Thursday, 30 June 2022

वीज पडून मृत्यू पावलेल्या शेतकर्यांचे कुटुंबियांना 4 लक्ष रुपये चा धनादेश सुपूर्द

वीज पडून मृत्यू पावलेल्या शेतकर्यांचे कुटुंबियांना 4 लक्ष रुपये चा धनादेश सुपूर्द
माहूर (.विनोद भारती)  - शेतातील भुईमुगाचे कुटार झाकण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू पावल्याची घटना दि 19 मे रोजी सकाळी 7: 30 वाजता  माहूर तालुक्यातील पालाईगुडा येथे घडली.किरण गेमसिंग जाधव वय 40 वर्षं असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.सदरील शेतकऱ्याच्या कुटुंबियांना 4 लक्ष रुपये चा धनादेश माहूर तहसील प्रशासनाच्या वतीने आज सुपूर्द करण्यात आला.
तालुक्यातील पानोळा हे येथील शेतकरी किरण गेमसिंग जाधव वय 40 वर्ष व त्यांची पत्नी विद्या हे दोघे दि.19 मे रोजी सकाळी 7 : 30 वाजेच्या दरम्यान पालाईगुडा (भोरड) येथील शेतकरी गणेश नरसिंग राठोड यांच्या शेतात भुईमुगाचे कुटार झाकण्यासाठी गेले असता अचानक विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला. या दरम्यान शेतात भुईमूग कुटारचा ढीग झाकण्याचे काम करीत असताना किरण गेमसिंग जाधव यांच्या अंगावर वीज पडल्याने तो बेशुद्ध झाला त्यास तातडीने माहूर च्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.त्यांची प्रकृती चिंताजनक वाटत असल्याने पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.
याबाबत सिंदखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. व महसूल प्रशासनाने पंचनामा करून रितसर प्रस्ताव शासनाकडे  पाठवला. भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र राज्य चे सरचिटणीस धरमसिंग राठोड यांनी संबंधित लाभार्थ्यांस शासकीय मदत मिळावी यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. तबल दीड महिन्याच्या कालावधी नंतर  संबंधित इसमाच्या कुटूंबियांना शासकीय मदत मिळाली.
यावेळी माहूर चे तहसीलदार किशोर यादव, मंडळ अधिकारी जी. पी.पडकोंडे,तलाठी व्ही.पी.राजूरवार आदींच्या उपस्थितीत मयत किरण जाधव यांची पत्नी विद्या किरण जाधव यांना 4 लक्ष रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.यावेळी पानोळा येथील सेवा सहकारी सोसायटी चे माजी चेअरमन संजय कुमरे, प्रल्हाद राठोड, निरंजन राठोड, सामाजिक कार्यकर्ते रवी पराते आदी उपस्थित होते.


-

आनंद दत्तधाम आश्रमात वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

आनंद दत्तधाम आश्रमात वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप 
दत्ता महाराज बितनाळकर पुण्यतिथी उत्साहात हजारो भक्तांचा मेळा

माहूर (प्रतिनिधी ) -
 माहूर येथील  आनंद दत्तधाम आश्रम उर्फ वसमतकर मठ येथे दि. २७ जून रोजी विविध कार्यक्रम संपन्न झाले. त्यामध्ये वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार  व महाप्रसाद  आदी कार्यक्रमांचा समावेश होता. आनंद दत्त शाम आश्रम माहूर यांच्या वतीने माहूरगडावर गेल्या २५ वर्षापासून दैनंदिन अन्नदानाची परंपरा अविरतपणे सुरु असून कोरोना कालावधीत माहूर शहरात मोठ्या प्रमाणात गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व आवश्यक धनधान्य मठाच्या वतीने पुरविण्यात आले. तर ग्रामीण रुग्णालयात भरती रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळचे भोजन मोफत पुरविण्याचा उपक्रम सुरु केला. स्वच्छता अभियान राबविले. वृक्षारोपणचे उपक्रम सुरु केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा  गुरुकुंज आश्रम मोझरी ते राष्ट्रपिता महात्मा  गांधी यांच्या सेवाग्राम आश्रम वर्धा पर्यत सप्तसूत्री उपक्रम राबवून गुरुसंदेश पदयात्रा व संत बाळगीर महाराज स्वच्छता दिंडी च्या माध्यमातून भक्तांना आदर्श जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या स्वच्छता, शिक्षण, महिला बचत, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, शेतकरी आत्महत्या, जीवाचा उद्धार,आदी विषयावर कीर्तन, प्रवचनातून उपदेश केला. 

द.भ.प. साईनाथ महाराज यांनी झोळी खांद्यावर घेऊन राज्यभर व्यसनमुक्ती व दुर्गुणमुक्तीचे दान मागण्याचा संकल्प केला.  कोरोना प्रतिबंधक लसीकरण कॅम्पचे आयोजन करून लसीकरण मध्ये सहभाग घेतला. आश्रमाच्या वतीने वसमत, महागाव, सवना,  मुदखेड,  येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळचे मोफत भोजन आनंद दत्त धाम आश्रम माहूरशी संलग्न असलेल्या मठांच्या माध्यमातून  देण्याचा उपक्रम राबविण्यात येते. दोन वर्ष कोरोना  महामारीच्या अनुशंगाने प्रशासनाच्या प्रतिबंधामुळे नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करता अली नव्हती परंतु यावर्षी निर्बध खुले झाल्याने राज्यभरतील शिष्यमंडळीनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. कार्यक्रमास सीताराम ठाकरे पाटील, वसमत शिवसेना प्रमुख प्रभाकर क्षीरसागर, निळकंठ पाटील, भाऊराव पाटील, कॉंग्रेस माहूर तालुका प्रवक्ते जयकुमार अडकीने, रमेश तमखाने, विलास पाटील रोहीपिंपळगावकर, दिलीप पाटील कोपरकर,  गजानन कलाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय माहूर चे एस. आर. देशमुख, सी. पी. जोशी, दवणे, राठोड, कातले  आदिसह  बहुसंख्य शिष्यमंडळी विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थित होती.

  द.भ.प. साईनाथ महाराज बितनाळकर यांच्या सुश्राव्य कीर्तन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी गणित विषयक मार्गदर्शक पुस्तिका प्रा. वानखेडे यवतमाळ लिखित व प्रकाशित मॅथ३६० या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.  सकाळपासूनच महाप्रसाद कार्यक्रम सुरु होता.

Tuesday, 7 June 2022

माहूर नगरपंचायतीने रस्त्यावर टाकलेले भंगार केले जप्त

माहूर नगरपंचायतीने रस्त्यावर टाकलेले भंगार केले जप्त 
नागरीकांनी रस्तयात असलेले बांधकाम साहीत्य त्वरीत हटवावे - मुख्याधिकारी किशोर यादव. 
माहूर (प्रतिनिधी) शहरातील मुख्य रस्त्याच्या कडेला भंगार साहीत्य खरेदीची दुकाने थाटली असून शहरातील रस्त्यावर प्रचंड प्रमाणात भंगार साहित्य टाकून रहदारीस अडथळा निर्माण केला ज्यामुळे रस्त्याने येजा करणाऱ्या नागरिकांसह वाहनास अडथळा निर्माण केल्यामुळे शहरातील सूज्ञ नागरिकांनी नगर पंचायतकडे तोंडी व, लेखी तक्रारी करुन सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यावरील भंगार साहित्य त्वरीत हटवण्याची मागणी केली.त्या मागणीची दखल घेत सदर दुकाने शहराबाहेर हटविण्याबाबत भंगार खरेदी करणाऱ्या व्यावसायिकांना नगर पंचायत प्रशासनाचने सूचना (नोटीस)तामील केल्या होत्या 20 दिवसाच्या कालावधीनंतरही संबधित व्यवसाईकांनी भंगार साहित्य हटविले नासल्याने तहसिलदार तथा मुख्याधिकारी किशोर यादव यांच्या आदेशानुसार कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी यांच्या नेत्रूत्वात नगर पंचायतीच्या पथकाने दिनांक 7मे 2022 मंगळवार रोजी सकाळी 12 वाजताचे दरम्यान रस्त्यावर असलेले भंगार साहीत्य जप्त केले. उप अधिक्षक सुनिल वाघ, देविदास जोंधळे, देविदास सिडाम,विशाल ढोरे, विजय शिंदे, सुरेंद्र पांडे, स्वच्छतादूत गणेश जाधव, नय्युम पाशा, सहभागी झाले होते, या कारवाईप्रमाणे शहरातील हमरस्त्यावर सूरू असलेले पोल्ट्री फार्म, व शहरात सर्वत्र अतिशय क्रूरपणे होणारी कोंबडी, बकऱ्यांची कत्तल करुन उघड्यावर होणारी मांस विक्री, भररस्त्यात बिनदिक्कतपणे उभी असलेली वाहने, बांधकाम साहीत्य हटविण्यात यावे अशी माहूरवासियांकडून अपेक्षा व्यक्त केली जात असून याबाबत तहसिलदार तथा मुख्याधिकारी किशोर यादव यांना विचारणा केली असता जागा उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रयत्न सूरू असून जागा उपलब्ध झालेवर मांसविक्रीची दुकाने शहराबाहेर घालविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. असे असले तरी नागरीकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी उघड्यावर मांस विक्री करणार्‍या दुकानावर कठोर कारवाई करणार की त्यांना पाठीशी घालणार याकडे शहरातील नागरीकांचे लक्ष लागले आहे .

Sunday, 5 June 2022

सुभाष सटवाजी ढगे सेवानिवृत्त

सुभाष सटवाजी ढगे सेवानिवृत्त
द्वारकाबाई कांबळे
हदगाव (प्रतिनिधी ) -  विदु्यत महावितरण ,सहाय्यक अभियंता शाखा कार्यालय तामसा (शहर) मध्ये कार्यरत ‍असलेले श्री सुभाष सटवाजी ढगे (लाईनमन) हे नियत वयोमानानुसार दि.३१/०५/२२रोजी ३९ वर्षाच्या प्रदिर्घ सेवा करुन सेवानिवृत्त झाले त्याचा उपविभागिय कार्यालय महावितरण हदगाव येथे उप- कार्यकारी अभियंता ढवळे साहेब यांच्या हस्ते  सपत्नीक सत्कार  करण्यात आला. यावेळी महावितरणचे कर्मचारी अविनाश खंदारे ,कुंटुरकर साहेब ,सोनसळे साहेब, पठाणसाहेब ई.कर्मचारी  व कुंटुबिय उपस्थित होते.

माहूरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात संपन्न

माहूरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात संपन्न 
  महिलांनी अहिल्यादेवी होळकरांचा आदर्श घ्यावा-  तासके

माहूर ( प्रतिनिधी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती स्थानिक कपिलेश्वर धर्मशाळेच्या प्रांगणात धनगर समाजाचे नेते विलास गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष फिरोज दोसानी, भाजपा नेते अॅड रमण जायभाये,, भाजपा तालूका अध्यक्ष अॅड दिनेश येउतकर, डॉ. निरंजन केशवे, नगरसेवक गोपू महामूने, राजू सौंदलकर, दिलीप मूनगीनवार, अनिल वाघमारे, बालाजी बामने यांच्या प्रमूख उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भाजपा तालूका अध्यक्ष अॅड दिनेश येउतकर, भाजपा नेते तथा विधानसभा संयोजक अॅड रमण जायभाये, डॉ. निरंजन केशवे, नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच धनगर समाज संघटनेचे प्रवक्ते तासके यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जिवन चरित्रावर आधारीत सखोल मार्गदर्शन। केले  महिलांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तत्पूर्वी माहूर शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पुण्यश्लोक अहील्यादेवी चौकाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.यावेळी द पॉवर ऑफ मिडीयाचे तालूका अध्यक्ष विजय आमले, पत्रकार जयकुमार अडकीने, गणेश चव्हाण,हिंगाडे, नंदकुमार जोशी, वसंत कपाटे,मंदाबाई हिंगाडे तोडसाम,मारकड,यांचेसह समाज बांधव उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रूईचे सरपंच नीळकंठ मस्के, शरद भडंगे यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी मनबे यांनी केले तर संतोष गंध यांनी आभार मानले.

लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांच्या उपस्थितीत अमोल पाटील कदम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांच्या उपस्थितीत अमोल पाटील कदम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
संदिप गिरी
 हदगाव( प्रतिनिधी) - हदगाव: माधवराव पाटील देवसरकर साहेब याचे कट्टर समर्थक तसेच स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड चे तालुका उपअध्यक्ष अमोल पाटील कदम याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
  हदगाव हदगाव शहरातील शासकीय विश्रामग्रह येथे  शिवसेनेचे शिवसेनेचे माजी जिल्हा अध्यक्ष तथा लोकनेते बाबुराव  कदम कोहळीकर यांच्या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस साजरा करण्यात आला.  वाढदिवसाच्या वेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष गजानन पाटील तसेच .तालुका अध्यक्ष संदिप गिरी,, दासराव चव्हाण, सरपंच प्रतिनिधी श्याम पाटील बोरगांवकर, बबनराव कदम, सूरज सोनू, शिवम पोधाडे, आब्रस पठाण, माधव पाटील पवार, कृष्णा सूर्यवंशी, अमोल पाटील यांची उपस्थिती होती .