Tuesday, 18 May 2021

अनिल कदम यांचे जिल्हा कार्यालयापुढे उपोषण

अनिल कदम यांचे जिल्हा कार्यालयापुढे उपोषण
 हदगाव( प्रतिनिधी) - मौजे हडसणी तालुका हदगाव येथील शेत सर्वे नंबर 50 /क प्रकरणी तलाठी व मंडळाधिकारी यांनी चुकीचा फेरफार केल्याप्रकरणी तसे त्यांना पाठीशी घालणाऱ्या तहसीलदार  यांच्यावर निलंबनाची कारवाई करून गुन्हा नोंदवा या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे हदगाव तालुका अध्यक्ष अनिल कदम यांनी दि.18 मे रोजी जिल्हा कार्यालयापुढे उपोषण सुरू केले आहे.  
प्रहार   जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण करण्यात आले . यावेळी शहराध्यक्ष प्रीतपाल सिंह शाहू, उपशहरध्यक्ष अजय हनवते , युवा जिल्हाध्यक्ष वैभव लव्हाडे  यांचे सहकार्य लाभले तसेच 
उपोषणाच्या ठिकाणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष विजय पाटील कदम , विदर्भ संपर्क प्रमुख शिवाजी जाधव , जिल्हा संपर्कप्रमुख बालाजी कराळे पाटील, अमोल वानखेडे, पवन पाटील मोरे, मारुती सूर्यवंशी, पप्पू निलेवाड, विश्वास माने तसेच इतरांनी भेटी दिल्या याप्रकरणी वृत्त लिहीपर्यंत जिल्हा कार्यालयात उपोषण करते अनिल कदम व जिल्हा कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांच्यात कागदपत्र संदर्भात संवाद चालु असल्याचे माहिती कळाली आहे.

3 comments: