लावलेल्या वृक्षाचे संगोपन करा - वर्षा ठाकुर (मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड)
हदगाव (प्रतिनिधी ) - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर बुधवारी सात रोजी माहुर दौऱ्यावर जात असताना हदगाव तालुक्यात सकाळी सात वाजता मनाठा पाटी येथील आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात मियावाकी घनवन पध्दतीच्या उपक्रमाचे त्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मनाठा येथील शाळेच्या प्रांगणात मार्गदर्शन करताना म्हणाले की सध्याच्या परिस्थितीत झालेली वृक्ष तोड कोरोना काळात मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.कारण की आक्सीजन कमी प्रमाणात मिळत असल्याने अनेकांना आपला जीव गमावावा लागला.भविष्यात यापैक्षा बिकट परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी शासन वृक्ष लागवड करण्यासाठी मियावाकी घनवन सह विविध माध्यमातून वृक्ष लागवड हाती घेतली असून केवळ वृक्षारोपण करून मोकळे न होता त्यांच्या संगोपनाची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीने घेण्याची गरज आहे.भविष्याच्या दृष्टीने प्रत्येक व्यक्ती एक झाड ही जबाबदारी समजून वृक्ष लागवड करुन त्यांचे संगोपन हि काळाची गरज आहे
प्रत्येक व्यक्तीने एक व्यक्ती एक झाड ही जबाबदारी घेतले पाहिजे यावेळी सांगितले.
सकाळी सात वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी येणार असल्याचे एक दिवसांपूर्वी कळाले असल्याने नियोजित बरडशेवाळा मनाठा सह हदगाव तालुक्यात दौऱ्यात गावातील सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती. लावलेली वृक्ष वाचली पाहिजे यासाठी काळजी घ्या मी नंतर नक्कीच भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधिर ठोंबरे, जिल्हा शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, माधवराव सलगर, हदगावचे गटविकास अधिकारी केशव गट्टापोड, बालविकास प्रकल्प अधिकारी उमेश मुदखेडे, उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे , हदगावचे गटशिक्षणाधिकारी किशन फोले, गंजेवार, मुख्य अभियंता भोजराज , डॉ. झिने, हदगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कदम, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव सावतकर, मनाठा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसपुरे, डॉ. काळे , मनाठा, सावरगाव, शिबदरा, बरडशेवाळा येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच पुरुषोत्तम बजाज, हिमांशु इंगोले, इस्माईल पिंजारी, पुरभा दहिभाते व गावातील प्रतीष्ठीत नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment