श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्ममहोत्सव समितीच्यावतीने राणीसावरगाव येथील शाळेत बक्षीस वितरण समारंभ उत्साहात
नांदेड (प्रतिनिधी) - श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व घटकांना सोबत घेऊन साजरी करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य माधव जाधव यांनी सुचवलेल्या पद्धतीने नियोजन करून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला समस्त गावकार्यांच्या वतीने पूजन करून पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. यात सर्व तरुणांनी एकच गनवेश घालून गावातील उपस्थित सर्वांना फेटे बांधून मिर्वणुकीत शिवाजी महाराजांचे मावळे, ढोल ताशा पथक,लेझिम पथक, बँड पथक, घोडदळ व टाळ मृदूंग असलेले वारकरी घेऊन हजारोजनसमुदयाच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली.
तसेच शालेय विद्यार्थासाठी शिवचरित्रवार आधारित सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन केले होते. त्यात गावातील सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदवाला होता. या परीक्षेत सर्वाधिक बक्षीसे श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रायमरी इंग्लिश स्कुल व उच्च प्राथमिक-माध्यमिक विद्यालयाच्या सर्वाधिक नऊ विद्यार्थांनी प्रथम द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरचे दोन विद्यार्थी, जिल्हा परिषद विद्यालयाचे दोन विद्यार्थी, सवित्रीबाई फुले आश्रम शाळेचा एक विद्यार्थी व राजमाता जिजाऊ आश्रम शाळेच्या एक विद्यार्थांनी प्रथम द्वितीय क्रमांकाचे बक्षीसे मिळवले *ज्यात छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थिनीन पवार गीतांजली राजेभाऊ ही सर्वाधिक 84 गुण घेत प्रथम क्रमांक मिळवला तर*
एकून 3 गटात 15 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे त्यांना बक्षीस स्वरूपात छावा, संभाजी, ययाती, मृत्युंजय, पानिपत,आसूड असे विविध कादंबर्या बक्षीस म्हणाणून देण्यात आले त्याचे विवरण पुढील प्रमाणे.. (गट 1 ला - वर्ग 4,5,6)
प्रथम क्रमांक - कृष्णा राम डोणे (वर्ग 6 वा, सावित्रीबाई फुले प्राथमिक आश्रम शाळा) (मार्क 60)
प्रथम क्रमांक - प्रांजली रघुनाथ केंद्रे (वर्ग 6 वा, श्री छत्रपती शिवाजी प्रायमरी इंग्लिश स्कूल) (मार्क 60)
प्रथम क्रमांक - सृष्टी बापुराव वावरे (वर्ग 6 वा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालय) (मार्क 60)
प्रथम क्रमांक - ञिभुवन संगमेश्वर इरगुंडे (वर्ग 5 वा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालय) (मार्क 60)
द्वितीय क्रमांक - समर्थ बालाजी जाधव (वर्ग 5 वा, जि. प.प्र.शाळा) (मार्क 58)
द्वितीय क्रमांक- राणा गणेश मेकडे (वर्ग 6 वा, श्री छत्रपती शिवाजी प्रायमरी इंग्लिश स्कूल) (मार्क 58)
द्वितीय क्रमांक - संकेत तुकाराम कदम (वर्ग 6 वा, श्री छत्रपती शिवाजी प्रायमरी इंग्लिश स्कूल) (मार्क 58)
(गट 2 रा - वर्ग 7,8) प्रथम क्रमांक - पवार गीतांजली राजेंद्र (वर्ग 8 वा, श्री छत्रपती शिवाजी प्रायमरी इंग्लिश स्कूल) (मार्क 84) द्वितीय क्रमांक - प्रेरणा भारत जाधव (वर्ग 7 वा, श्री छत्रपती शिवाजी प्रायमरी इंग्लिश स्कूल) (मार्क 80) (गट 3 रा वर्ग - 9,10) प्रथम क्रमांक - प्रदीप अनुरथ भोसले (वर्ग 9 वा, राजमाता जिजाऊ आश्रम शाळा) (मार्क 74) द्वितीय क्रमांक - श्वेता बाळासाहेब कदम (वर्ग 9 वा, श्री छत्रपती शिवाजी प्रायमरी इंग्लिश स्कूल) (मार्क 68) द्वितीय क्रमांक - पुंडलीक राम धापसे (वर्ग 9 वा,श्री छत्रपती शिवाजी प्रायमरी इंग्लिश स्कूल) (मार्क 68) द्वितीय क्रमांक - गुडदे मधुकर हनुमंत (वर्ग 9 वा, श्री छत्रपती शिवाजी प्रायमरी इंग्लिश स्कूल) (मार्क 68) द्वितीय क्रमांक - देवानंद नागोराव जिलेवाड (वर्ग 10 वा, जि.प .प्र .शाळा)(मार्क 68) द्वितीय क्रमांक - प्रज्ञा बालाजी जाधव (वर्ग 9 वा,जि. प. प्र .शाळा) (मार्क 68) या पद्धतीने बक्षीस मिळवलेल्या विद्यार्थी व पालकांचा गौरव व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन जयंती मंडळाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय राणीसावरगाव येथे दिनांक 31मार्च 20222 गुरुवार रोजी केले होते.
या परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना बक्षिसाच्या स्वरूपात विविध कादंबर्या तसेच पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ.मोहन कुलकर्णी उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पीएसआय डोंगरे तसेच डॉ.सोळंके , डॉ.शिंदेसाहेब, डॉ.रेवनवार , डॉ.कांगणे , भिकाणे (म.पोलीस.) ई.मान्यवरांची उपस्थिती लाभली.या यशस्वी कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री छत्रपती शिवाजी उच्च प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्यँकट कदम व सहशिक्षिका शर्मदा मंगलगे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रायमरी इंग्लिश स्कुलचे प्रिन्सिपलं शेविंयार जोसेफ व माधमिकच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री गनाचार्य यांनी सहकार्य केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अजिंक्य माधव जाधव यांनी आभार व्यक्त केले.