हदगांव तहसीलदारांच्या पत्राला कर्मचारी दाखवतात ठेंगा..
मुजोर मंडळ अधिकारी व तलाठी यांना कामाची
अॅलर्जी
हदगाव (प्रतिनीधी) — हदगाव तालुक्यातील मौजे दगडवाडी शिवारात हदगाव-हिमायतनगर मेन रोड लगत सर्वे नंबर ४४/२ मुळमालक जितेद्रसिंह दांडे यांच्या जागेत दगड उत्खनन,ब्लास्टिंग संदर्भातील चौकशी आणि कारवाईचे आदेश कर्तव्यदक्ष तहसिलदार जिवराज डापकर यांच्या वतीने मंडळ अधिकारी व तलाठी यांना देण्यात आले होते.मात्र आद्याप २० दिवसानंतरही कोणतीच प्रतिक्रीया दिलेल्या पत्रावर मंडळ अधिकारी यांनी कारवाई केली नसल्याचे दिसून येते.
या संदर्भात सविस्तर वृत्त असे की,तालुक्यातील मौजे दगडवाडी येथे के.टी.आय.एल.(KTIL) कंन्सट्रक्शन अंतर्गत ब्लास्टिंग करून दगड अवैध उत्खनन करून मर्यादे बाहेर खोदकाम झाले अशी तक्रार वाळकी येथील अर्जदार धर्मराज गायकवाड (पत्रकार) यांनी २२ मार्च रोजी तहसीलदार यांच्याकडे लेखी स्वरूपात देण्यात आली होती.त्या अनुषंगाने तहसीलदार यांनी सुद्धा आर्जाची दखल घेत संबधित मंडळ अधिकारी व हरडफ येथील तलाठी यांना दिनांक १० मे रोजी ३ दिवसाच्या आत जायमोक्यावर जाऊन चौकशी करण्याचे व आवश्यक ती कारवाई करण्यासाठीचे आदेश दिले होते.याशिवाय संबधित तक्रारदार धर्मराज गायकवाड यांना संपर्क साधुन उत्तर देऊन कार्यालयास अनुपालन सादर करण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले होते.पंरतु तहसीलदार यांनी आदेशित करुन सुद्धा बर्याच दिवसानंतर ही संबधित मुजोर मंडळ अधिकारी व तलाठी यांनी अद्याप कोणतीच कारवाई केलेली दिसुन येत नाही.त्यामुळे तहसीलदार यांच्या पत्राचा कोणताच परिणाम या मुजोर अधिकार्यांवर झालेला दिसुन येत नाही.तहसीलदार यांनी करावाईचे पत्र काढून सुद्धा कर्मचारी मात्र काम करण्यासाठी तयार नाहीत यावरून कुठे तरी डाळ शिजते आहे.हे मात्र नक्की.तहसिलदार यांनी जातीने लक्ष देऊन पाहणे गरजेचे आहे.संबंधित तक्रारदार गायकवाड यांनी आदेशित कालावधीनंतर संबधित अधिकारी यांच्याशी अनेकदा संपर्क करून कारवाई संदर्भात तकादा लावला असता त्यांनी 'उद्या येऊ,परवा येऊ' असे सांगून चाल ढकलपणा करत असल्याचे तक्रारदार यांनी सांगितले.अश्या प्रकारे फक्त ठेंगा दाखविण्याचे काम संबंधित अधिकारी करित आहेत.अवैध उत्खनन रोखण्यासाठी प्रशासनाकडून मोठे पावले उचलली जात आहेत.परंतु संबधित अधिकारी यांच्याकडून कारवाई करण्याऐवजी अभय देण्याचेच काम तर होत नाहीना ? अशी शंका तक्रारदार यांना निर्माण झाली आहे.तरी संबधित मंडळ अधिकारी व तलाठी यांनी लवकरात लवकर जायमोक्यावर जाऊन तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करून पुढील योग्य कारवाई करावी अशी अपेक्षा तक्रारदार धर्मराज गायकवाड यांनी दिली.
No comments:
Post a Comment