गॅस, पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
केंद्र सरकारने गॅस, पेट्रोल किंमती कमी कराव्यात - वसंतराव देशमुख यांची शासनाकडे मागणी
हदगाव (प्रतिनिधी)- केंद्रातील भाजपा सरकारने पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमती प्रचंड वाढविलेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाल्यामुळे या भाववाढीच्या निषेधार्थ नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने नांदेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या नेतृत्वाखाली हदगाव शहरात येथे दि.०७ जुलै रोजी मोदी सरकार विरूध्द प्रचंड घोषणेबाजी देत मोदी सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करून तीव्र निषेध करण्यात आला आहे. युपीए सरकारच्या काळामध्ये इंधनाच्या किंमती कमी होत्या आता त्या किंमती दुप्पटीने वाढल्या आहेत. या पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅसच्या किंमती कमी कराव्यात असे मनोगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हदगाव वसंतराव देशमुख यांनी येथे व्यक्त केले.
केंद्र सरकारने गॅस, पेट्रोल-डिझेल या इंधनाच्या वस्तूमध्ये प्रचंड वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांत या भाव वाढीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष ना.जयंत पाटील यांच्या आदेशानुसार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष नांदेड हरिहरराव भोसीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हदगाव शहरामध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करतांना हदगाव तालुकाध्यक्ष वसंतराव देशमुख साहेब म्हणाले की, मागील युपीए सरकारच्या काळात गॅस प्रति सिलेंडर 400 रूपये होता आज त्याचे भाव दुप्पट आहे. तसेच पेट्रोल 70 रूपये होते ते आता 107 रूपये प्रति लिटर झाले. डिझेल 50 रू.प्रति लिटर होते ते 87 रू.प्रति लिटर झाले. तसेच इतर खाद्य पदार्थाचे तेल, दाळ व कडधान्याचे भाव प्रचंड वाढले आहे. सर्वसामान्य जनता महागाईच्या चटक्याने होरपळून निघत आहे. केंद्र सरकारने ही भाववाढ त्वरीत मागे घ्यावी,यावर नियंत्रण आणावे असे म्हणत तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हदगाव वसंतराव देशमुख साहेब यांनी केंद्र सरकारच्या धोरणाचा तीव्र निषेध केला. इंधनाच्या किंमती कमी कराव्यात या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकार्यां मार्फत प्रधानमंत्री मोदी यांना पाठविण्यात आले.
या आंदोलनात कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्यांनी मोदी सरकार विरूध्द प्रचंड घोषणेबाजी दिली व तीव्र भावना मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी तालुका अध्यक्ष वसंतराव देशमुख, डॉ.देवराव पाटील बाभळीकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष, अभिजित रुद्र कंठवार शहराध्यक्ष ,फेरोजखान मं अली खान शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अमोल कदम राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष, प्रा.राजेश राऊत सर अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग हदगाव , राजु पाटील कदम माजी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी,निहाल खान पटेल शहर उपाध्यक्ष,प्रशांत सिंगनवाड शहर सचिव , सुनील मगर शहर सरचिटणीस , फयाज खान अहेमद खान शहर कार्याध्यक्ष , देवा पाटील मार्लेगावकर तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मिडिया,शुभम कदम तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment