धावत्या कंटेनरने अचानक घेतला पेट
हिंगोली, (प्रतिनिधी ) -राज्य महामार्गावर माळवहिवरा पाटीजवळ एका धावत्या कंटेनरने अचानक पेट घेतल्याने, सर्वत्र एकाच भडका उडाला. या प्रसंगी चालकाने प्रसंगावधान राखत, कंटेनर रस्त्याच्या कडेला थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. हिंगोली - वाशिम राज्य महामार्गावर धावत्या कंटेनरने अचानक पेट घेतल्यामुळे, थोडा वेळ वाहतूक खोळंबल्याचे चित्र दिसत होते.
माळहिवरा पाटी जवळ हैद्राबादच्या दिशेने जात असलेल्या कंटेनरला पोहचताच आग लागली. चालकाने रस्त्याच्या कडेला कंटेनर थांबवून त्यातून बाहेर पडत, आपले प्राण वाचवले. लोकांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाने ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. भर रस्त्यात लागलेल्या आगीमुळे तासभर दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. या आगीत कंटेनरमधील मालाचे जळून मोठे नुकसान झाले आहे. आगीत औषध गोळ्या आणि कपड्यांची वाहतूक केली जात असल्याची समोर आले आहे.
No comments:
Post a Comment