जंगलाला आगीपासून वाचवण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहून वन विभागांना सहकार्य करा - वन परिक्षेत्र अधिकारी शरयू रुद्रावार यांचे जनतेला आव्हान
हदगाव (प्रतिनिधी ) : सद्या वातावरणातील तापमान दिवसेंदिवस वाढत असुन , ह्या वाढत्या तापमानामूळे वनात वणवे लागत असुन ते वीझवन्यासाठी वनकर्मचारी दिवस रात्र झटत आहेत. त्यास भर म्हणजे सध्या सुरु असलेला मोह फुलांचा बहर . ह्या वर्षी मोहफुले मोठ्या प्रमाणात फुलली आहेत. मोह वृक्ष फुलांनी नटला आहे. पण आज ही जंगलाची सुंदर देन च जंगला च्या हानीस कारनीभूत ठरत आहे. मोह फुला पासुन गावागावात घरोघरी दारू बनवली जाते त्यास आज घडीला खुप मागणी वाढली आहे. ही दारू बनवण्याकरिता लागनारी मोहफुले गोळा करीन्या करिता पिढ्यानपिढ्या माणुस जंगलात जातो. ही परंपरा आज देखील चालू आहे.
त्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला व मुल रोज सकाळी जंगलात जाऊन मोहफुले गोळा करतात परंतु पालापाचोळ्यात पडलेली झाडाखालची ही मोह्फूले शोधुन वेचण्यास कठिण जाते. त्यासाठी ही फुले गोळा करणारी माणसे रात्री जाऊन मोहाचा झाडाखालचा पालापाचोळा जाळन्यासाठी आग लावतात जेणेकरुन ती जागा साफ हाऊन मोहफुले पटापटा वेचता येइल. परंतु ह्या व्यक्ती ती आग न वीझवताच घरी निघुन जातात त्यामूळे सदरची आग ही पुर्ण जंगलात पसरते व वनातील सरपटनारे प्राणी, किटक, पक्षांचे घरटे, वृक्ष ह्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. तसेच थोड्याच दिवसात तेंदु हंगाम सुर होतोय काही लोक नविन निरोगी चांगली पालवी येण्यासाठी काहीजन बेकायदेशीर रित्या टेंभूर्निच्या(तेंदु) झाडाना पेट्वून देतात व ह्यामुळे जंगलाच्या आगीत अजुन वाढ होते. ह्या आगीत वनांतील वृक्ष, वेल, झुडूपे, गवत, प्राणी, पक्षी, घरटे, किटक व त्यांचे नैसर्गिक अधिवास हे नष्ट होतात तसेच आगिमूळे वन्यप्राणी बाहेर येउन वन्यप्राणी मानव संघर्ष वाढतो, जमिनिची पाणी मूरवन्याची क्षमता मंद होऊन विहिर व बोअरवेल च्या पाण्याची पातळी खालावते. जंगलसंपदा जसे की नष्ट होते. वनात आग लावणे हा कायदेशीर गुन्हा आहे. ही हानी टाळन्यासाठी व वनसंपदा वाचवण्यासाठी आपण सर्वजन मिळुन वणवा लागनार नाही व तो लागला तर तो वीझवण्यासाठी प्रयत्न करने गरजेचे आहे...
आग वीझवन्यासाठी वनविभागाला सहकार्य करा...
1)जंगलातून येता-जाताना सिगारेट-बिडी पेट्वू नये
2) शेतातील काडी-कचरा जळताना ती आग जंगलात पसरनार नाही ह्याची दक्षता घ्या.
3)मोह फुले वेचन्यासाठी जंगलात आग लाऊ नका.
4)जंगलात आग लागलेली दिसताच वनविभाला कळवा.
शरयु रूद्रवार, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा) हदगाव
No comments:
Post a Comment