माहूरनगर पंचायततीचा 51कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर.
माहूर ( प्रतिनिधी) नगर पंचायतीच्या सभागृहात दिनांक 28 फेबूरवारी रोजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या अध्यक्षतेखाली,उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, तहसिलदार तथा मुख्याधिकारी किशोर यादव, कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी यांच्या प्रमूख उपस्थितीत विषेश सभा संपन्न झालीया सभेमध्ये सन 2022-23 चा 515777410 एक्कावन कोटी सत्तावन्न लाख सत्याहत्तर हजार चारशे दहारुपये एवढ्या रककमेचा रक्कम 1121551 रुपये शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.
28 फेबूरवारी 2022रोजी नगर पंचायतीच्या सभागृहात पार पडलेल्या अर्थसंकल्पीय सभेत कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले ज्यात नगर पंचायत दर करापासून 17580000एक कोटी पंच्याहत्तर लाख अंशी हजार रूपये,विशेष वसूलीतून 4400000चौरेचाळीस लाख रुपये, महसुली उत्पनातून 372778000रूपये शासनाकडून मिळणाऱ्या अनूदानापोटी398250000रुपये संकीर्ण वसुली व ईतर दलीत वस्ती अनूदानापोटी 7911106 व ईतर 5092000 अशा प्रारंभिक शिलकीसह 516898961 रूपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला .
सामान्य प्रशासन वसुली विभागासाठी14195000रूपये सार्वजनीक सुरक्षेसाठी 29925000रुपये,रस्ते, नाली, सभाग्रुह बांधकामव आरोग्य सेवेसाठी 392448000रुपये ग्रंथालय 721100रुपये,दलीत वस्तीतील कामे व ईतर 49800000रूपये खर्चाची तरतूद करण्यात आली असून 1121551शिलकीसह अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
यावेळी अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा करण्यात आली नगराध्यक्ष फिरोज दोसानी, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, तहसिलदार तथा मुख्याधिकारी किशोर यादव, यांचेसह उपस्थित सर्व नगरसेवक सहभागी झाले होते यावेळी न, पंचायतचे स्थापत्य अभियंता प्रतिक नाईक,, विजय शिंदे,संदीप थोरात सुरेंद्र पांडे याचे सह कर्मचारी उपस्थित होते शेवटी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी सर्वांचे आभार मानले.