तालुका प्रतिनिधी ( सचिन शिंदे ) - तामसा शहरात बऱ्याच प्रमाणावर अवैध धंदे चालू आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने तामसा शहर जिल्ह्यात मोठे शहर म्हणून ओळखले जाते. येथील बाजारपेठ देखील खूप मोठी आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर मजूर , कामगार व इतरही लहान-मोठे व्यवसायिक आहेत .हा वर्ग नेहमीच मटका जुगार अशा गोष्टींकडे आकर्षिला जात असतो. हाच प्रकार शहरात मोठ्या प्रमाणात आज घडीला दिसुन येत आहे. ज्याप्रमाणे शहरात व्यवसाय व व्यापारात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते, जणू काही ठिक त्याचप्रमाणे अवैध धंद्या मध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. असे जाणकार लोकांकडून बोलले जात आहे. यावर वेळीच प्रतिबंध करणे आवश्यक असते मात्र या बाबींकडे प्रशासन व शहरातील ग्रामपंचायत जाणून बुजून लक्ष देत नाही अशी चर्चा शहरात नेहमीच होत आहे . कारण अवैध धंदेवाल्यांचे व प्रशासन यांचे साटेलोटे आहे , या अशा लोकांना अवैध धंदेवाल्या कडून आर्थिक फायदा नेहमीच ' हप्ते ' स्वरूपात मिळतो त्यामुळे हे लोक अशा बाबींकडे दुर्लक्ष नेहमीच करतात अशी बाजारपेठेत कुजबुज चालू असते. आज घडीला कोरोना सारख्या महामारीत सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. पण या परिस्थितीत सुद्धा तामसा शहरात " मटका " मोठ्या प्रमाणात , मोठ्या तेजीत खुलेआम चालू आहे. मटका बहाद्दरांना कोणाचीही भीती वाटत नाही कारण ते सर्वांना हात बांधणी करून हे धंदे करतात असे त्यांचे म्हणणे नेहमीच ऐकायला मिळत असते ,असे लोक बोलत असतात. एवढी हिम्मत अवैध धंदे वाल्यांकडे निर्माण कशी होत आहे ? याला जबाबदार कोण आहे ? हे मात्र खूप मोठे नवलच म्हणावे लागेल . दररोज राजरोसपणे खुलेआम कशालाही न जुमानता मटका चालवला जात आहे आणि याकडे ज्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे ते मुद्दाम लक्ष देत नाहीत याचा काय अर्थ समजावा ? नेमके पाणी कुठे- कुठे मुरत आहे ? हे कळणे अवघड आहे. जे आर्थिक स्वरुपात ' हफ्ते ' घेणे - देणे चालू असण्याची चर्चा चालू आहे ती खरीच आहे , असे समजावे का ? असे असेल तर सामान्यांना पद्धतशीरपणे लुटले जात आहे यात शंका नाही . " आओ चोरों बांधे भारा , आधा तुम्हारा आधा हमारा " याप्रमाणे जणुकाही बिनधास्तपणे लुट चालू आहे ,असे म्हणणे वावगे ठरणार नाही. तामसा शहरा सारख्या मोठ्या बाजारपेठ असणाऱ्या ठिकाणी अशी खुलेआम अवैध धंदे चालू असने म्हणजे प्रशासकीय अधिकारी या भागासाठी आहेत की नाही हा प्रश्न देखील निर्माण होतो . तामसा शहराच्या नजीकच्या ग्रामीण भागात देखील हा " मटका " तामसा शहरातूनच चालवला जात आहे , अशी पण चर्चा होत आहे. याचा अर्थ असा होतो , की यामागे अशा लोकांना पाठीशी घालणारे बडबडे लोकच म्हणजेच पुढारी असो वा प्रशासकीय अधिकारी हेच लोक असावेत . कारण तामसा पोलीस स्टेशन पासून काही पावलांवरच मटक्याचा अड्डा चालवला जातो, तोही बिनधास्तपणे . या अशा साटेलोटे पणामुळे अनेक तरुण बरबाद होतांना दिसत आहेत. अशा लुटारुंच्या फाश्यात अडकुन तरूण वर्ग आर्थिक स्वरुपाने बळी पडत आहेत. त्यामुळे शहरात अनेक तरुण कर्जबाजारी होत आहेत.असच चालू राहील तर अनेक कुटुंबे अर्थिक संकटात येतील. यामुळे कोणत्याही वेळी एखादा आत्महत्ये सारखा अनर्थ प्रकार घडू शकने मोठी बाब नाही , याकडे लक्ष न देणे म्हणजे एखाद्याचा सुखी संसार उद्धवस्त होतांना पाहत बसने असा अर्थ होतो .
शहरातील काही तरुणांचे तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचे असेही मत आहे , की तामसा शहराचे तरुण सरपंच साहेब श्री बाजीराव महाजन यांनी स्वतः या गोष्टीकडे लक्ष घालून ग्रामपंचायत मार्फत यावर बंदी आणावी अशी आशा सरपंच साहेबांकडून युवा वर्ग व सामाजिक कार्यकर्ते बाळगत आहेत. सरपंच साहेब याकडे लक्ष घालून तामसा शहरात " मटका " बंद करतील अशी इच्छा शहारातील जनसामान्य व्यक्त करत आहेत. खरंच तामसा शहरात मटका बंद होईल का?असा चमत्कार तामसा शहरात घडुन येईल का ? हे येत्या काळात समजेलच.
No comments:
Post a Comment