Tuesday, 6 July 2021

दत्ता महाराज यांची पुण्यतिथी घरीच साजरी करावी द.भ.प. साईनाथ महाराज बितनाळकर यांचे आवाहन

दत्ता महाराज यांची पुण्यतिथी घरीच साजरी करावी 
द.भ.प. साईनाथ महाराज बितनाळकर यांचे आवाहन
माहूर (प्रतिनिधी) - माहूर येथील श्री आनंद दत्त धाम आश्रम उर्फ वसमतकर महाराज मठांचे गुरु आनंदवासी दत्ता महाराज बितनाळकर यांच्या पुण्यतिथी निमित्य आनंद दत्त धाम आश्रम येथे प्रतीवर्षी दि. ८ जुलै रोजी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते.मात्र यावर्षी कोरोना महामारीच्या अनुषंगाने सर्व धार्मिक स्थळे प्रशासनाच्या सुचनेनुसार बंद असून गर्दीच्या जमावा बाबत निर्बंध असल्याने यावर्षी दत्ता महाराज यांची पुण्यतीथी साध्या पद्धतीने करण्याचे ठरविण्यात आले आहे. 
        भक्तांनी आनंद दत्त धाम आश्रम माहूर येथे गर्दी न करता आपआपल्या घरीच पुण्यतिथी साजरी करावी. आनंदवासी दत्ता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्य भक्तांनी आपआपल्या गावात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, व्यसनमुक्तीचे संकल्प, गरजूना अन्नधान्याची मदत,अन्नदान, बचतीचे मार्ग व जीवाच्या उद्धाराचे विविध संकल्प करून पुण्यतिथी साजरी करण्यात यावी असे आवाहन साईनाथ महाराज बितनाळकर यांनी केले आहे

No comments:

Post a Comment