तहसीलदार जीवराज डापकर यांची धडक कार्यवाही
15 ब्रास वाळू केली जप्त
हदगाव (प्रतिनिधी)- सध्या सर्वत्र कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान मांडले असून सर्व स्तरावरून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता अंमलबजावणी करण्यात येत आहे. काही ठिकाणी अवैधरित्या रेती या गौण खनिजाची विनापरवानगी उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या घटना सर्वत्र निदर्शनास येत आहेत. त्यामुळे शासनाचा महसूल देखील बुडत आहे .उत्खनन व वाहातूकीच्या अनुषंगाने विविध ठिकाणी कार्यवाही करण्याकरिता महसूल प्रशासनाकडून विविध पथके स्थापन करण्यात आलेली आहे.सदर पथके ही सर्वत्र गस्त घालून कारवाया करीत आहेत. याच अनुषंगाने आज दिनांक 11 मे 2021 रोजी सकाळी 9 वाजता उपविभागीय अधिकारी श्री जीवराज डापकर यांनी स्वतः आपले कर्मचारी यांचे सोबत मोजे हस्तरा या ठिकाणी गस्त घालत असताना पाहणी केली असता त्या ठिकाणी पंधरा ब्रास अवैध रेती साठा तसेच नऊ तरफे आढळून आले होते सदर तराफे हे त्या ठिकाणी जाळून नष्ट करण्यात आले आहेत सदरील 15 ब्रास रेती साठा हा संबंधित तलाठी श्री बीजी कवडगावे यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे सदर कार्यवाही करतेवेळी उपविभागीय अधिकारी श्री जीवराज डापकर हे घटनास्थळाकडे जात असताना सदरील घटनास्थळ हे रोड पासून अंदाजे एक किलोमीटरच्या वर असल्याने या ठिकाणी जातेवेळी यांचे वाहन नांगरटी करणाऱ्या शेतामध्ये अडकले होते त्यांनी त्यांचे वाहन काढण्याचा प्रयत्न केला परंतु वाहन निघाले नसल्याने त्यांनी नजीकच असलेल्या शेतामध्ये एका शेत मालकाकडे यांचे ट्रॅक्टर द्वारे सदरील वाहन काढण्याकरिता विनंती करून वाहन काढण्याची मागणी केली होती.
संबंधित शेतकऱ्यांनी तात्काळ उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्या शब्दाला दाद देऊन त्वरित त्यांच्या ट्रॅक्टरद्वारे त्यांनी शासकीय वाहन बाहेर काढले त्यानंतर उपविभागीय अधिकारी हदगाव हे समोर मार्गस्थ झाले त्याठिकाणी त्यांनी वरील प्रमाणे कारवाई केली सदरील जप्त केलेला रेती साठा व नष्ट केलेले तराफे यांचा शोध घेऊन सदरील तराफे अवैध रेती साठा हा ज्या कोणत्या नागरिकाचा असेल तर त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून त्यांच्या जंगम मालमत्तेवर बोजा नोंद करण्याची प्रक्रिया पार पाडण्याकरिता संबंधित तलाठी यांना कळविण्यात आलेले आहे याउपर उपजिल्हाधिकारी श्री जीवराज डापकर यांनी सर्व जनतेस आव्हान करून आपल्या कार्यक्षेत्रामध्ये होत असलेल्या अवैध उत्खनन वाहतुकीवर आळा घालण्याकरीता त्वरित संपर्क करणेबाबत कळवले आहे यापुढेही असाच कार्यवाया दैनंदिन करण्यात येतील असे उपविभागीय अधिकारी हदगाव यांनी सांगितले आहे यापूर्वी उपविभागीय अधिकारी हदगाव यांनी विविध ठिकाणी दंडात्मक कार्यवाही करून अवैध रेती साठे जप्त करून त्या ठिकाणावरील तराफे जाळून नष्ट केले आहेत सदर कामे उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्यासोबत तलाठी भास्कर ईपर बीजी कवडगाव मेहुणकर शिपाई रशीद शेख मदार व वाहन चालक कर्तव्यावर हजर होते सदरील माहिती मीडिया कक्ष प्रमुख श्री संजय गोडबोले यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे
No comments:
Post a Comment