हदगाव तालुक्यातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणुन घोषित करा - मनसे तालुका अध्यक्ष बालाजी पाटील कऱ्हाळे यांची शासनाकडे मागणी
हदगाव (प्रतिनिधी) - कोरूना माळी च्या काळामध्ये डॉक्टर्स नर्स पोलीस कर्मचारी तसेच प्रशासन अधिकारी यांनी ज्याप्रमाणे जबाबदाऱ्या पार पाडल्या त्याचप्रमाणे हादगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांनी देखील आपले कर्तव्य बजावत तालुक्यातील विविध गावातील परिस्थिती याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले तेव्हा अशा पत्रकारांस फ्रंटलाईन वर्कर्स म्हणुन घोषित करून त्यांना त्या प्रकारच्या सुविधा देण्याची मागणी निवेदनाद्वारे हदगाव मनसे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील कऱ्हाळे यांनी शासनाकडे केली आहे.
सविस्तर माहिती अशी की, कोरोणा महासाथी विरोधात सुरू असलेल्या लढाईत तालुक्यातील आरोग्य कर्मचारी,पोलीस या प्रमाणे आपले पत्रकार बांधवही अत्यंत महत्वाची भुमिका बजावत आहेत ,कोरोणा माहासाथी मुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीला अत्यंत निधड्या छातीने पत्रकार बांधव समोर जात आहेत आणि वरून वृतांकानाचे काम सातत्याने करत आहेत त्यांच्यामुळे या कठीण काळात तालुक्यातील ठिकाणाची वास्तु स्थिती आपल्या वर्तमान पत्राच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचवत आहेत तेव्हा सर्व पत्रकार बांधव यांना राज्याकडून येणारी लस आरोग्य विभागाला प्राप्त होताच त्यांना आवाहन करून देण्यात यावे त्याच बरोबर आज पण भीतीपोटी पहिला डोस अनेक नागरिकांनी घेतला नाही त्यासाठी योग्य त्या उपाययोजना तसेच जनजागृती करुन पहिला डोस उपलब्ध करून आवश्यकतेनुसार संबंधितांना देण्यात यावा .पत्रकार बांधव हा तालुक्यातील महत्त्वाचा घटक असून त्यांना फ्रन्टलाइन वर्कर्स यादीमध्ये समाविष्ट करून व वेळच्या सर्व सुविधा सुविधा देण्यात याव्यात आणि पत्रकार यांचे लसीकरण करण्यासाठी आपण तालुका त्यावरील त्यांच्या संघटनांना विश्वासात घ्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे हदगाव तहसीलदार यांच्याकडे बालाजी पाटील कऱ्हाळे यांनी केली आहे .
No comments:
Post a Comment