पाऊस पडावा म्हणून शेतकऱ्यांचे गणपतीला साकडे.....
सचिन शिंदे तामसेकर
तामसा (प्रतिनिधी) - दिनांक ६ जुलै रोज मंगळवार या दिवशी तामसा येथे शेतकऱ्यांनी पाऊस पडावा म्हणून गणपती देवतेला जलाभिषेक व महाप्रसाद करून विनवणी केली .याकरता येथील शेतकऱ्यांनी वरुणराजा चांगल्या प्रकारे लवकरात लवकर बरसावा म्हणून गावातील शेतकरी बांधवांनी तामसा जुना गावात बालाजी मंदिर येथील गणपती राया ला साकडे घातले. सकाळी अनेक शेतकरी बांधवांनी जलाभिषेक स्वरुपात अभिषेक करून विधिवत पूजाअर्चा केली व पाऊस लवकर पडू दे रे देवा अशी विनवणी गणपती बाप्पाला केली. त्यानंतर सायंकाळी महाप्रसादाचे वाटप सुद्धा शेतकरी बांधवांनी केले .हा कार्यक्रम तामसा जुना गावातील शेतकरी पंडितराव कोटगिरवार , दिगंबर पिन्नलवार , संजय कोरडे तसेच त्यांच्यासोबत अनेक शेतकऱ्यांनी मिळून मिसळून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्व शेतकरी बांधव आज घडीला पावसासाठी आतुरतेने वाट बघून आहे.
पाऊस नाही पडला तर आपल्या शेतातील पिक वाया जाईल व दुबार पेरणी करिता आपल्याला दुसरे आर्थिक नियोजन लावावं लागेल. अशाप्रकारे आपले जास्तीत जास्त आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे लवकरच पाऊस पडला पाहिजे .या आशेने या भागातील सर्वच शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकरी मोठ्या आतुरतेने पावसाची वाट बघत आहेत. वरून रजा आमच्यावर रुसला की काय असे सुद्धा विचार काही शेतकऱ्यांच्या मनात येत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मनोभावे जलाभिषेक करून व महाप्रसादाचे वाटप करून गणपती देवाला विनवणी केली आहे.यावेळी ओंकार कोडगिरवार , हरण तसेच युवा शेतकरी मंडळींनी याकार्यात परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment