हदगाव (प्रतिनिधी ) - शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेच्या लाभासह गावस्तरावरील अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन प्रत्येक गावांसाठी ग्रामसेवक तलाठी सह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करीत असते.पण कमी कर्मचाऱ्यांच्या नावाखाली अधिकारी कर्मचारी आपल्या सोयीनुसार राहुन काम करत असल्याने त्यांची गावभेट नावालाच उरली असुन प्रत्येक गावामध्ये काही प्रतिष्ठित यांच्याशी संपर्कात राहून काम करत असल्याने सर्व सामान्य माणसाला आपले काम करण्यासाठी हेलपाटे मारावे लागत असल्याने होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन प्रत्येकाची कामे एकाच ठिकाणी व्हावे यासाठी शासनाने राबविलेला शासन आपल्या दरबारी हा उपक्रम सर्व सामान्य माणसाला कामाला प्राधान्य देणारा ठरला आहे.या उपक्रमामुळे अनेक कामे मार्गी लावण्यासाठी फायदेशीर ठरला आहे. यामध्ये हदगांव तालुक्यातील नव्याने झालेल्या बरडशेवाळा महसूल मंडळ वगळता सर्वच मंडळात शासन आपल्या दरबारी उपक्रम राबविण्यात आला होता.परंतु कोरोना आजारानंतर अधिकारी कर्मचारी यांच्या कडून दिलेल्या गावाकडे गावभेट नावालाच उरली आहे.यामुळे गावकऱ्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी काम सोडून हेलपाटे मारावे लागत असुन गावपुढारीची मनधरणी करावी लागत आहे.आपल्या हक्काच्या कामासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने सर्व सामान्य माणसाच्या हितासाठी फायदेशीर ठरलेला शासन आपल्या दारी उपक्रम पुन्हा नव्याने राबविण्याची मागणी मानव विकास संरक्षण समितीच्या महिला नांदेड जिल्हा अध्यक्षा तथा पळसा येथील सामाजिक कार्यकर्त्या सवीताताई विनोद निमडगे यांनी उपजिल्हाधिकारी तथा हदगांव तालुक्यांचे तहसीलदार जिवराज डापकर यांच्या सह गट विकास अधिकारी डि.के.अडेराघो यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
No comments:
Post a Comment