भाजपाचे डॉ.श्रीकांत पाटील व चंद्रशेखर पाटील देखील शेतकऱ्यांच्या बांधावर: नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवांच्या जाणून घेतल्या समस्या
हदगाव (प्रतिनिधी) - सातत्याने तीन दिवसापासून चालू असलेल्या पावसाने हदगाव तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून अतिवृष्टीमुळे बहुतां शेतातील पिकांची नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.अतिवृष्टीचा फटका कोणकोणत्या भागाला बसला या हेतूने प्रशासनाची यंत्रणा कामाला लागल्याची दिसून येत असून तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी मोजे पिंपरखेड व करमोडी येथील नदीकाठच्या पिकांची पाहणी केली असल्याचे कळाले आहे.ज्या शेतकरी बांधवांचे शेतातील पिकांचे नुकसान झाले त्यांच्याशी संवाद देखील साधल्याची माहिती कळाली आहे. यावेळी तहसीलदार विनोद गुंडमवार यांच्यासोबत भाजपाचे लोकसभा इच्छुक उमेदवार डॉ.श्रीकांत पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य चंद्रशेखर पाटील कोळीकर, तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी, तलाठी ,मंडळ अधिकारी ,भाजपा तालुका सरचिटणीस चंद्रकांत पवार, डॉ.सुधाकर लोमटे, विवेक चोतमाल, दिगंबर साखरे, पिंपरखेड व करमोडी येथील सरपंच ,ग्रामसेवक व गावकरी मंडळी उपस्थित होती.
श्रीकांत पाटील यांनी कोळी येथील शेतनुकसानीची केली पाहणी
मोजे कोळी येथे देखील मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकरी रामराव भगवान जगताप यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले.यावेळी भाजपाचे डॉ.श्रीकांत पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत संबंधित पीक नुकसानीची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व तहसीलदार विनोद गुंडमवार यांना दिली असल्याचे कळाले असून तहसीलदार देखील येथील गावातील पीक नुकसानीची पाहणी करणार असल्याचे चंद्रशेखर पाटील यांच्याकडून माहिती काढली आहे. शासन स्तरावरून लवकरात लवकर नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी बांधव करताना दिसून येत आहेत.
No comments:
Post a Comment