य -लाईट -पाणी मोफत आणि बाकी व्यस्थेचे सुनियोजन सामाजिक न्याय हवा असेल तर आम पार्टी शिवाय दुसरा पर्याय नाही असे जनतेने मान्य केले आहे .म्हणून महाराष्ट्र राज्यात आम्हा सर्वांना मिळून आम आदमी पार्टीचे सरकार आणायचे आणि आपला विकास आपणच करून घेयायचा असा संकल्प जनतेनी केला आहे यास प्रत्येक्षात उतरविण्यासाठी त्या मार्गाने काम करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले आहे .तरी  सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे आपआपल्या ज्या जबाबदाऱ्या हव्या आहेत त्या  अधिकृतपणे स्वीकारून कार्य करावे असे आवाहन आम आदमी पार्टी च्या वतीने करण्यात आले आहे .यावेळी अनेक नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे..


Wednesday, 21 September 2022

हदगांव उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर दि २३ सप्टेंबर रोजी प्रहार च्या वतीने बांगड्या भेट व बोंबाबोंब आंदोलन

हदगांव उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर दि २३ सप्टेंबर रोजी प्रहार च्या वतीने बांगड्या भेट व बोंबाबोंब आंदोलन 
प्रा. गजानन गिरी
हदगाव ( प्रतिनिधी ) - उपोषणकर्त्यांना पाच दिवस उलटले असताना देखील शासनाकडून कोणतेच पावले उचलली जात नसल्याने अखेर प्रहार जिल्हा कमिटी कडून हदगाव येथील उपोषणाला भेट देऊन शासनाच्या नाकार्तेपणाला  कुठेतरी वचक बसावा म्हणून व उपोषणाला पाठिंबा म्हणून दिनांक 23 सप्टेंबर रोजी उपविभागीय कार्यालयासमोर जिल्हा कमिटीच्या वतीने तसेच प्रहार तालुका कमिटीच्या वतीने बांगड्या भेट व बोंबाबोंब आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 
याबाबत सविस्तर माहिती अशी की हदगाव तालुक्यातील  कल्याण टोल लि . या कंपनीने तालुक्यामध्ये अव्ययरीत्या गौण खनिज उत्खनन केले आहे अवैध्य उत्खननाची तात्काळ चौकशी करून संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे हदगाव तालुकाप्रमुख श्री अनिल दिगंबर कदम पाटील यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर दि१७  सप्टेंबर पासून आमरण उपोषण चालू केले आहे दखल घेऊन ठोस कारवाईची भूमिका घेत नसल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दि २३ सप्टेंबर रोजी हदगाव उपविभागीय कार्यालयातील कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना बांगड्या भेट देऊन बोंबाबोंब आंदोलन करणार येत असल्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दि२०/९२०२२ रोजी देण्यात आले आहे 
निवेदन देते वेळेस प्रहार जनशक्ती पक्षाचे नांदेड  जिल्हाप्रमुख विठ्ठलराव देशमुख , प्रहार जनशक्ती पक्षाचे कंधार तालुका प्रमुख माऊली गीते ,प्रहार जनशक्ती पक्षाचे हदगाव तालुका सचिव संदीप संदीप वानखेडे पाटील दगडवाडीकर , प्रहार चे युवा तालुकाप्रमुख भानुदास शिंदे , प्रहार चे हदगाव शहर प्रमुख
संतोष वाघमारे ,हदगाव तालुका प्रसिद्धीप्रमुख 
भगवान कदम यावेळी निवेदन देते वेळेस इतरही प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.

Wednesday, 10 August 2022

नविआबादी येथील विद्यार्थ्यानी हर घर तिरंगा प्रभातफेरीने दिला देशभक्तीच संदेश

नविआबादी येथील विद्यार्थ्यानी हर घर तिरंगा प्रभातफेरीने दिला देशभक्तीच संदेश


द्वारका कांबळे

हदगाव (प्रतिनिधी) - देशाला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने अशा अमृत महोत्सवाची माहिती नागरीकांना व्हावी म्हणून आणि देश अभिमान जागृत व्हावा म्हणून नविआबादी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्यावतीने मुख्याध्यापक अखिलेश पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगा रॅली काढून भारत मातेचा जय घोष करण्यात आला.


या बाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक ८ ऑगस्ट २०२२ रोजी जि. प. प्रा. शाळा नवी आबादी हदगाव येथे स्वातंर्त्याचा अमृतमहोत्सवानिमित्त बाल सभेचे आयोजन करण्यात आले होते .या बाल सभेचे अध्यक्ष म्हणून काजल मरलीधर जाधव या विद्यार्थिनीने तसेच उपाध्यक्ष म्हणून आदित्य बेलखेडे या विध्यार्थाने कामकाज पाहिले. तसेच नवनाथ जोनापल्ले या विद्यर्थ्याने स्वातंर्त्याचा अमृत महोत्सव याचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व इतर विद्यार्थ्यांनी सद्धा या बाल सभेत आपले मनोगत व्यक्त केले.यानंतर शाळेचे मख्याध्यापक श्री पठाण सर यांनी भारतीय ध्वज तिरंगा बाबत विद्यार्थ्यांना सखोल माहिती सांगितली. त्याच प्रमाणे ९ ऑगस्ट रोजी जि .प .प्रा शा .नवी आबादी हदगाव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त जनजागृती म्हणून हरघर तिरंगा रॅली काढण्यात आली. ही रॅली नवी आबादी , भिमाई नगर व वाजपेयी नगर हदगाव येथून काढण्यात आली .त्यानंतर शाळेत आल्यावर विद्यार्थ्यांना श्री नाल्हे सर यांनी या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आपणास आणखी कोणकोणते उपक्रम घ्यायचे आहे व या अमृत महोत्सवाचे महत्त्व काय आहे हे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. यावेळी उपस्थित श्री मख्याध्यापक पठाण सर यांनीसद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी शाळेतील श्री कऊळकर सर, श्री शिंदे सर , श्री भिसे सर, श्रीमती जाधव मॅडम व श्री सोनकांबळे सर उपस्थित होते.

Sunday, 7 August 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतास मोठ्या संख्येनी उपस्थित रहा- खासदार हेमंत पाटील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतास मोठ्या संख्येनी उपस्थित रहा- खासदार हेमंत पाटील

नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील शिवसैनिकांना केले आवाहन
प्रा. गजानन गिरी
हदगाव (प्रतिनिधी) - राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (ता.आठ) नांदेड आणि हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत. सोबतच दोन्ही जिल्ह्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन देखील करणार आहेत सोबतच कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहावे, असे आवाहन हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड येथील विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते सचखंड श्री हूजूर साहेब गुरुद्वाऱ्यात जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर तरोडा नाका भागातील गोदावरी अर्बन सहकारी संस्थेच्या सहकारसूर्य या मुख्यालयास भेट देणार आहेत. नांदेड उत्तर चे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या प्रयत्नांने सुरू असलेल्या निळारोड (गुरुजी चौक) येथे एका विकास कामाचे भूमिपूजन, पासदगाव आसना नदीवरील पुलाचे भूमिपूजन अश्या विविध विकास कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे तसेच  नांदुसा येथील पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी करण्यासोबतच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना दिलासा देणार आहेत. त्यानंतर भक्ती लॉन्स येथे होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यास मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत. 
नांदेड जिल्ह्यातील कार्यक्रम आटोपुन मुख्यमंत्र्यांचा ताफा आसनामार्गे अर्धापूर, वारंगा, बाळापूर, कळमनुरी, हिंगोली येथे पदार्पण करणार आहेत. हिंगोली येथे आमदार संतोष बांगर यांनी आयोजित केलेल्या कावड यात्रेत मुख्यमंत्री सहभागी होणार असून, त्यानंतर कार्यकर्ता मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. पुढे लिंबाळामार्गे औंढा (ना.) येथील औंढा नागनाथ देवस्थानचे दर्शन घेऊन मालेगाव मार्गे पुन्हा नांदेड कडे परतणार आहेत. नांदेडहून विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहेत.

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच नांदेड मध्ये
हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. विकासाच्या बाबतीत नेहमी पुढाकार घेणारे एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामुळे सामान्य नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा सर्वांसाठी ऊर्जा देणारा असा अविस्मरणीय ठरणारा आहे. तेव्हा जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार हेमंत पाटील, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी केले आहे.

नांदेड – हिंगोली जिल्ह्याचा रखडलेला विकास पुन्हा झपाट्याने सुरु होईल.
मुळात एकनाथ शिंदे हे एक सामान्य लढाऊ कार्यकर्ता म्हणून नावारुपाला आलेलं उद्योन्मुख नेत्रत्व आहेत. आजपर्यंत त्यांनी विकास कामास प्राधान्य दिले आहे. आज ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने पहिल्यांदा त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रक्रिया केंद्रास 100 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. आहेत. त्यामुळे नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील रखडलेले विकास कामे पुन्हा वेगाने सुरु झाल्याने हिंगोली  ,नांदेड  व यवतमाळ जिल्ह्यातील सर्वसामन्यांच्या आशा उंचावल्या आहेत.
                                        खासदार हेमंत पाटील

Saturday, 16 July 2022

आमदार केराम यांच्या प्रयत्नाला यश; श्री दत्त शिखर मंदिर मार्ग व श्री अनुसयामाता मंदिर रस्त्यासाठी तब्बल ६ कोटी मंजूर

आमदार केराम यांच्या प्रयत्नाला यश; श्री दत्त शिखर मंदिर मार्ग व श्री अनुसयामाता मंदिर रस्त्यासाठी तब्बल ६ कोटी मंजूर
माहुर ; (प्रतिनिधी) - साडेतीन शक्तिपीठांपैकी मूळपीठ म्हणून लाखो भक्तांचे श्रध्दस्थान असलेल्या श्री रेणुकादमाता  व श्री दत्त प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र माहुर येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात परंतू त्यांना हव्या तशा सोई सुविधा आजवर कोणत्याही लोकप्रतिनिधींनी उपलब्ध करून दिली नव्हती परंतू केंद्रीय दळणवळण मंत्री तथा देवीचे निस्सीम भक्त नामदार नितीन गडकरींनी श्रीक्षेत्र माहुरला राष्ट्रीय महामार्गाशी जोडून भाविक भक्तांना येण्याजाण्यासा़ठी मोठी रस्त्यांची साखळी निर्माण केली. 
परंतू अनेक वर्षांपासून प्रलंबित महामार्ग ते दत्त शिखर मंदिर मार्ग व श्री अनुसयामाता मंदिर मार्ग हा जिल्हा परिषद अंतर्गत येत असल्याने व जिल्हा परिषद सदस्यांच्या उदासीनतेमुळे  याची दखल घेण्यात आली नव्हती,आमदार केरामांनी सदरील रस्त्याचा समावेश व श्रेणी वाढ करून घेऊन सदरील रस्त्यासाठी तब्बल ६ कोटी रूपये शासनाकडून मंजूर करून घेतले आहे. त्यामुळे या गुरूपोर्णिमेला आमदार केराम यांचेकडून श्रीदत्तगुरू चरणी गुरूदक्षिणेच्या रूपाने हे दोन प्रलंबित रस्त्यांसाठी मंजूरी घेऊन भाविक भक्तांना मोठा दिलासा दिला आहे. 
सध्या केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे त्यामुळे किनवट माहुर तालुक्यात भाजपा आमदार भीमराव केराम यांच्या हातून भविष्यात अनेक विकासकामे श्रीक्षेत्र माहूरगडावर करण्यात येणार आहे यात शंका नाही. 
यासाठी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते योगी शाम भारती महाराज, माजी उपनगराध्यक्ष अनिल तिरमनवार, जिल्हा उपाध्यक्ष सुमित राठोड, जिल्हा चिटणीस अनिल वाघमारे,किनवट-माहुर विधानसभा संयोजक अॅड रमन जायभाये, पत्रकार प्रकोष्ट जिल्हध्यक्षा पदमा गुरे, तालुका अध्यक्ष दिनेश येऊतकर, शहराध्यक्ष गोपू महामुने, नंदकुमार जोशी, भाजपा प्रवक्ता विजय आमले,आदिवासी आघाडीचे तालुका अध्यक्ष संजय पेंदोर, महिला शहराध्यक्षा सौ. अर्चना राजू महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्षा सौ. निर्मला अशोक जोशी तसेच श्रीदत्त शिखर संस्थानचे व्यवस्थापक ऐड. उज्वल भोपी आदींनी विशेष आभार मानून आमदार केरामा़ंचे अभिनंदन केले आहे.

