दहावी परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे नाव, जन्म तारीख, विषय व तत्सम माहितीमधील दुरुस्त्यांबाबत शिक्षण मंडळाचे आवाहन
नांदेड (जिमाका) :- यावर्षी दहावी परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मंडळाच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिली नाहीत. मात्र सुधारित मूल्यमापन पद्धतीनुसार विद्यार्थीनिहाय गुणदान करण्यासाठी विद्यार्थ्यांचे नाव, बैठक क्रमांक व अनुषंगिक तपशील माध्यमिक शाळांना उपलब्ध करुन दिलेला आहे. या तपशीलामधील विषय / माध्यम, फोटो, विद्यार्थ्यांची स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख, जन्मस्थान, इतर तत्सम दुरुस्त्या असल्यास याबाबत संबंधित शाळांनी प्रचलित पद्धतीप्रमाणे संबंधित विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधित विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक व सर्व माध्यमिक शाळा यांनी आपल्या स्तरावर सुचित करावे. सर्व विभागीय मंडळांनी यासंदर्भातील दुरुस्त्या विभागीय मंडळातील / निर्धारित गणकयंत्र विभागामार्फत करुन राज्य मंडळाने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार राज्य मंडळाच्या गणकयंत्र विभागाकडे पाठवाव्यात. या दुरुस्तीबाबत सर्व माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक, विद्यार्थी, शिक्षक, पालक व इतर संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment