जगापुर चेंडकापुर येथे उपआयुक्त व उपजिल्हाधिकारी यांनी दिली भेट
हदगाव ( प्रतिनिधी) - कोरोना आजाराने सर्वच खेडोपाडी थैमान घातले होते.पण काही गावात आतापर्यंत एकही रुग्ण आढळले नाहीत असे काही गाव आहेत. त्या गावात भेट देऊन त्यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी सह्यायक उप आयुक्त कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी शरद पुंडलिक, हदगाव, माहुर ,किनवट तालुक्यातील गावांचा दौरा केला.त्यामध्ये हदगाव तालुक्यातील जगापुर चेंडकापुर येथे भेट दिली.
गुरुवारी सकाळी दहा वाजता हदगाव तालुक्यात हदगाव वांरगा रोडवरील असलेल्या जगापुर येथे सर्व प्रथम भेट देऊन नंतर चेंडकापुर येथे भेट दिली. गावातील जिल्हा परिषद शाळेतील आवारात गावकऱ्यांच्या वतीने अधिकां-याचा छोटेखानी सत्कार केला. नंतर गावकऱ्यांसोबत चर्चा करून कोरोना काळात केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.व गावकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेत पुढे रवाना झाले.
यावेळी उप आयुक्त कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी शरद मंडलिक, प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार जिवराज डापकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ कदम,बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ एस एम मानसपुरे, मंडळ अधिकारी चेंडकापुर येथे संरपंच बालाजी थोटे , तलाठी बि.यु.ईप्पर , ग्रामसेवक सचीन माने, शिक्षक दस्तुरकर गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.तर जगापुर येथे संरपंच भिसे ताई, ग्रामसेवक कुणाल मांजरमकर तलाठी नागलमे मॅडम गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment