जागतिक पर्यावरण दिन व मुलाचा वाढदिवस वृक्ष देवून साजरा
हदगाव (प्रतिनिधी )- उंचाडा ता.हदगाव येथिल समाजसेवक तथा प्रगतीशील शेतकरी शंकरराव चव्हाण यांनी सातत्याने समाजउपयोगी कार्य केलेले आहे.त्यांनी यापूर्वी उंचाडा येथिल छत्रपती शिवाजी पुतळ्याच्या आवारात वृक्षारोपण पुढाकार घेवून लावलेली सर्व झाडे मोठ्या परिश्रमातून जगवलेली आहेत.याच प्रेरणेतून त्यांचे चिंरजीव हर्षवर्धन यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पध्दीतीने करत खर्चाची बचत करुन व जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज मनाठा पोलिस स्टेशन येथिल येपीआय विनोद चव्हाण,धनाजी मारकवाड, पवार, बालाजी पाटील, शिवाजी पंतगे, पांडूरंग शिंदे,बालाजी चव्हाण यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करुन समाजात नाविन्यपुर्ण उपक्रम राबवला आहे.
No comments:
Post a Comment