Thursday, 30 June 2022

वीज पडून मृत्यू पावलेल्या शेतकर्यांचे कुटुंबियांना 4 लक्ष रुपये चा धनादेश सुपूर्द

वीज पडून मृत्यू पावलेल्या शेतकर्यांचे कुटुंबियांना 4 लक्ष रुपये चा धनादेश सुपूर्द
माहूर (.विनोद भारती)  - शेतातील भुईमुगाचे कुटार झाकण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू पावल्याची घटना दि 19 मे रोजी सकाळी 7: 30 वाजता  माहूर तालुक्यातील पालाईगुडा येथे घडली.किरण गेमसिंग जाधव वय 40 वर्षं असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.सदरील शेतकऱ्याच्या कुटुंबियांना 4 लक्ष रुपये चा धनादेश माहूर तहसील प्रशासनाच्या वतीने आज सुपूर्द करण्यात आला.
तालुक्यातील पानोळा हे येथील शेतकरी किरण गेमसिंग जाधव वय 40 वर्ष व त्यांची पत्नी विद्या हे दोघे दि.19 मे रोजी सकाळी 7 : 30 वाजेच्या दरम्यान पालाईगुडा (भोरड) येथील शेतकरी गणेश नरसिंग राठोड यांच्या शेतात भुईमुगाचे कुटार झाकण्यासाठी गेले असता अचानक विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला. या दरम्यान शेतात भुईमूग कुटारचा ढीग झाकण्याचे काम करीत असताना किरण गेमसिंग जाधव यांच्या अंगावर वीज पडल्याने तो बेशुद्ध झाला त्यास तातडीने माहूर च्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.त्यांची प्रकृती चिंताजनक वाटत असल्याने पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.
याबाबत सिंदखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. व महसूल प्रशासनाने पंचनामा करून रितसर प्रस्ताव शासनाकडे  पाठवला. भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र राज्य चे सरचिटणीस धरमसिंग राठोड यांनी संबंधित लाभार्थ्यांस शासकीय मदत मिळावी यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. तबल दीड महिन्याच्या कालावधी नंतर  संबंधित इसमाच्या कुटूंबियांना शासकीय मदत मिळाली.
यावेळी माहूर चे तहसीलदार किशोर यादव, मंडळ अधिकारी जी. पी.पडकोंडे,तलाठी व्ही.पी.राजूरवार आदींच्या उपस्थितीत मयत किरण जाधव यांची पत्नी विद्या किरण जाधव यांना 4 लक्ष रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.यावेळी पानोळा येथील सेवा सहकारी सोसायटी चे माजी चेअरमन संजय कुमरे, प्रल्हाद राठोड, निरंजन राठोड, सामाजिक कार्यकर्ते रवी पराते आदी उपस्थित होते.


-

आनंद दत्तधाम आश्रमात वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

आनंद दत्तधाम आश्रमात वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप 
दत्ता महाराज बितनाळकर पुण्यतिथी उत्साहात हजारो भक्तांचा मेळा

माहूर (प्रतिनिधी ) -
 माहूर येथील  आनंद दत्तधाम आश्रम उर्फ वसमतकर मठ येथे दि. २७ जून रोजी विविध कार्यक्रम संपन्न झाले. त्यामध्ये वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार  व महाप्रसाद  आदी कार्यक्रमांचा समावेश होता. आनंद दत्त शाम आश्रम माहूर यांच्या वतीने माहूरगडावर गेल्या २५ वर्षापासून दैनंदिन अन्नदानाची परंपरा अविरतपणे सुरु असून कोरोना कालावधीत माहूर शहरात मोठ्या प्रमाणात गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व आवश्यक धनधान्य मठाच्या वतीने पुरविण्यात आले. तर ग्रामीण रुग्णालयात भरती रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळचे भोजन मोफत पुरविण्याचा उपक्रम सुरु केला. स्वच्छता अभियान राबविले. वृक्षारोपणचे उपक्रम सुरु केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा  गुरुकुंज आश्रम मोझरी ते राष्ट्रपिता महात्मा  गांधी यांच्या सेवाग्राम आश्रम वर्धा पर्यत सप्तसूत्री उपक्रम राबवून गुरुसंदेश पदयात्रा व संत बाळगीर महाराज स्वच्छता दिंडी च्या माध्यमातून भक्तांना आदर्श जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या स्वच्छता, शिक्षण, महिला बचत, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, शेतकरी आत्महत्या, जीवाचा उद्धार,आदी विषयावर कीर्तन, प्रवचनातून उपदेश केला. 

द.भ.प. साईनाथ महाराज यांनी झोळी खांद्यावर घेऊन राज्यभर व्यसनमुक्ती व दुर्गुणमुक्तीचे दान मागण्याचा संकल्प केला.  कोरोना प्रतिबंधक लसीकरण कॅम्पचे आयोजन करून लसीकरण मध्ये सहभाग घेतला. आश्रमाच्या वतीने वसमत, महागाव, सवना,  मुदखेड,  येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळचे मोफत भोजन आनंद दत्त धाम आश्रम माहूरशी संलग्न असलेल्या मठांच्या माध्यमातून  देण्याचा उपक्रम राबविण्यात येते. दोन वर्ष कोरोना  महामारीच्या अनुशंगाने प्रशासनाच्या प्रतिबंधामुळे नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करता अली नव्हती परंतु यावर्षी निर्बध खुले झाल्याने राज्यभरतील शिष्यमंडळीनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. कार्यक्रमास सीताराम ठाकरे पाटील, वसमत शिवसेना प्रमुख प्रभाकर क्षीरसागर, निळकंठ पाटील, भाऊराव पाटील, कॉंग्रेस माहूर तालुका प्रवक्ते जयकुमार अडकीने, रमेश तमखाने, विलास पाटील रोहीपिंपळगावकर, दिलीप पाटील कोपरकर,  गजानन कलाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय माहूर चे एस. आर. देशमुख, सी. पी. जोशी, दवणे, राठोड, कातले  आदिसह  बहुसंख्य शिष्यमंडळी विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थित होती.

  द.भ.प. साईनाथ महाराज बितनाळकर यांच्या सुश्राव्य कीर्तन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी गणित विषयक मार्गदर्शक पुस्तिका प्रा. वानखेडे यवतमाळ लिखित व प्रकाशित मॅथ३६० या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.  सकाळपासूनच महाप्रसाद कार्यक्रम सुरु होता.

Tuesday, 7 June 2022

माहूर नगरपंचायतीने रस्त्यावर टाकलेले भंगार केले जप्त

माहूर नगरपंचायतीने रस्त्यावर टाकलेले भंगार केले जप्त 
नागरीकांनी रस्तयात असलेले बांधकाम साहीत्य त्वरीत हटवावे - मुख्याधिकारी किशोर यादव. 
माहूर (प्रतिनिधी) शहरातील मुख्य रस्त्याच्या कडेला भंगार साहीत्य खरेदीची दुकाने थाटली असून शहरातील रस्त्यावर प्रचंड प्रमाणात भंगार साहित्य टाकून रहदारीस अडथळा निर्माण केला ज्यामुळे रस्त्याने येजा करणाऱ्या नागरिकांसह वाहनास अडथळा निर्माण केल्यामुळे शहरातील सूज्ञ नागरिकांनी नगर पंचायतकडे तोंडी व, लेखी तक्रारी करुन सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यावरील भंगार साहित्य त्वरीत हटवण्याची मागणी केली.त्या मागणीची दखल घेत सदर दुकाने शहराबाहेर हटविण्याबाबत भंगार खरेदी करणाऱ्या व्यावसायिकांना नगर पंचायत प्रशासनाचने सूचना (नोटीस)तामील केल्या होत्या 20 दिवसाच्या कालावधीनंतरही संबधित व्यवसाईकांनी भंगार साहित्य हटविले नासल्याने तहसिलदार तथा मुख्याधिकारी किशोर यादव यांच्या आदेशानुसार कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी यांच्या नेत्रूत्वात नगर पंचायतीच्या पथकाने दिनांक 7मे 2022 मंगळवार रोजी सकाळी 12 वाजताचे दरम्यान रस्त्यावर असलेले भंगार साहीत्य जप्त केले. उप अधिक्षक सुनिल वाघ, देविदास जोंधळे, देविदास सिडाम,विशाल ढोरे, विजय शिंदे, सुरेंद्र पांडे, स्वच्छतादूत गणेश जाधव, नय्युम पाशा, सहभागी झाले होते, या कारवाईप्रमाणे शहरातील हमरस्त्यावर सूरू असलेले पोल्ट्री फार्म, व शहरात सर्वत्र अतिशय क्रूरपणे होणारी कोंबडी, बकऱ्यांची कत्तल करुन उघड्यावर होणारी मांस विक्री, भररस्त्यात बिनदिक्कतपणे उभी असलेली वाहने, बांधकाम साहीत्य हटविण्यात यावे अशी माहूरवासियांकडून अपेक्षा व्यक्त केली जात असून याबाबत तहसिलदार तथा मुख्याधिकारी किशोर यादव यांना विचारणा केली असता जागा उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रयत्न सूरू असून जागा उपलब्ध झालेवर मांसविक्रीची दुकाने शहराबाहेर घालविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. असे असले तरी नागरीकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी उघड्यावर मांस विक्री करणार्‍या दुकानावर कठोर कारवाई करणार की त्यांना पाठीशी घालणार याकडे शहरातील नागरीकांचे लक्ष लागले आहे .

Sunday, 5 June 2022

सुभाष सटवाजी ढगे सेवानिवृत्त

सुभाष सटवाजी ढगे सेवानिवृत्त
द्वारकाबाई कांबळे
हदगाव (प्रतिनिधी ) -  विदु्यत महावितरण ,सहाय्यक अभियंता शाखा कार्यालय तामसा (शहर) मध्ये कार्यरत ‍असलेले श्री सुभाष सटवाजी ढगे (लाईनमन) हे नियत वयोमानानुसार दि.३१/०५/२२रोजी ३९ वर्षाच्या प्रदिर्घ सेवा करुन सेवानिवृत्त झाले त्याचा उपविभागिय कार्यालय महावितरण हदगाव येथे उप- कार्यकारी अभियंता ढवळे साहेब यांच्या हस्ते  सपत्नीक सत्कार  करण्यात आला. यावेळी महावितरणचे कर्मचारी अविनाश खंदारे ,कुंटुरकर साहेब ,सोनसळे साहेब, पठाणसाहेब ई.कर्मचारी  व कुंटुबिय उपस्थित होते.