बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण व रुग्णांना फळे वाटप करीत केला वाढदिवस साजरा
हदगाव ( प्रतिनिधी ) वाढदिवस विविध प्रकारे साजरा केला जातो .पण बरडशेवाळा ता.हदगांव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा धनगर समाज युवा मल्हार सेनेचे तालुका अध्यक्ष प्रभाकर दहीभाते यांनी विविध सामाजिक परीवाराच्या माध्यमातून कुठलीही अपेक्षा न बाळगता हदगाव तालुक्यातील अनाथ वडिलांचे छत्र नसलेल्या अनेक गरीब गरजू कुटुंबाला आधार देण्यासाठी प्रयत्न केला असल्याने प्रभाकर दहीभाते यांचे कार्य तालुक्यात परीचीत आहे. प्रभाकर दहीभाते यांनी वाढदिवसानिमित्त वाजवी खर्चात बगल देत सामाजिक उपक्रम राबविण्याच्या हेतूने विविध उपक्रम राबवित वाढदिवस साजरा केला आहे.
गेल्या वर्षीपासून कोरोना आजाराचे संकट वाढतच असल्याने आपला वाढदिवस वृक्ष तोडीचे परीणाम दिवसेंदिवस जाणवत असल्याने पुढील काळात वृक्ष लावुन त्यांचे संगोपन करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून कार्य करीत असलेल्या जिवनाकुंर सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून कोरोना आजाराच्या नियमांचे पालन करीत गुरुवार एक एप्रिल रोजी बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात वृक्ष लागवड करत व कोवीड लसीकरण केलेल्या रुग्णांना फळे वाटप करीत वाढदिवस साजरा केला.
तर प्रभाकर दहीभाते यांना शेक्षणीक आवड असल्याने आपल्या गावातील तिन्ही अंगणवाडी लोकसहभागातून डिजिटल केल्या आहेत. आपल्या घराजवळ असलेल्या बरडशेवाळा येथील वार्ड क्रं एक च्या अंगणवाडीला आय.एस.ओ.दर्जा करण्यासाठी मोबाईल संदेशांद्वारे प्रयत्न करीत यशस्वी झाले आहेत.अंगणवाडी परीसरात आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिवनांकुर सेवा भावी संस्थेचे माध्यमातून वृक्ष लागवड करीत संगोपनाची जबाबदारी घेतली आहे.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ एस एम मानसपुरे व डॉ.शितल नरतेवाड ,जिवनांकुर सेवा भावी संस्थेचे संस्थापक हरींचद्र चिल्लोरे विठ्ठल पंडित व्यापारी , गजानन राठोड, आंनदराव मस्के, आरोग्य केंद्राचे कर्मचारी दुमाने, गजानन आळणे,एस.के. रणवीर, देशमुख , भगवान ढाकणे ,हटकर मडम पांचाळ मडम सेवक थाटे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment