Tuesday, 22 June 2021

परिवहन कार्यालयाच्या ऑनलाईन प्रणालीचा गैरवापर केल्यास होणार कारवाई

 परिवहन कार्यालयाच्या ऑनलाईन प्रणालीचा

गैरवापर केल्यास होणार कारवाई

 

नांदेड (जिमाका)  :- परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी  परवाना ऑनलाईन द्धतीने देण्यात येत आहे. या लोकभिमुख सोयी-सुविधांचा गैरवापर होऊ नये यासाठी या प्रणाली आवश्यक त्या सुधारणा करण्यात येत आहेत. या ऑनलाईन सुविधांचा गैरवापर करणारा अर्जदार, संबंधित मध्यस्थ, अनधिकृत व्यक्तीवर आवश्यक ती पोलीस कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यावतीने केली जाणार आहे. या प्रकरणी दोषी ठरलेला अर्जदार हा मोटार वाहन कायदा कलम 19 (इ) अन्वये अनुज्ञप्ती धारण करण्यास कायमस्वरुपी अपात्र ठरेल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.

 

नागरिकांच्या सोयीसाठी  तसेच कोव्हिड -19 पार्श्वभूमीवर परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी  शिकाऊ अनुज्ञप्ती परवाना ऑनलाईन पध्दतीने देण्याची प्रणाली राज्य शासनाने नुकतीच सुरू केली आहे. या कार्यप्रणालीद्वारे राज्यातील काही ठिकाणी अनुज्ञप्ती चाचणी ही उमेदवाराऐवजी इतर अनधिकृत व्यक्ती देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

 

वास्तविक केंद्र मोटार वाहन नियम 11 अन्वये, शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अर्ज करताना उमेदवारास केंद्र शासनाने विहि केलेली परिक्षा देणे अनिवार्य आहे. या मागचा उद्देश संबंधित अर्जदारास वाहतूक नियमांचे चिन्हांचे  वाहन चालकाच्या जबाबदाऱ्यांचे महत्व ही माहिती असणे आवश्यक आहे. यामुळे जबाबदार वाहन चालक निर्माण होण्यास मदत होते. या प्रणालीचा वापर करतांना पालकांनी त्यांच्या पाल्यास या परिक्षेचे महत्त्व पटवून दयावे तसेच प्रणालीचा गैरवापर होणार नाही यांची जाणीव करुन देणे आवश्यक आहे.

 नव्याने सुरु झालेल्या प्रणालीवर राज्यात जवळपास 16 हजार 920 शिकाऊ अनुज्ञप्ती तर सुमारे 400 नवीन वाहन नोंदणी करण्यात आली आहे.

 त्याचबरोबर जी महा ई-सेवा केंद्र, मोटार ड्रायव्हिंग स्कूल,  इंटरनेट कॅफे या सुविधेचा गैरवापर करतील अशा संस्थे विरुद्ध पोलीस कारवाई करुन महा ई-सेवा केंद्राबाबत जिल्हाधिकारी, मोटार ड्रायव्हिंग स्कूलबाबत संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी  इंटरनेट कॅफेविरुध्द पोलीस विभाग (सायबर सेल) यांना आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. नागरिकांनी असे गैरप्रकार निदर्शनास आल्यास त्याबाबत स्थानिक प्रादेशिक  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी. या प्रणालीमध्य नागरिकांना येणाऱ्या काही अडचणी जसे आधारकार्ड क्रमांक  त्यावरील माहिती, फोटोग्राफ हे सारथी प्रणालवर चुकीच्या द्धतीने दिसत असल्यास अथवा प्रदर्शित होत नसल्यास इत्यादी बाबी या राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र (एनआयसी) दिल्ली  पुणे यांच्याशी समन्वय साधुन त्यामध्ये सुधारणा करण्यात ेणार आहेत असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यात 15 व्यक्ती कोरोना बाधित ; दोघांचा मृत्यू तर 28 कोरोना बाधित झाले बरे

 नांदेड जिल्ह्यात 15 व्यक्ती कोरोना बाधित

दोघांचा मृत्यू तर  28 कोरोना बाधित झाले बरे  

 

नांदेड (जिमाका)  :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 249 अहवालापैकी  15 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 7 तर अँटिजेन तपासणीद्वारे 8 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 161 एवढी झाली असून यातील 88 हजार 453 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 224 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 आजच्या अहवालानुसार 21 जून 2021 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे लोहा तालुक्यातील लिंबोटी येथील 64 वर्षाच्या महिलेचा तर अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील 90 वर्षाच्या एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 903 एवढी आहे.

 आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, हिंगोली 1लोहा 1राजस्थान 1मुदखेड 1मुखेड 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 2अर्धापूर 2बिलोली 3मुखेड 1 असे एकूण 15 बाधित आढळले.

 आज जिल्ह्यातील 28 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 1,  मुखेड कोविड रुग्णालय 1,  जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 1बिलोली तालुक्यातर्गत 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 18, खाजगी रुग्णालय 6 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 आज 224 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  9, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 24,  मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर  1, किनवट कोविड रुग्णालय 5,देगलूर कोविड रुग्णालय 4,  हदगाव कोविड रुग्णालय 1,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 119, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण 49, खाजगी रुग्णालय 12 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 123, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 127 खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 92 हजार 309

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 89 हजार 642

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 161

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 453

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 903

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.02 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-138

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 224

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2           

दहावी परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे नाव, जन्म तारीख, विषय व तत्सम माहितीमधील दुरुस्त्यांबाबत शिक्षण मंडळाचे आवाहन

 दहावी परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे नाव, जन्म तारीख, विषय व तत्सम माहितीमधील दुरुस्त्यांबाबत शिक्षण मंडळाचे आवाहन

 

नांदेड (जिमाका)  :-  यावर्षी दहावी परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मंडळाच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिली नाहीत. मात्र सुधारित मूल्यमापन पद्धतीनुसार विद्यार्थीनिहाय गुणदान करण्यासाठी विद्यार्थ्यांचे नाव, बैठक क्रमांक व अनुषंगिक तपशील माध्यमिक शाळांना उपलब्ध करुन दिलेला आहे. या तपशीलामधील विषय / माध्यम, फोटो, विद्यार्थ्यांची स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख, जन्मस्थान, इतर तत्सम दुरुस्त्या असल्यास याबाबत संबंधित शाळांनी प्रचलित पद्धतीप्रमाणे संबंधित विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधित विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक व सर्व माध्यमिक शाळा यांनी आपल्या स्तरावर सुचित करावे. सर्व विभागीय मंडळांनी यासंदर्भातील दुरुस्त्या विभागीय मंडळातील / निर्धारित गणकयंत्र विभागामार्फत करुन राज्य मंडळाने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार राज्य मंडळाच्या गणकयंत्र विभागाकडे पाठवाव्यात. या दुरुस्तीबाबत सर्व माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक, विद्यार्थी, शिक्षक, पालक व इतर संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

Friday, 11 June 2021

हदगाव शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई करा. मनसे तालुकाध्यक्ष बालाजी कराळे पाटील यांची शासनाकडे मागणी

*हदगाव शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई करा. मनसे तालुकाध्यक्ष बालाजी कराळे पाटील यांची शासनाकडे मागणी
हदगाव (प्रतिनिधी) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील कऱ्हाळे यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन
 हदगाव शहरात झालेल्या  पहिल्याच पावसाने नाल्या मधील घाण रस्त्यांवर आल्यामुळे नगरपरिषदेचा भोंगळ कारभार उघड केला आहे.संबधीत घनकचरा ठेकेदारावर हदगाव नगरपरिषदेचे नियंत्रण नसल्याचे दिसून येते व शहराच्या सुशोभीकरणसाठी केंद्र व राज्य सरकारकडून लाखो रुपयाचा निधी देवून सुध्दा शहरातील मुख्य रस्त्यावरील दुभाजक कित्येक वर्षापासून व्यवस्थित नाही त्यावर झाडे सुध्दा लावलेली दिसून येत नाहीत आणि वार्डा मध्ये कचरा नेण्यासाठी येणारी घंटागाडी 15 ते 20 दिवस आड करून येते सगळीकडे शहरात घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येत आहे घनकचरा ठेकेदार स्वतःची मनमानी चालवत आहे शहर वासियांच्या टॅक्समधून लाखो रुपयाची टेंडर देण्यात येते पण नागरिकांना त्या प्रकारची स्वचता सुविधा संबंधित ठेकेदार  पुरविण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यावर दंडात्मक कारवाई करावी व शहरातील सर्व नाल्या मधील गाळ काढून साफ सफाई करावी आणी कोविड 19 चा प्रादुर्भाव असताना प्रशासनाकडून कोविड 19 च्या तिसरी लाट येण्याचे संकेत देण्यात आले मात्र घनकचरा ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे शहरात घाणीचे चित्र दिसून येत असून शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची संभावना नाकारता येत नाही. किमान दोन वर्षापासून हदगाव येथील घनकचरा ठेकेदार अल्प मजूर व अल्प वाहन च्या सहाय्याने घनकचरा ठेकेदारी चालवित आहे यावर नगर परिषद कार्यालयाचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे घनकचरा ठेकेदार आपल्या मजूर दारांना कोणतीही सुरक्षा किट न देता त्यांचे जीवास खेळत आहे सदरील सफाई कामगार हे सीनियर सिटीजन असल्याने यांना कोरोना प्रदूभाव होण्याची दाट शक्यता आहे  तब्बल दहा वर्षापासून काँग्रेसच्या एका हाती सत्ता असताना सुद्धा नागरिकांना सुविधा पुरविण्यास सत्ताधारी व शिवसेना, भाजप नगरसेवक अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे शहराला सुंदर व जल शुद्धीकरणासाठी केंद्र व राज्य सरकार लाखो रूपये खर्च करूनही कवडीचाही फायदा नागरिकांना होत नाही आज हदगाव शहरातील रोड नाली लाईट च्या बाबतीत हादगाव शहर कोसो दूर असल्याचे दिसून येत आहे ज्या वस्तीमध्ये निधी तर खर्च झालेला आहे परंतु त्या वार्ड मध्ये कामे दर्जेदार न झाल्यामुळे पहिल्यापासून बत्तर परिस्थिती आज दिसून येते आगामी येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये हदगाव येथील जनता सत्ताधाऱ्यांना आणी बघ्यांची भूमिका घेणाऱ्या भाजप-शिवसेनेच्या नगरसेवकांना  त्यांची जागा आपल्या मतदानाच्या अधिकारातून दाखवतील असे ही बालाजी पाटील कऱ्हाळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

Thursday, 10 June 2021

जगापुर चेंडकापुर येथे उपआयुक्त व उपजिल्हाधिकारी यांनी दिली भेट

जगापुर चेंडकापुर येथे उपआयुक्त  व उपजिल्हाधिकारी  यांनी दिली भेट
 हदगाव ( प्रतिनिधी) - कोरोना आजाराने सर्वच खेडोपाडी थैमान घातले होते.पण काही गावात आतापर्यंत एकही रुग्ण आढळले नाहीत असे काही  गाव आहेत. त्या गावात भेट देऊन त्यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी सह्यायक उप आयुक्त कुलकर्णी,  उपजिल्हाधिकारी शरद पुंडलिक, हदगाव, माहुर ,किनवट तालुक्यातील गावांचा दौरा केला.त्यामध्ये हदगाव तालुक्यातील जगापुर चेंडकापुर येथे भेट दिली.
   गुरुवारी सकाळी दहा वाजता  हदगाव तालुक्यात हदगाव वांरगा रोडवरील असलेल्या जगापुर येथे सर्व प्रथम भेट देऊन नंतर चेंडकापुर येथे  भेट दिली. गावातील जिल्हा परिषद शाळेतील आवारात गावकऱ्यांच्या वतीने अधिकां-याचा छोटेखानी सत्कार केला. नंतर गावकऱ्यांसोबत चर्चा करून कोरोना काळात केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.व गावकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेत पुढे रवाना झाले.
यावेळी  उप आयुक्त कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी शरद मंडलिक, प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार जिवराज डापकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ कदम,बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ एस एम मानसपुरे, मंडळ अधिकारी चेंडकापुर येथे संरपंच बालाजी थोटे , तलाठी बि.यु.ईप्पर , ग्रामसेवक सचीन माने, शिक्षक दस्तुरकर गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.तर जगापुर येथे संरपंच भिसे ताई, ग्रामसेवक कुणाल मांजरमकर तलाठी नागलमे मॅडम गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Saturday, 5 June 2021

जागतिक पर्यावरण दिन व मुलाचा वाढदिवस वृक्ष देवून साजरा

जागतिक पर्यावरण दिन व मुलाचा वाढदिवस वृक्ष देवून साजरा
हदगाव (प्रतिनिधी )- उंचाडा ता.हदगाव येथिल समाजसेवक तथा प्रगतीशील शेतकरी शंकरराव चव्हाण यांनी सातत्याने समाजउपयोगी कार्य केलेले आहे.त्यांनी यापूर्वी उंचाडा येथिल छत्रपती शिवाजी पुतळ्याच्या आवारात  वृक्षारोपण पुढाकार घेवून लावलेली सर्व झाडे मोठ्या परिश्रमातून जगवलेली आहेत.याच प्रेरणेतून त्यांचे चिंरजीव हर्षवर्धन यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पध्दीतीने करत खर्चाची बचत करुन  व जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज  मनाठा पोलिस स्टेशन येथिल येपीआय विनोद चव्हाण,धनाजी मारकवाड, पवार, बालाजी पाटील, शिवाजी पंतगे, पांडूरंग शिंदे,बालाजी चव्हाण यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात  वृक्षारोपण करुन समाजात नाविन्यपुर्ण उपक्रम राबवला आहे.

हदगांव तहसीलदारांच्या पत्राला कर्मचारी दाखवतात ठेंगा..

हदगांव तहसीलदारांच्या पत्राला कर्मचारी दाखवतात ठेंगा..

मुजोर मंडळ अधिकारी व तलाठी यांना कामाची 
अ‍ॅलर्जी  
हदगाव (प्रतिनीधी) — हदगाव तालुक्यातील मौजे दगडवाडी शिवारात हदगाव-हिमायतनगर मेन रोड लगत सर्वे नंबर ४४/२ मुळमालक जितेद्रसिंह दांडे यांच्या जागेत दगड उत्खनन,ब्लास्टिंग संदर्भातील चौकशी आणि कारवाईचे आदेश कर्तव्यदक्ष तहसिलदार जिवराज डापकर यांच्या वतीने मंडळ अधिकारी व तलाठी यांना देण्यात आले होते.मात्र आद्याप २० दिवसानंतरही कोणतीच प्रतिक्रीया दिलेल्या पत्रावर मंडळ अधिकारी यांनी कारवाई केली नसल्याचे दिसून येते.
या संदर्भात सविस्तर वृत्त असे की,तालुक्यातील मौजे दगडवाडी येथे के.टी.आय.एल.(KTIL) कंन्सट्रक्शन अंतर्गत ब्लास्टिंग करून दगड अवैध उत्खनन करून मर्यादे बाहेर खोदकाम झाले अशी तक्रार वाळकी येथील अर्जदार धर्मराज गायकवाड (पत्रकार) यांनी २२ मार्च रोजी तहसीलदार यांच्याकडे लेखी स्वरूपात देण्यात आली होती.त्या अनुषंगाने तहसीलदार यांनी सुद्धा आर्जाची दखल घेत संबधित मंडळ अधिकारी व हरडफ येथील तलाठी यांना दिनांक १० मे रोजी ३ दिवसाच्या आत जायमोक्यावर जाऊन चौकशी करण्याचे व आवश्यक ती कारवाई करण्यासाठीचे आदेश दिले होते.याशिवाय संबधित तक्रारदार धर्मराज गायकवाड यांना संपर्क साधुन उत्तर देऊन कार्यालयास अनुपालन सादर करण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले होते.पंरतु तहसीलदार यांनी आदेशित करुन सुद्धा बर्‍याच  दिवसानंतर ही संबधित मुजोर मंडळ अधिकारी व  तलाठी यांनी अद्याप कोणतीच कारवाई केलेली दिसुन येत नाही.त्यामुळे तहसीलदार यांच्या पत्राचा कोणताच परिणाम या मुजोर अधिकार्‍यांवर झालेला दिसुन येत नाही.तहसीलदार यांनी करावाईचे पत्र काढून सुद्धा कर्मचारी मात्र काम करण्यासाठी तयार नाहीत यावरून कुठे तरी डाळ शिजते आहे.हे मात्र नक्की.तहसिलदार यांनी जातीने लक्ष देऊन पाहणे गरजेचे आहे.संबंधित तक्रारदार गायकवाड यांनी  आदेशित कालावधीनंतर संबधित अधिकारी यांच्याशी अनेकदा संपर्क करून कारवाई संदर्भात तकादा लावला असता त्यांनी 'उद्या येऊ,परवा येऊ'  असे सांगून चाल ढकलपणा करत असल्याचे तक्रारदार यांनी सांगितले.अश्या प्रकारे फक्त ठेंगा दाखविण्याचे काम संबंधित अधिकारी करित आहेत.अवैध उत्खनन रोखण्यासाठी प्रशासनाकडून मोठे पावले उचलली जात आहेत.परंतु संबधित अधिकारी यांच्याकडून कारवाई करण्याऐवजी अभय देण्याचेच काम तर होत नाहीना ? अशी शंका तक्रारदार यांना निर्माण झाली आहे.तरी संबधित मंडळ अधिकारी व तलाठी यांनी लवकरात लवकर जायमोक्यावर जाऊन तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करून पुढील योग्य कारवाई करावी अशी अपेक्षा तक्रारदार धर्मराज गायकवाड यांनी दिली.

Tuesday, 1 June 2021

जागतिक पर्यावरण दिनानिमित्‍त जिल्‍हयात वृक्ष लागवड मोहिम- सिईओ वर्षा ठाकूर

जागतिक पर्यावरण दिनानिमित्‍त जिल्‍हयात वृक्ष लागवड मोहिम- सिईओ वर्षा ठाकूर
 नांदेड (प्रतिनिधी ) - जागतिक पर्यावरण दिनानिमित्‍त दिनांक 5 जून रोजी नांदेड जिल्‍हयात वृक्ष लागवडीची मोहिम राबविण्‍यात येणार आहे. कोविडच्‍या पार्श्‍वभूमीवर नांदेड जिल्‍हयातील सर्व ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्‍य केंद्र, उपकेंद्र, विविध कार्यालयाच्‍या जागा व गावात दुतर्फा वृक्ष लागवड केली जाणार असल्‍याची माहिती नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिली आहे.
कोरोना महामारीच्‍या काळात रूग्‍णांना कृत्रिम प्राणवायूची गरज मोठया प्रमाणात जाणवली. या आपत्‍तीमधून प्राणवायूची मानवाला असलेली गरज ही प्रकर्षाने आधोरेखीत झाली. या बाबी विचारात घेता मोठया प्रमाणावर जिल्‍हयात वृक्ष लागवडीची मोहिम पावसाळी हंगामात हाती घेण्‍यात येणार आहे. गावातील प्रत्‍येक व्‍यक्‍तीने उपलब्‍ध मोकळया जागेत, शेतात, बांधावर, पडीक जमीनीवर, रस्‍ता दुतर्फा, नदी, नाल्‍याच्‍या काठावर वृक्ष लावगड करण्‍यात येणार आहे. या वृक्ष लागवडीच्‍या लोकचळवळीत नागरीकांनी सहभागी होण्‍याचे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
 या मोहिमे अतंर्गत प्रत्‍येक व्‍यक्‍तींने किमान 3 झाडे लावण्‍याचे आवाहन करण्‍यात येत आहे. प्रत्‍येक व्‍यक्‍ती 3 वृक्ष याप्रमाणे जिल्‍हा परिषदे अंतर्गत ग्रामीण भागात सुमारे 72 लाख 66 हजार 126 वृक्ष लागवडीचे उदिष्‍ट आहे. यासाठी तालुकास्‍तरावर गट विकास अधिकारी यांच्‍यास्‍तरावर नियोजन करण्‍यात आले आहे. या पावसाळयात हे उदिष्‍ट साध्‍य करण्‍यात येणार आहे. याशिवाय मियावाकी पध्‍दतीने गावातील मोकळया जागा, शासकीय कार्यालय परिसरात एक हजार प्‍लॉटमध्ये झाडे लावण्‍यात येणार आहेत. तरी तालुकास्‍तरावरील सर्व कार्यालय प्रमुखांनी वृक्ष लागवडीचे नियोजन करुन दिनांक 5 जून रोजी वृक्ष लागवडीचा शुभारंभ शासनाच्‍या कोवीड-19 सुचनांचे पालन करुन करण्‍यात यावे असे सुचित करण्‍यात आले आहे. या वृक्ष लागवडीच्‍या मोहिमेत लोकप्रतिनीधी, स्‍वयंसेवी संस्‍था, महिला बचत गट, युवक-युवती, अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेवून वृक्ष लागवडीची मोहिम यशस्‍वी करण्‍याचे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

हदगाव तालुक्यातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणुन घोषित करा - मनसे तालुका अध्यक्ष बालाजी पाटील कऱ्हाळे यांची शासनाकडे मागणी

हदगाव तालुक्यातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणुन घोषित करा - मनसे तालुका अध्यक्ष बालाजी पाटील कऱ्हाळे यांची शासनाकडे मागणी
प्रा. गजानन गिरी
हदगाव (प्रतिनिधी) - कोरूना माळी च्या काळामध्ये डॉक्टर्स  नर्स  पोलीस कर्मचारी  तसेच प्रशासन अधिकारी  यांनी ज्याप्रमाणे जबाबदाऱ्या पार पाडल्या  त्याचप्रमाणे हादगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांनी देखील आपले कर्तव्य बजावत  तालुक्यातील विविध गावातील परिस्थिती याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले  तेव्हा अशा पत्रकारांस फ्रंटलाईन वर्कर्स म्हणुन घोषित करून त्यांना त्या प्रकारच्या सुविधा देण्याची मागणी निवेदनाद्वारे हदगाव  मनसे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील कऱ्हाळे यांनी शासनाकडे केली आहे.
 सविस्तर माहिती अशी की, कोरोणा महासाथी विरोधात सुरू असलेल्या लढाईत तालुक्यातील आरोग्य कर्मचारी,पोलीस या प्रमाणे आपले पत्रकार बांधवही अत्यंत महत्वाची भुमिका बजावत आहेत ,कोरोणा माहासाथी मुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीला अत्यंत निधड्या छातीने पत्रकार बांधव समोर जात आहेत आणि वरून वृतांकानाचे काम सातत्याने करत आहेत त्यांच्यामुळे या कठीण काळात तालुक्यातील ठिकाणाची वास्तु स्थिती आपल्या वर्तमान पत्राच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचवत आहेत तेव्हा सर्व पत्रकार बांधव यांना राज्याकडून येणारी लस आरोग्य विभागाला प्राप्त होताच त्यांना आवाहन करून देण्यात यावे त्याच बरोबर आज पण भीतीपोटी पहिला डोस अनेक नागरिकांनी घेतला नाही त्यासाठी योग्य त्या उपाययोजना तसेच जनजागृती करुन पहिला डोस उपलब्ध करून आवश्‍यकतेनुसार संबंधितांना देण्यात यावा .पत्रकार बांधव हा तालुक्यातील महत्त्वाचा घटक असून त्यांना फ्रन्टलाइन वर्कर्स यादीमध्ये समाविष्ट करून व वेळच्या सर्व सुविधा सुविधा देण्यात याव्यात आणि पत्रकार यांचे लसीकरण करण्यासाठी आपण तालुका त्यावरील त्यांच्या संघटनांना विश्वासात घ्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे हदगाव तहसीलदार यांच्याकडे बालाजी पाटील कऱ्हाळे यांनी केली आहे .